'शेतकऱ्यांचा विजय आणि नरेंद्र मोदींचा पराभव झाला' | Lalu Prasad Yadav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lalu Prasad Yadav
'शेतकऱ्यांचा विजय आणि नरेंद्र मोदींचा पराभव झाला'

'शेतकऱ्यांचा विजय आणि नरेंद्र मोदींचा पराभव झाला'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाटणा : आज शेतकऱ्यांचा विजय झाला आहे आणि नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. अहंकराचा पराभव झाला आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. पाटणा येथील एका कार्यक्रमात आज बुधवारी (ता.२४) ते बोलत होते. गेल्या १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. शेतकरी आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष होत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने शेती कायद्यांच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या आयोगाचे सदस्य अनिल घनवट यांनी कृषी कायदेविषयी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी सरन्यायाधीस एन.व्ही.रमणा यांना पत्र लिहून केली आहे. (Farm Bills Repeal)

हेही वाचा: Beed : बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याविरूध्द अटक वॉरंट

लालूप्रसाद यादव पुढे म्हणाले, की जोपर्यंत हमीभाव शेतकऱ्यांच्या मानकानुसार निश्चित होत नाही, तोपर्यंत शेतकरी आंदोलन थांबणार नाही. आपल्याला लढाईचे आहे. ही लढाई लढायची आहे, असे ते म्हणाले.

loading image
go to top