esakal | शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला हत्याकांडासारखा; शरद पवारांची सडकून टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला हत्याकांडासारखा : शरद पवार

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : लखीमपूर नृशंस हत्याकांडावर आता शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. शरद पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, लोक या सरकार त्यांची जागा दाखवून देतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. पीडितांच्या नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या विरोधकांना देखील सरकार अडवतंय. हे सरकार लोकशाहीची हत्या करत आहे, मात्र आम्ही विरोधक शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असं त्यांनी म्हटलंय.

घटनेची जबाबदारी केंद्र आणि यूपी सरकारची

एक वर्ष होतेय, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग काही समस्या घेऊन आंदोलन करतो आहे. हे आंदोलन शांतीपूर्ण आहे. लोकशाहीमध्ये शांततेने आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि तोच अधिकार लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन वापरण्याचा प्रयत्न केला. जेंव्हा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा केंद्र सरकार असो वा यूपी सरकारमधील भागीदार असणाऱ्या परिवारातील काहींनी शेतकऱ्यांच्या अंगावर आपली गाडी घातली आणि चिरडून टाकलं. यात काहींची हत्या झाली. जी माहिती समोर आलीय त्यात सहा ते आठ जणांचा या आंदोलनात मृत्यू झाला आहे. याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या सरकारची अथवा यूपी सरकारमध्ये बसणाऱ्या लोकांचीच आहे. ज्याप्रकारे हा हल्ला करण्यात आला त्याचा मी निषेध करतो. फक्त निषेध करुन भागणार नाही. याचा तपास व्हायला हवा. यूपी सरकारने रिटायर्ट जज यांच्यावर या घटनेच्या तपासाची जबाबदारी टाकलीय. मात्र, ही जबाबदारी सिटींग जजवर दिली पाहिजे. आणि या घटनेतील खरी तथ्ये लोकांसमोर आली पाहिजे

शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखवून देतील

ज्याप्रकारे शांतीपूर्वक आपला हक्क बजावणाऱ्या शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला त्यातून भारत सरकारची नितीमत्ता स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र तुम्ही सत्तेचा वापर शेतकऱ्यांची दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र तुम्ही यशस्वी होणार नाही. याचं उत्तर फक्त पंजाबमधील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी उत्तर देतील. तिथे संवेदना व्यक्त करायला जाऊ पाहणाऱ्या विरोधकांना रोखलं जातंय. हातातील सत्तेचा गैरवापर करण्याचा हा प्रकार आहे. ज्याचा मी निषेध करतो. मी शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, की तुमच्यावर हा अन्याय हो तअसला तरीही विरोधक म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्यासाठी तुमच्या मागण्यांसाठी लढू....

हे संवेदनाहिन सरकार

सर्वांनाच ज्याप्रकारी ट्रीटमेंट यूपी सरकार देत आहे, हे थेट लोकशाहीची हत्याच आहे. भलेही एकदोन दिवस तुम्ही हे कराल मात्र, लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. सरकारकडून दुख व्यक्त करणं तर लांबची गोष्ट आहे. जालियानवाला बाग हत्याकांडासारखीच ही घटना आहे. मात्र, याचं उत्तर सरकारला द्यावचं लागणार आहे.

loading image
go to top