esakal | 'मुलगा दोषी आढळला तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन' | Lakhimpur Kheri violence
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur Kheri: 'मुलगा दोषी आढळला तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन'

Lakhimpur Kheri: 'मुलगा दोषी आढळला तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन'

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात (lakhimpur kheri violence) आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. "लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार झाला, त्या ठिकाणी माझा मुलगा आशिष हजर असल्याचे पुरावे मिळाले, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन" असे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay mishra) यांनी सांगितले.

"लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार झाला त्या ठिकाणी माझा मुलगा हजर असल्याचे पुरावे मिळाले, तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईन" असे अजय मिश्रा इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना म्हणाले. रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. ज्यात चार शेतकरी आहेत. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने आपल्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले, असा शेतकरी संघटनांचा आरोप आहे.

हेही वाचा: 'क्रुझवर फक्त आर्यनच फिरत होता का'? बॉलीवूड सेलिब्रेटींची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य तिकुनिया येथे आले होते. त्यावेळी हा हिंसाचार झाला. तिकुनिया अजय मिश्रा यांच्या पूर्वजांचे गाव आहे. आंदोलकांनी ताफ्यावर हल्ला केला. त्यात ड्रायव्हर आणि तिघांची हत्या केली, असा दावा अजय मिश्रा आणि त्यांच्या मुलाने केला आहे. या हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

loading image
go to top