esakal | Lakhimpur : राहुल गांधींसह काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi_Ramnath Kovind

Lakhimpur : राहुल गांधींसह काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशाला हादरवून टाकणाऱ्या लखीमपूर शेतकरी हत्याकांडप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. या भेटीसाठी राष्ट्रपतींची अपॉईंटमेंट मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. या भेटीमध्ये लखीमपूरच्या घटनेची वस्तूस्थिती मांडण्यात येणार आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळात असतील हे नेते

राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये राहुल गांधी, ए. के. अँटोनी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, प्रियंका गांधी-वड्रा, के. सी. वेणुगोपाल, अधिररंजन चौधरी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदारांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.

राष्ट्रपतींशी कुठल्या बाबींवर होईल चर्चा

काँग्रेसने राष्ट्रपतींच्या अपॉईंटमेंटसाठी लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "उत्तर प्रदेशादील लखीमपूर खिरी येथे शेतकरी हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या घटनेतील सर्वात दुर्देवी बाब म्हणजे केंद्री गृहराज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या खुल्या इशाऱ्यानुसार, त्यांच्या कुटुंबियांच्या मालकिच्या थार जीप शेतकऱ्यांना अंगावरुन नेऊन त्यांना चिरडलं गेलं. प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी जबाब दिला आहे की, "जी जीप गाडी आमच्या अंगावरुन चालवण्यात आली ती स्वतः मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा चालवत होता" दरम्यान, या घटनेविरोधातील निषेध आंदोलनांनंतर आणि सुप्रीम कोर्टानं दखल घेतल्यानंतरही अद्याप या प्रकरणातील दोषींवर आणि मंत्र्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही"

loading image
go to top