esakal | लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक, किडनी निकामी होण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

lalu main.jpg

लालूप्रसाद यांच्या रक्तातील साखरही वाढली आहे. त्यामुळे त्यांना चागल्या उपचाराची आवश्यकता आहे. गरज पडल्यास त्यांच्यावर उपचारासाठी बाहेरुन डॉक्टर बोलावले जाऊ शकतात. 

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक, किडनी निकामी होण्याची शक्यता

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

रांची- चारा घोटाळ्याप्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली आहे. रांची येथील रिम्समधील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरु असून त्यांच्या किडनीतील क्रिएटिनन लेवल वाढत आहे. लालूप्रसाद यादव यांची किडनी केवळ 25 टक्के काम करत आहे. शनिवारी (दि.12) त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. उमेशप्रसाद यादव यांनी पुढील काही दिवस लालूप्रसाद यादव यांची प्रकृती अशीच राहिली तर त्यांना डायलिसिस करावे लागण्याची शक्यता आहे. 

डॉ. उमेशप्रसाद म्हणाले की, मागील काही दिवसांपासून लालू्प्रसाद हे खूप चिंताग्रस्त आणि तणावात आहेत. त्यांची किडनी 25 टक्के कार्य करत आहे. अशात त्यांची किडनी काम बंद करु शकते. आम्ही रिम्सच्या उच्च अधिकारी आणि सरकारला याची लेखी माहिती दिली आहे. लालूप्रसाद यांच्या रक्तातील साखरही वाढली आहे. त्यामुळे त्यांना चागल्या उपचाराची आवश्यकता आहे. गरज पडल्यास त्यांच्यावर उपचारासाठी बाहेरुन डॉक्टर बोलावले जाऊ शकतात. 

हेही वाचा- VIDEO: निर्दयीपणाचा कळस; पाळीव कुत्र्याला कारला बांधून फरफटत नेले

माहीतगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिम्समध्ये दाखल करताना लालूप्रसाद यादव यांची किडनी 53 टक्के कार्यरत होती. आता मात्र ती 25 टक्केच काम करत आहे. मागील दोन वर्षांत किडनी काम करण्याची टक्केवारी मोठ्याप्रमाणात कमी होत आहे. लालूप्रसाद यांची किडनी कधीही काम करणे बंद करु शकते. अंदाज वर्तवणे कठीण आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. मी याची लेखी माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे, असे डॉ. उमेशप्रसाद यांनी सांगितले.

हेही वाचा- पगार कपातीला संतापून कर्मचाऱ्यांकडून iPhone तयार करणाऱ्या कंपनीत तोडफोड

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय यांनी रिम्समध्ये लालूप्रसाद यांची शनिवारी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लालूप्रसाद यांची प्रकृती ढासळल्याचे समजल्यानंतर विचारपूस करण्यासाठी रिम्समध्ये आल्याचे सांगितले.  

ते म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत 18 ते 20 जागांवर खूप कमी मतांनी महाआघाडीचे उमेदवार पराभूत झाले. याचदरम्यान फेरमतमोजणीची विनंतीही केली होती. परंतु, निवडणून आयोगाने ती स्वीकारली नाही. चार तासांपर्यंत अनेक भागात मतमोजणी थांबवून एनडीए उमेदवाराच्या विजयाची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर बिहारमधील आरजेडीच्या दोन आमदारांनीही लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. कारागृहाच्या नियमावलीनुसार शनिवारी लालूप्रसाद यादव यांना भेटण्यासाठी तीन जण पेईंग वॉर्डमध्ये जाऊ शकतात. 
 

loading image