लालू यादवांचं कुटुंब पुन्हा अडचणीत; मुलीवर 'या' घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

Hema Yadav Lalu Yadav
Hema Yadav Lalu Yadavesakal
Summary

लालू प्रसाद यादव यांचं कुटुंब पुन्हा नव्या अडचणीत सापडलंय.

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचं कुटुंब (Lalu Family) पुन्हा नव्या अडचणीत सापडलंय. केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) लालू यादव (Lalu Yadav), त्यांची पत्नी राबडी देवी (Rabri Devi) आणि दोन मुली मिसा भारती (Misa Bharti) व हेमा यादव (Hema Yadav) यांच्याविरुद्ध रेल्वेत नोकरीच्या नावाखाली घोटाळा (Railway Recruitment Scam) केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

या घोटाळ्यातील आरोपींपैकी एक असलेल्या हेमा यादव (Hema Yadav) या राजकारणात सक्रिय नाहीयत. एका घोटाळ्यात त्यांचं नाव प्रथमच समोर आलंय. त्यांनी अभियांत्रिकीचं (B.Tech) शिक्षण घेतलं असून ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे चाहते असलेल्या लालू यादव यांनी आपल्या मुलीचं नाव हेमा मालिनी (Hema Malini) असं ठेवलंय.

Hema Yadav Lalu Yadav
राज ठाकरेंनी जिंकलं मनसैनिकांचं 'मन'; 'त्या' चौघांना थेट नेत्यांच्या शेजारीच बसवलं!

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये (यूपीए-1) रेल्वेमंत्री राहिलेल्या लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारांकडून रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात जमिनीची नोंदणी केली होती. ही जमीन आधी दुसऱ्याच्या नावावर नोंदवण्यात आली आणि नंतर ती लालू कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदवण्यात आली. अशाच एका प्रकरणात 13 फेब्रुवारी 2014 रोजी गोपालगंज येथील हृदयानंद यादव यांनी लालूंची मुलगी हेमा यांना जमीन भेट दिली होती. या प्रकरणी सीबीआयनं हेमा यादव यांना आरोपी केलंय.

Hema Yadav Lalu Yadav
राहुल बाबा.. इटालियन चष्मा काढा, तरच विकास दिसेल; अमित शाहांनी उडवली खिल्ली

आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांच्या सात मुलींमध्ये हेमा यादव यांचा पाचवा क्रमांक लागतो. राजकीय कुटुंबातील मुलगी असूनही 2012 मध्ये दिल्लीतील एका राजकीय कुटुंबातील विनीत यादव यांच्याशी लग्न करूनही हेमा यांचा राजकारणाशी थेट संबंध नव्हता. पती विनित राजकारणात सक्रीय आहेत, पण कोणतंही मोठं पद त्यांनी भूषवलेलं नाहीय. दरम्यान, हेमासाठी राजकारणापेक्षा करिअर महत्त्वाचं होतं. त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेसरा (BIT, Meshra) येथून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com