esakal | Cruise Drugs Party: एनसीबीकडून आणखी एका तस्कराला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Cordelia Cruise Party

Cruise Party: एनसीबीकडून आणखी एका तस्कराला अटक

sakal_logo
By
सुधीर काकडे

मुंबई: कॉर्डेलिया क्रुझवर सुरू असणाऱ्या ड्रग्ज पार्टीवर २ ऑक्टोबर रोजी एनसीबीने छापा टाकत कारवाई केली होती. या कारवाईला आता एक आठवडा उलटून गेला असून, आज पर्यंत या प्रकरणात एनसीबीने अनेक जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यातच आज एनसीबीने चौकशीनंतर पुन्हा एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

ड्रग्स-ऑन-क्रूझ प्रकरणात चौकशी केल्यानंतर एका ड्रग तस्कराला अटक केली आहे, त्यानंतर आता या प्रकरणात एकूण आरोपींच्या अटकेची संख्या 19 झाली असल्याची माहिती एएनआयकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा: NCBनं मुक्त केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधीत व्यक्तीही - फडणवीस

दरम्यान एनसीबीकडून आज एकुण कारवाईची माहिती देण्यात आली. त्यावेळी एनसीबीवर उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांवर एनसीबीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. यावेळी क्रुझवर झालेल्या कारवाईत सर्व गोष्टी कायदेशीररित्या करण्यात आल्याचं यावेळी एनसीबीकडून सांगण्यात आलं. दोन ऑक्टोबरला एकूण १४ लोकांना अटक करण्यात आली होती, त्यातील ८ लोकांवर कायदेशीर अटकेची प्रक्रिया झाली कर इतर ६ लोकांना पुराव्यांअभावि सोडून देण्यात आल्याचं एनसीबीकडून सोडून देण्यात आल्याचं एनसीबीने स्पष्ट केलं.

तसंच NCB एक निष्पक्ष ऑर्गनायझेशन असून, देशाला नशामुक्त करण्यासाठी आम्ही काम करतो. लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही कारवाई करत असतो. २ तारखेला केलेल्या कारवाईत ८ लोकांना कोकेन चरस आणि १ लाखांवर रक्कमेसोबत पकडलं होतं. कायदेशीर कारवाईसाठी स्वतंत्र साक्षीदार देखील ठेवावे लागत असतात. तसेच या प्रकरणात ९ साक्षीदार होते. एनसीबी यांना आधी ओळखत नव्हती असंही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आलं.

loading image
go to top