Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज (ता. १०) जाहीर करण्यात येणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

हिंदू बांधवांनो, तुमचं मोहोळ उठू द्या- राज ठाकरे

पुण्यातील हिंदू बांधवांनो, तुमचं मोहोळ उठू द्या, असं म्हणत राज ठाकरे यांनी आयोजित सभेत मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन केलं.

मोदींनी राज्यातील उद्योग ओरबाडून गुजरातला नेले- ठाकरे

अरविंद केजरीवाल यांची उद्या दुपारी पत्रकार परिषद

केजरीवाल यांच्या घराबाहेर स्वागताची तयारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या बाहेर त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका होणार आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह अडचणीत, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अढळराव पाटलांसाठीची भोसरीतील अजित पवारांची सभा रद्द

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं प्रचारसभांना याचा मोठा फटका बसला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजी अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज भोसरी इथं अजित पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती. पण पावसामुळं ती रद्द करण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानात गेल्यावेळेपेक्षा ०.१२ टक्क्यांनी वाढ

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये तिसऱ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघात 63.55 टक्के एकूण मतदान झाल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये 2019 च्या तुलनेत 0.12टक्के वाढ झाली आहे. तसेच चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी 23, 284 मतदानं केंद्र तयार असून 2 कोटी 28 लाख लोक मतदान करणार आहेत. 85 वर्षांहून अधिक वय असलेले आणि दिव्याग मतदारांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.

राज ठाकरे यांची सारसबागच्या चौकातील सभेवर पावसाचं सावट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संध्याकाळी पुण्यातील सारसबाग परिसरात जाहीर सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेणार आहेत. पण त्यांच्या सभेवरही पावसाचं सावट आहे. पाऊस कायम राहिला तर ही सभा देखील रद्द होऊ शकते.

पावसामुळं उद्धव ठाकरेंची जालन्यातील सभा रद्द

पावसामुळं उद्धव ठाकरे यांची जालन्यातील सभा रद्द करण्यात आली आहे. सभेची तयारी झालेली असताना मुसळधार पाऊस सुरु झाल्यानं अखेर सभा रद्द करण्यात आली आहे.

पुणे : शरद पवारांची वडगावशेरी भागातील सभा रद्द

पुण्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असून याचा फटका प्रचार सभांना बसला आहे. शरद पवार यांची महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेली वडगाव शेरी भागातील सभा रद्द करण्यात आली आहे.

Weather Update: सिन्नर शहरासह तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

सिन्नर शहरासह तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी सुमारे तीन वाजेपासून पावसाला सुरुवात आकाशात विजेचा कडकडाट. शेतकरी वर्गाची पिके झाकण्यासाठी धावपळ.

Pune Weather Update: खडकवासला परिसरात वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस

  • खडकवासला परिसरात वादळ वारा, वीजांचा कडकडाटासह पाऊस सुरू झाला.

  • पावसाचे थेंब मातीवर पडल्यामुळे मातीचा सुगंध येत आहे.

  • वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सिंहगड रस्ता परिसरात सुरू आहे.

  • पावसापूर्वी सोसाट्याचा वारा वाहत होता. झाडांच्या पानांवर आणि परिसरात असलेली धूळ उडून समोरचे दृश्य दिसेनासे झाले होते मात्र त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आसमंतात गारवा निर्माण केला.

Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाने मल्लिकार्जुन खर्गे यांना फटकारले

लोकसभा निवडणुकीत व्यत्यय आणल्याबद्दल निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फटकारले.

Arvind Kejriwal Interim Bail: काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा चांगला निर्णय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्यावर काँग्रेस नेते राजीव शुक्ला म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खूप चांगला आहे. मला वाटते की हा निर्णय लोकशाहीसाठी खूप महत्त्वाचा होता, आता ते तुरुंगातून बाहेर येऊन व्यक्त लोकांसमोर त्यांचे मत व्यक्त करतील''

Weather Update: कोल्हापूर, सांगली आणि नगरमध्ये गारपिटीसह पावसाला जोरदार सुरुवात

कोल्हापूर, सांगली आणि नगरमध्ये गारपिटीसह पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे

Weather Update: कोल्हापूरसह कागल परिसरात जोरदार पाऊस सुरु

कोल्हापुरसह कागल परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे.

Weather Update: विजा, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

विजा, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अशी हवामान विभागाने सुचना दिली आहे.

