चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार; दोन दहशतवाद्यांना कंठस्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lashkar-e-Taiba commander killed in encounter

चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार; दोन दहशतवाद्यांना कंठस्थान

काश्मीरमधील कुलगामच्या देवसरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (encounter) संपली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार (killed) झाले आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानात राहणारा परदेशी दहशतवादी आणि स्थानिक दहशतवाद्याचा समावेश आहे. (Lashkar-e-Taiba commander killed in encounter)

कुलगाममधील देवसरच्या चेयान भागात रविवारी पहाटे सुरू झालेली चकमक आता संपली आहे. ठार (killed) झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव हैदर आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी असून, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. चकमकीत (encounter) ठार झालेला दुसरा दहशतवादी स्थानिक आहे. कुलगामचा रहिवासी शाहबाज शाह असे त्याचे नाव आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे, असे काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले.

शनिवारी रात्री उशिरा कुलगाम पोलिसांना देवसरच्या चेयान परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. रविवारी पहाटे कुलगाम पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफसह संयुक्तपणे परिसरात शोध मोहीम सुरू केली. एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी तात्काळ मोर्चा काढून दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. बऱ्याच प्रयत्नांनंतर दोघेही ठार (encounter) झाले.