Lalu Prasad Yadav : लालूप्रसाद यादव यांना नोटीस; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान केल्याचा आरोप
Bihar Politics : लालूप्रसाद यादव यांच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान केल्याचा आरोप झाला असून, अनुसूचित जाती आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत आपली बाजू स्पष्ट करण्याचे आदेश आहेत.
पाटणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान केल्याच्या आरोपाप्रकरणी अनुसूचित जाती आयोगाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना नोटीस बजावली आहे.