Mallikarjun Kharge: PM मोदी आणि अमित शहा मतदानाच्या तीन टप्प्यांनंतर घाबरले; मल्लिकार्जुन खर्गे यांची भाजपवर टीका

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "मोदी आणि शाह मतदानाच्या तीन टप्प्यांनंतर घाबरले आहेत. ते निवडणुकीच्या मुद्द्यावर किंवा त्यांनी केलेल्या कामांवर बोलत नाहीत. ते फक्त काँग्रेसला शिव्या देतात आणि काँग्रेसच्या भाषणाचा विपर्यास करतात. कधी मुघल, कधी मटण, कधी गोमांस, कधी मुस्लिम लीग, कधी मंगळसूत्र हे शब्द PM मोदींना आवडतात.''

Jalna Voter Card : जालन्यात कचऱ्याच्या ढिगात आढळले मतदान कार्ड; तपास सुरू

जालन्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या संख्येने मतदान कार्ड पडलेले आढळले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

Rahul Gandhi: भाजपला यावेळी सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल- राहुल गांधी

भाजपला २०२४ मध्ये सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते एका सभेत बोलत होते.

BJP MP Brij Bhushan Sharan Singh: भाजप पक्ष माझ्यासोबत उभा आहे, म्हणूनच माझ्या मुलाला उमेदवारी मिळाली- ब्रिजभूषण सिंह

भाजप पक्ष आतापर्यंत माझ्यासोबत उभा आहे. त्यामुळेच इतर कोणाला तिकीट देण्यापेक्षा त्यांनी माझ्या मुलाला तिकीट दिले, असं भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणाले आहेत.

Raigad Leopard : सुधागड तालुक्यात बिबट्याची दहशत; गुरे व कुत्र्यांची करतोय शिकार

सुधागड तालुक्यातील माणगाव बुद्रुक गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी (ता.7) व बुधवारी (ता.8) रात्री गावात बिबट्या शिरल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. या बिबट्याने एका कुत्र्याची शिकार देखील केली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी तालुक्यातील माणगाव बुद्रुक परिसरातील पावसाळावाडी व उंबरवाडी गावातील गुरांना बिबट्याने ठार मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या संदर्भात गुरुवारी (ता.9) वन विभागाचे वनक्षेत्रपाल विकास तरसे व कर्मचाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन केले आहे.

Mumbai Teacher's Constituency : मुंबई शिक्षक मतदार संघावर तीन पक्षांचा दावा

सध्या समाजवादी गणराज्य पक्षाचे कपिल पाटील मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. तर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून माजी शिक्षक अधिकारी ज.मो. अभ्यंकर तर काँग्रेसकडून प्रा. प्रकाश सोनवणे संभाव्य उमेदवार आहेत. कपिल पाटील यांच्या समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष किसन मोरे यांचे नाव अग्रेसर आहे.

PM Modi in Nandurbar : 'सरकारी इफ्तारीचं आयोजन करणारे श्रीराम मंदिराला अँटी-नॅशनल म्हणतायत..'; मोदींची नंदुरबारमध्ये टीका

पंतप्रधान मोदी आज नंदुरबारमध्ये बोलत आहेत. "काँग्रेसची विचारसरणी पाहा.. रामाच्याच देशात ते राम मंदिराला अँटी-नॅशनल म्हणत आहेत. जे लोक सरकारी इफ्तारीचं आयोजन करतात.. दहशतवाद्यांच्या थडग्यांचं सुशोभीकरण करतात; ते भगवान श्रीरामाला आणि त्यांच्या मंदिरात जाणाऱ्या आम्हालाही अँटी-नॅशनल म्हणत आहेत.." अशा शब्दांमध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

Traffic Update : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टी सुरू झाल्यामुळे मोठ्या संख्येने लोक फिरायला बाहेर पडले आहेत. यामुळे ट्रॅफिक वाढल्याचं म्हटलं जात आहे.

Piyush Goyal : शरद पवार बारामतीमध्ये निवडणूक हरतील, त्यानंतर त्यांच्या पक्षात केवळ २-३ लोक उरतील

मुंबई उत्तर लोकसभा जागेसाठी भाजपकडून पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आज आपल्या मतदारसंघामध्ये रोड-शो केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, की शरद पवारांना माहिती आहे ते बारामतीमध्ये निवडणूक हरणार आहेत. त्यानंतर त्यांच्या पक्षात 2-4 लोकच शिल्लक राहतील; असंही गोयल म्हणाले.

