उत्तरकाशी (उत्तराखंड) : उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे ढगफुटीसदृश पावसामुळे भूस्खलन झाले. यामुळे तेथील बांधकाम मजुरांची शेड कोसळली. या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला असून, सात जण बेपत्ता झाले आहेत..दहा मजुरांना वाचविण्यात यश आले असून, जोरदार पावसामुळे चारधाम यात्रा एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, पोलिसांनी चारधाम यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. बागेश्वर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानंतर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत..यमुना नदीच्या काठावर, भूस्खलन झालेल्या ठिकाणापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या तिलाडी शहीद स्मारकजवळ दोन मजुरांचे मृतदेह आढळले, असे पोलिस अधिकारी विक्रम सिंह यांनी सांगितले. नौगाव येथील आरोग्य केंद्रात हे मृतदेह पाठवण्यात आले असून, इतर सात जणांच्या शोधाचा प्रयत्न सुरू आहे. मूळचे नेपाळी असलेले मजूर हॉटेलच्या बांधकामासाठी येथे आले होते..जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरकाशीजवळ पालीगडच्या पुढे सुमारे चार किलोमीटरवर सिलाई वळणाजवळ भूस्खलन झाले. कॅम्पवर एकूण २९ कामगार होते. भूस्खलनामुळे बाधित झालेल्या मजूर शिबिरातील १० जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. उर्वरित मजुरांचा शोध सुरू आहे. रस्ता बंद असल्याने बचाव कार्य करणाऱ्यांना पायीच घटनास्थळी पोहोचावे लागले..चारधाम यात्रा स्थगितराज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे, अशी घोषणा गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी केली. खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही करण्यात आली आहे, असेही पांडे यांनी सांगितले. हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे..Pune News : हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील समस्याांबाबत आढावा बैठक; आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा .उत्तरकाशी जिल्ह्यातील बर्कोट तालुक्यातील सिलाई बँड भागात घडलेल्या दुर्दैवी भूस्खलनाच्या घटनेत काही कामगार बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. आपत्ती निवारण पथकांकडून मजुरांचा शोध सुरू आहे.- पुष्करसिंह धामी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.