esakal | माझं गटार माझी जबाबदारी; मनसेचा शिवसेनेवर जिव्हारी लागणारा वार
sakal

बोलून बातमी शोधा

माझं गटार माझी जबाबदारी; मनसेचा शिवसेनेवर जिव्हारी लागणारा वार

माझं गटार माझी जबाबदारी; मनसेचा शिवसेनेवर जिव्हारी लागणारा वार

sakal_logo
By
विराज भागवत
  • खास फोटो शेअर करून लगावला सणसणीत टोला

  • भांडूपला पाऊस सुरू असताना दोन महिला मॅनहोलमध्ये पडल्या पण सुदैवाने बचावल्या

मुंबई: भांडूप येथील फुटपाथच्या मॅनहोलवरील झाकण पावसामुळे निघाल्याने नाल्यात दोन महिला पडल्या पण त्यांच्या प्रसंगावधानामुळे त्या वाचल्या. या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व मॅनहोल्सची पाहणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले. या घटनेबद्दल सर्वत्र राग व्यक्त करण्यात आला. नेटकऱ्यांनी मुंबई महापालिका प्रशासनावर यथेच्छ टीका केली. त्यातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी एक विशेष फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून शिवसेनेवर टीका केली. (MNS Sandeep Deshpande slams Shivsena Mumbai BMC for Manhole issue)

हेही वाचा: मुंबईत पाऊस is Back!! लोकल सेवा सुरळीत; रस्ते वाहतूक मंदावली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' अशी मोहिम राबवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर कोरोनाकाळात लोकांनी जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे अशा उद्देशाने 'मी जबाबदार' अशीही मोहिम राबवण्यात आली. हाच धागा पकडून संदीप देशपांडे यांनी एक उघड्या मॅनहोलचा फोटो व व्हिडीओ टाकला आणि 'माझं गटार माझी जबाबदारी' असं कॅप्शन देत शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा वार केला.

2017 मध्ये प्रसिध्द डॉ. दीपक आमरापुरकर यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने रस्त्यावर असलेल्या मॅनहोल्सच्या झाकणांखाली संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात 73 हजारपैकी 1400 मॅनहोल्समध्ये अशा जाळ्या बसविण्यात आल्या. गेल्या काही वर्षात रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या पर्जन्यवाहीन्या बंदिस्त करण्यास महानगर पालिकेन सुरूवात केली आहे. या वाहिन्यांच्या सफाईसाठी काही ठिकाणी मॅनहोल्स तयार करण्यात आले आहेत. या मॅनहोल्सवर फायबरची झाकणे बसविण्यात आली आहेत.

हेही वाचा: मुंबई: 22 जणांचा मृत्यू; 660 नव्या रुग्णांची भर

फायबरची झाकणे वजनाने हलकी असल्याने नाल्यातील पाण्याचा दाब वाढवल्यास अथवा रस्त्यावरील पाण्याच्या वेग असेल तर आपोआप मॅनहोल्सपासून लांब होतात. असाच प्रकार भांडूप पश्‍चिम येथील व्हिलेज रोड परीसरातील फुटपाथवर घडला. मॅनहोल उघडे पडल्याने त्यात दोन महिला पडताना वाचल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेत हे झाकण पुन्हा बसवले. त्याच बराेबर संपूर्ण शहरातील मॅनहोल्सचा आढावा घेण्याचे निर्देश आयुक्त चहल यांनी प्रशासनाला दिले.

कुलूप बंद मॅनहोल्स- महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठिकाणची पाहणी केली. आता मुंबईत कुलूपबंद मॅनहोल्स (Lock and Key) तयार करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. तसेच शहरातील सर्व मॅनहोल्सची तपासणी करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी पावसाळ्यातील 'हे' १८ दिवस धोक्याचे