esakal | Lakhimpur - मृत्यू झालेल्या ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये आणि नोकरी
sakal

बोलून बातमी शोधा

लखीमपूर - ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये आणि नोकरी

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

लखीमपूर - ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये आणि नोकरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखीमपूर इथं झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांचा आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यात वातावरण तापले असून कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लखीमपूरमध्ये कलम १४४ लागू केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणानंतर उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. आता लखीमपूर घटनेत मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

लखीमपूर इथं मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. तसंच मृताच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येईल. य़ाशिवाय जखमी शेतकऱ्यांना दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: मुलांचा बचाव करत केंद्रीय राज्यमंत्र्यांचा आंदोलक शेतकऱ्यांवर आरोप

घटनास्थळी माझे दोन्ही मुलगे नव्हते - अजय मिश्रा

केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलासह १५ जणांविरोधात तिकोनिया पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता यावर अजय मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, घटनास्थळी माझे दोन्ही मुलगे नव्हते. ज्या लोकांचा मृत्यू झाला ते बहराईचचे होते. तसंच जेव्हा उप मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी काही लोक जात होते तेव्हा शेतकऱ्यांमध्ये लपलेल्या काही लोकांनी गाडीतून उतरवून आमच्या लोकांना मारल्याचा आरोप मिश्रा यांनी केला.

loading image
go to top