

lata mangeshkar award mp indore
sakal
मध्य प्रदेश: मध्य प्रदेश सरकारच्या संस्कृती विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार २०२६ प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोईत्रा यांना प्रदान करण्यात आला. सुगम संगीत आणि संगीत दिग्दर्शन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. लता मंगेशकर यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त २८ सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला.
मोईत्रा यांना हा सन्मान जलसंपदा मंत्री तुळसीराम सिलावट आणि खासदार शंकर लालवानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये रु. ५ लाखांचे करमुक्त पारितोषिक आणि मानपत्र देण्यात आले.