Bihar Elections | कपडे धुणाऱ्या महिलेला आमदारकीची संधी; लालू प्रसाद यादवांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munni Rajak Bihar MLC canditate on RJD
कपडे धुणाऱ्या महिलेला आमदारकीची संधी; लालू प्रसाद यादवांची घोषणा

कपडे धुणाऱ्या महिलेला आमदारकीची संधी; लालू प्रसाद यादवांची घोषणा

राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांचं सध्या चांगलंच कौतुक सुरू आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी दलित समाजातल्या एका सर्वसामान्य महिलेला विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. या महिलेचं नाव मुन्नी रजक आहे. त्या नालंदामधल्या बख्तियारपूर इथल्या रहिवासी आहेत. त्या पटनामध्ये कपडे धुण्याचं काम करतात. (Bihar Lalu Prasad Yadav declared MLC candidate of RJD)

विशेष आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुन्नी यांच्याकडे आजच्या डिजिटल जमान्यातही मोबाईल फोन नाही. मुन्नी यांनी सांगितलं की जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Bihar Ex-CM Rabdi Devi) यांच्या घरी बोलावलं आहे, तेव्हा त्या सुरुवातीला घाबरल्या होत्या. त्यांना अशी भीती वाटत होती की आपल्या हातून काहीतरी चूक झालीये आणि म्हणून रागवायलाच त्यांना राबडी देवींच्या घरी बोलावलं आहे.

हेही वाचा: Bihar| बिहार विधानपरिषद निवडणुकीत एनडीएची बाजी, १३ जागा जिंकल्या

पण प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. मुन्नी जशा त्यांच्या घरी गेल्या तसं त्यांना धक्काच बसला. घरात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद, राबडी देवी, तेजस्वी यादव आणि त्यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव उपस्थित होते. त्यांनी मुन्नी देवी यांना सांगितलं की त्यांना आरजेडीतर्फे (Rashtriya Janata Dal) विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.

मुन्नीदेवी या आरजेडीच्या सामान्य कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर त्यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्या राबडी देवींच्या घरावर छापे पडल्यानंतर सीबीआय आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

Web Title: Lalu Prasad Yadav Rashtiya Janata Dal Munni Rajak Candidate Of Bihar Assembly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top