
नवी दिल्ली - सार्वत्रिक आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागत असल्याने आता विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांकडून काँग्रेसच्या नेतृत्वाला आक्षेप घ्यायला सुरूवात केली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने करावे असे मत जाहीरपणे मांडत याबाबत काँग्रेसने आक्षेप घेतल्यास त्याला फारसा अर्थ नसल्याचे नमूद केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.