Badrinath Landslide: मोठी दुर्घटना! बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळली; एकाचा मृत्यू

उत्तराखंडमधील जोशीमठजवळ भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
Badrinath Landslide: मोठी दुर्घटना! बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळली; एकाचा मृत्यू

उत्तराखंडमधील जोशीमठजवळ भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जोशीमठजवळील हेलांग खोऱ्यात जलविद्युत प्रकल्पासाठी एनटीपीसीचा बोगदा बांधला जात आहे. काल दरीत खाली काही बांधकाम सुरू असताना स्फोट झाला, त्यानंतर डोंगराचा एक भाग तुटून रस्त्यावर पडला, असा दावा केला जात आहे.(Landslide in Uttarakhand’s Chamoli blocks Badrinath highway)

या घटनेनंतर चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे. बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना अडवण्यात आले आहे. महामार्गावर भूस्खलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. महामार्ग बंद झाल्यानंतर अनेक ठिकाणी वाहतुक ठप्प झाली आहे. हजारो प्रवासी मार्गात अडकून पडले आहेत.

Badrinath Landslide: मोठी दुर्घटना! बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळली; एकाचा मृत्यू
Manipur: मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब; दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

ढिगाऱ्याखाली सापडल्याने कारमधून प्रवास करणारे चंदीगड येथील दोन प्रवासी जखमी झाले. त्याचवेळी हनुमान चाटी येथे डोंगरावरून दगड पडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

Badrinath Landslide: मोठी दुर्घटना! बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळली; एकाचा मृत्यू
Manipur Violence : आदिवासी- बिगर आदिवासी संघर्षाला धार

वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. रस्त्यावरील ढिगारा हटवण्यासाठी दोन जेसीबी मशिन वापरण्यात आल्या आहेत. रात्रीपर्यंत महामार्ग सुरळीत असेल. यात्रेकरूंनी प्रवासाचे अपडेट मिळताच प्रवासाला सुरुवात करावी, असे आवाहन एसपी चमोली प्रमेंद्र डोवाल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com