esakal | Lakhimpur - पंजाब, छत्तीसगढ मिळून पीडित कुटुंबियांना देणार प्रत्येकी एक कोटी रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

पीडित कुटुंबियांना उत्तर प्रदेशपेक्षा जास्त मदत देणार पंजाब आणि छत्तीसगढ

उत्तर प्रदेशने लखीमपूरमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ४५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा सोमवारी केली होती.

पीडित कुटुंबियांना उत्तर प्रदेशपेक्षा जास्त मदत देणार पंजाब आणि छत्तीसगढ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथं केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीखाली चिरडून शेतकऱ्यांचा मृ्त्यू झाल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी लखीमपूरला गेले आहेत. यावेळी राहुल गांधींसोबत पंजाब आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री होते. या दोन्ही राज्यांनी मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५०-५० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशने लखीमपूरमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ४५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा सोमवारी केली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत असं म्हटलं आहे. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ५०-५० लाख रुपये देण्याची घोषणासुद्धा त्यांनी केली. तसंच यावेळी एका पत्रकाराचासुद्धा मृत्यू झाला असून त्याच्या कुटु्ंबियांना ५०-५० लाख रुपये देऊ असं दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दोन्ही राज्यांकडून एकत्रित असे एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. याआधी योगी सरकारने मृतांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये आणि एकाला सरकारी नोकरी देण्यात येईल असं जाहीर केलं आहे.

हेही वाचा: विमानतळावरील ड्राम्यानंतर राहुल गांधींची सुटका, लखीमपूरसाठी रवाना

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत लखीमपूर खिरी इथं पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री पोहोचले होते. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, आम्ही मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत आहे. पंजाब सरकारच्या वतीने पत्रकारासह मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याची घोषणा करतो.

चरणजीत सिंह चन्नी यांनी घोषणा केली त्यावेळ छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल हेसुद्धा होते. त्यांनीसुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, छत्तीसगढच्या सरकारकडून या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी आणि पत्रकारांच्या कुटुंबांना ५०-५० लाख रुपये देण्याची घोषणा करतो.

loading image
go to top