#IndiaTogether : आंतरराष्ट्रीय पॉप सिंगरला गान कोकिळेनंही दिलं उत्तर

lata mangeshkar Join IndiaTogether,  IndiaAgainstPropaganda, farmers,rihana
lata mangeshkar Join IndiaTogether, IndiaAgainstPropaganda, farmers,rihana

Lata Mangeshkar Join IndiaTogether Movement : शेतकरी आंदोलनावरुन परराष्ट्रातून उमटणाऱ्या प्रतिक्रियानंतर भारतात एकजूटीचा नारा देण्यात येत आहे. आतापर्यंत शेतकरी आंदोलनावर गप्प असणाऱ्या लोकप्रिय व्यक्ती आमच्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा संदेश देत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्यानंतर आता देशाच्या गानकोकिळा अशी ख्याती असलेल्या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी एका निवदेनाच्या माध्यमातून भारत एकजूटता मोहिमेला पाठिंबा देत पॉप गायिका रिहाना आणि प्रयावणवादी ग्रेटा थंडबर्ग यांना प्रत्युत्तर दिले आहे.  

लता मंगेशकर यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या प्रकरणात उडी घेतली आहे. भारत एक गौरशाली राष्ट्र आहे आणि आम्ही सर्व भारतीय एकजूटीने संकटाचा सामना करायला सज्ज आहोत. भारतीय असल्याचा मला अभिमान असून आमच्या देशातील हित लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यास आम्ही सक्षम आहोत. जय हिंद! असे ट्विट गानकोकिळा लता मंगेशकर यांनी केले आहे. 

आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहाना हिने एक देशात दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ट्विट केले होते. तिने शेतकरी आंदोलनाचा एक फोटो शेअर केला होता. आपण यावर चर्चा करु शकत नाही का? असा प्रश्न उपस्थितीत करत रिहानाने शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. पर्यावरणवादी ग्रेटा थंडबर्ग यांनी ही शेतकऱ्यांना समर्थन दिले होते. सामाजिक मुद्यावर भाष्य करणाऱ्या परदेशी मंडळींनी शेतकऱ्यांची बाजू घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून मौन बाळगलेल्या भारतातील सेलिब्रेटींनी त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात झाली.

#IndiaTogether आणि  #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅगच्या माध्यमातून सर्व भारतीय एकजूट आहेत, असा सूर उमटण्यास सुरुवात झाली. सध्याच्या घडीला #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या दोन हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल मीडियावर उसळणारी लाटही शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण देणार का?  हे येणारा काळाच ठरवेल. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com