
नवी दिल्ली - ‘भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भाषा विवादाचे माध्यम होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव असलेला मराठी माणूस संकुचित विचार करूच शकत नाही. छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित झालेले मराठे संपूर्ण देशासाठी आणि संस्कृतीसाठी लढले. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितले.