योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे हुकुमशहा: मल्लिकार्जुन खर्गे

Lakhimpur
Lakhimpur Team eSakal

उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी इथं शेतकरी आंदोलनावेळी हिंसाचाराची घटना घडली. यात चार शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे तिकोना भवानीपूर दौऱ्यावर असताना ही घटना घडली. त्यानंतर उत्तर प्रदेशातील वातावरण तापलं आहे.

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे हुकुमशहा - खर्गे

योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे हुकुमशहा आहेत. सरकारनं बेकायदा पद्धतीनं प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं असून त्यांची सुटका व्हावी. ज्यांनी प्रियंका यांना ताब्यात घेतलं त्यांना अटक करुन त्यांची चौकशी सुरु करावी. आमच्या नेत्यांसोबत झालेलं अशा प्रकारचं गैरवर्तन आम्ही खपवून घेणार नाही.

लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेवरुन सध्या देशभरात संताप व्यक्त केला जातो आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून देखील आज याप्रकरणाचा निषेध करत मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्यासमोर निदर्शनं केली आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, सचिन पायलट आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे उपस्थित होते.

लखीमपूरमध्ये काल झालेल्या घटनेत केंद्रीय गृहमंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले आणि त्यात चार शेतकरी मारले गेल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आला होता. त्यावर आता ममता बॅनर्जी यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. लखीमपूरमध्ये घडलेली घटना निंदणीय आहे. या घटनेनंतर आपण निशब्द झालो आहोत. भाजपला लोकशाहीवर विश्वास नसून, त्यांना हुकूशाहीवर विश्वास आहे असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच हे राम राज्य आहे की, खूनी राज्य असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलेलं वक्तव्य दुर्दैवी आहे. प्रियांका गांधी या लखीमपूर खेरी इथं जाणार होत्या. तिथल्या शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश सरकारने घाबरून अडवलं. लखीमपूर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली.

पंजाब - चंदिगढमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं जात आहे. यात काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सहभागी झाले आहेत. शांततेनं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाड्या चालवणाऱ्यांना अटक करायला हवी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

असदुद्दीन ओवैसी देणार लखीमपूर खेरीला भेट

घटनास्थळी माझे दोन्ही मुलगे नव्हते - अजय मिश्रा

केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलासह १५ जणांविरोधात तिकोनिया पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता यावर अजय मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, घटनास्थळी माझे दोन्ही मुलगे नव्हते. ज्या लोकांचा मृत्यू झाला ते बहराईचचे होते. तसंच जेव्हा उप मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी काही लोक जात होते तेव्हा शेतकऱ्यांमध्ये लपलेल्या काही लोकांनी गाडीतून उतरवून आमच्या लोकांना मारल्याचा आरोप मिश्रा यांनी केला.

अजय मिश्रा यांनी शेतकऱ्यांवर मारहाणीचा आरोप करताना मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा ५० लाख रुपये मिळावेत अशी मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, या प्रकरणाची चौकशी सीबीआय, एसआटीकडून व्हायला हवी. यातील दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं आहे. याठिकाणी प्रियांका गांधी हातात झाडू घेऊन स्वच्छता करत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

राज्यात लखीमपूर इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्च स्तरीय बैठक बौलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उप मुख्यमंत्री केपी मौर्य आणि संसदीय कामकाज मंत्री सुरेश खन्ना हे उपस्थित आहेत.

उत्तर प्रदेशातील वातावरण तापले असून लखीमपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यानतंर आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त सचिवांना पत्र लिहिलं असून लखीमपूरला भेट देण्यासाठी परवानगी मागितली आहे.

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने लखीमपूर घटनेनंतर राष्ट्रपतींनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे. तसंच त्यांनी चार प्रमुख मागण्यासुद्धा केल्या आहेत. यात सर्वोच्च न्यायालायाने एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असंही म्हटलं आहे.

भरदिवसा लखीमपूर इथं शेतकऱ्यांची चिरडून हत्या करण्यात आल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी या हिंसाचार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तसंच आधी केंद्रीय मंत्र्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली.

प्रगतशील समाजवादी पार्टीचे लीडर शिवपाल यादव सिंग यांनाही लखीमपूरकडे जाण्याआधी लखनऊ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Summary

लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा श्रावस्ती आणि बहराईच जिल्ह्याचा दौरा रद्द केला आहे.

प्रियांका गांधीवर उत्तर प्रदेशातील मंत्री सिद्धार्थ नाथ सिंग यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, याआधीही प्रियांका गांधी यांनी राजकीय पर्यटन केलं आहे. लोकांची मते बदलण्यासाठीचा हा प्रयत्न आहे पण हे होणार नाही. मृतदेहांवरून राजकारण करणाऱ्यांना २०२२ मध्ये उत्तर मिळेल असंही सिद्धार्थ नाथ यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वागवलं जात आहे त्यातून मानसिकता दिसून येत आहे. जर तुम्ही सरकारच्या विरोधात उभा राहिलात, विरोध केलात तर तुम्हाला चिरडून टाकण्यात येईल असाच इशारा एकप्रकारे दिला जात असल्याची भावना छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बागेल यांनी दिली.

लखीमपूर खिरी इथं झालेल्या हिंसाचारानंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्यानंतर लखनऊमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. अखिलेश यांच्या घराबाहेर असलेल्या पोलिसांच्या गाडीला आग लावण्यात आली आहे.

अखिलेश यादव यांनी लखीमपूर घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, शेतकऱ्यांवर इतका अत्याचार तर इंग्रजांच्या राजवटीतसुद्धा झाला नाही.

रविवारी नेमकं काय घडलं?

मौर्य यांचा ताफा तिकोनिया चौकातून गेला, तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. हे पाहताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावली. या घटनेत चार शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते. तर चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com