esakal | चित्रपट निर्माती आयशा सुल्ताना विरोधात देशद्रोहाचा गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

आयशा सुल्ताना

चित्रपट निर्माती आयशा सुल्ताना विरोधात देशद्रोहाचा गुन्हा

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीप (Lakshadweep) मागच्या काही दिवसांपासून देशात चर्चेमध्ये आहे. लक्षद्वीप पोलिसांनी चित्रपट निर्माती आयशा सुल्ताना विरोधात देशद्रोहाच्या (Sedition charges) आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तिने एका वादविवाद कार्यक्रमात 'जैविक अस्त्रा' (Biological Weapon) संदर्भात वक्तव्य केले होते. त्यामुळे तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Lakshadweep Filmmaker Ayesha Sulthana Booked For Sedition For Biological Weapon Remark)

लक्षद्वीप भाजपाचे अध्यक्ष अब्दुल खादेर यांनी कावारात्ती पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनंतर आयशा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मल्याळम वाहिनीवरील एका वादविवाद कार्यक्रमात बोलताना सुल्तानाने लक्षद्वीपमधील कोविड-१९ च्या प्रसाराबद्दल बद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप अब्दुल खादेर यांनी केला आहे.

हेही वाचा: माझं गटार माझी जबाबदारी; मनसेचा शिवसेनेवर जिव्हारी लागणारा वार

लक्षद्वीपमध्ये कोविड-१९ पसरवण्यासाठी केंद्र सरकारने 'बायोलॉजिकल वेपन'चा वापर केला, असा आरोप सुल्तानाने केला होता. कावारात्ती पोलिसांनी कलम १२४ (देशद्रोह) आणि १५३ ब (द्वेषपूर्ण भाषण) या कलमांतर्गत आयशा सुल्ताना विरोधात गुन्हा नोंदवला आहे. "सुल्तानाच्या देशद्रोही कृतीमुळे केंद्र सरकारची देशभक्त ही जी प्रतिमा आहे, त्याला तडा गेलाय, त्यामुळे तिच्याविरोधात कारवाई करावी" अशी मागणी अब्दुल खादेर यांनी केली आहे.