काश्‍मीरने दिलेल्या देणग्यांची पुरेशी दखल नाही - करणसिंह

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 12 October 2019

साम्राज्यविस्तार कोकणापर्यंत
डॉ. करणसिंह यांनी त्यांच्या भाषणात गिलगिट-बाल्टिस्तान मूलतः भारतात समाविष्ट नसल्याचा आणि ललितादित्य याने तो भाग भारताला जोडल्याचा धागा पकडून सांगितले, की ललितादित्यानंतर हा भाग पुन्हा परकी सत्तांनी ताब्यात घेतला; परंतु त्यांच्या पूर्वजांनी तो भाग पुन्हा भारतात सामील केला. ललितादित्याचा साम्राज्यविस्तार कोकणापर्यंत पसरलेला होता.

नवी दिल्ली - ‘काश्‍मीरने भारताला अनेक देणग्या दिल्या आहेत; परंतु इतिहासाने त्याची पुरेशा प्रमाणात दखल घेतली नाही; परंतु ललितादित्यसारख्या पराक्रमी सम्राटाचे चरित्र मराठी व इंग्रजी भाषेत प्रकाशित करणे ही बहुमोल कामगिरी आहे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते डॉ. करणसिंह यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. संजय सोनावणीलिखित ‘ललितादित्य द ग्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. 

पुण्यातील चिनार प्रकाशन आणि ‘सरहद’ या स्वयंसेवी संघटनेतर्फे या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळ मराठीतील पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करणसिंह यांच्या हस्ते व जम्मू-काश्‍मीरचे माजी राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात झाले. याप्रसंगी ‘सरहद’चे प्रमुख संजय नहार यांनी प्रास्ताविकात या पुस्तकामागील प्रेरणा व हेतू स्पष्ट केला. लेखक सोनावणी यांनी पुस्तकाचा परिचय करून देताना काश्‍मीरने भारताला कोणकोणत्या गोष्टी दिल्या, याची माहिती दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lalitaditya the Great book publish karansinh