
दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये बेकायदा बांधकामांवरील कारवाईवरून जोरदार राजकारण सुरू झालंय.
जहांगीरपुरी : ओवैसींना पोलिसांनी रोखलं; घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त
Delhi Jahangirpuri Violence : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अवैध बांधकामांवरील तोडक कारवाईला सुरुवात झालीय. दिल्ली महानगरपालिकेनं (MCD) बुलडोझरनं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केलीय. एच ब्लॉकमध्ये अनेक बांधकामं हटवण्यात आली असून सध्या तोडक कारवाईला कोणताही विरोध झालेला नाही. दिल्लीत हनुमान जयंती दिवशी झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणात रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. सध्या परिसरात दहशतीचं वातावरण आहे. त्यानंतर आता पालिकेनं अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून घटनास्थळी 400 पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये आज बेकायदा बांधकामांवरील कारवाईवरून जोरदार राजकारण सुरू झालंय. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आज सायंकाळी जहांगीरपुरीत पोहोचले असता, पोलिसांना त्यांना मज्जाव केलाय. या प्रकारानं संतप्त झालेल्या ओवैसींनी भाजप आणि दिल्लीच्या केजरीवाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
हेही वाचा: जहांगीरपुरीसारखा हिंसाचार कसा थांबवायचा? किरण बेदींनी सांगितला उपाय
दरम्यान, ओवैसींना पोलिसांनी (Delhi Police) जहांगीरपुरीला जाण्याची परवानगी नाकारलीय. यावर ओवैसींनी नाराजी व्यक्त केलीय. नोटीस न देता बुलडोझर चालवणं चुकीचं असल्याचं ओवैसींनी म्हंटलंय. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) दिवशी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, तर शोभा यात्रा कशी झाली? लोकांकडं शस्त्रं कशी आली? पोलिसांनी त्यांना (आरोपींना) अडवून शस्त्रं जप्त केली असती, तर आम्हाला हा दिवस पाहण्याची गरज भासली नसती, असा घणाघात त्यांनी पोलिस प्रशासनावर केलाय. सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Web Title: Aimim Chief Asaduddin Owaisi Reaches Jahangirpuri Heavy Delhi Police Force Deployed On The Spot
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..