Narendra Modi in Nandurbar : 'महाविकास आघाडी आरक्षणाचं महाभक्षण करण्याच्या तयारीत'; नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदी कडाडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबारमध्ये प्रचारसभा घेत आहेत. "महाविकास आघाही ही आरक्षणाचे महाभक्षण करण्याचं महा अभियान चालवत आहे. दुसरीकडे SC, ST आणि ओबीसींचं आरक्षण टिकावं यासाठी मोदी आरक्षणाच्या महा रक्षणाचा यज्ञ करत आहे" असं ते म्हणाले.

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; नागरिकांना अलर्ट

जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजौरीमध्ये संपूर्ण आभाळ काळ्या ढगांनी वेढलं गेलंय. काही ठिकाणी पाऊस सुरू देखील झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

PM Modi in Nandurbar : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नंदुरबारमध्ये 

पंतप्रधान मोदी आज नंदुरबारमध्ये प्रचारसभा घेत आहेत. यावेळी आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे, तसंच तिसऱ्या टर्ममध्ये आपण आणखी गरीबांना घरं देऊ अशी घोषणा त्यांनी केली. विकासकामांमधअये काँग्रेस मोदींचा सामना करू शकत नाही, असंही ते म्हणाले.

नांदेडमध्ये खासगी कंपनीच्या ३ शाखा आणि चालकाच्या घरावर छापे

नांदेड शहरातील शिवजीनगर भागात आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले. चार ते पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एका खाजगी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तीन शाखा आणि चालकाच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. सकाळपासून झाडाझडती सूरू आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणी निकाल वाचनाला थोड्याच वेळात होणार सुरूवात

डॉ. दाभोलकर प्रकरणात जेलमधील आरोपींना अजून हजर करण्यात आलेले नाही यामुळे न्यायाधीश थांबले आहेत.

पिंपळवंडी येथे बिबट्या जेरबंद; परिसरातील नागरीकांनी सोडला सुटकेचा निश्वास

पिंपळवंडी(ता.जुन्नर)येथील लेंडेस्थळ या ठिकाणी शुक्रवारी(या.१०) मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चार दिवसांपुर्वी लेंडेस्थळ येथील अश्विनी हुलवळे हि तेवीस वर्षीय तरुणी शेतात काम करत असताना सायंकाळच्या वेळेस बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते.या घटनेनंतर वनविभागाच्या वतीने या परिसरात बिबट्याला पकडन्यासाठी पिंजरे लावले होते.यातील एका पिंजऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबटया जेरबंद झाला.

Pune Lok Sabha: रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साड्या वाटप करणं समर्थकास भोवलं

पुणे लोकसभा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साड्या वाटप करणं समर्थकास भोवलं आहे. निवडणुक भरारी पथकाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साडया वाटप करणे व विनापरवानगी बॅनरबाजी करणे धंगेकर यांच्या समर्थकास भोवले आहे. निवडणुक भरारी पथकाकडून यासंर्दभात दत्तवाडी पोलीस ठाण्यात निवडणूक आचारसंहिता उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचेकडे भाजपच्या कार्यकर्त्या माधवी निगडे यांनी लेखी तक्रार केली आहे. सदर तक्रारीनुसार काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची हिंदमाता प्रतिष्ठान संस्था आहे. हिंदमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे शहरातील लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे विविध विधानसभा मतदारसंघात संत महंत व शक्ती पीठाचे पादुकांचे दर्शनाचे व महाप्रसादचे कार्यक्रम आयोजित केले होते.

Sanjay Raut: संजय राऊत यांच्याविरोधात नागपूरमध्ये गुन्हा

भारतीय जनता पक्षाने शिवसेना (UBT) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल नागपुरात एफआयआर दाखल केला आहे, असे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे.

Income Tax: नांदेडमध्ये आयकर विभागाचे छापे

नांदेडमधील शिवाजीनगरमध्ये आयकर विभागाने पाच ते सहा कंपन्यांवर आज सकाळी छापे टाकले आहे. सध्या अधिकारी चौकशी करत आहे.

Kedarnath Dham: हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाल्यानंतर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

Mumbai Rain: मुंबईला बसणार अवकाळीचा फटका, 15 मे पर्यंत पावसाची शक्यता

मुंबईला येत्या 15 मे पर्यंत अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे राज्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसा होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येणार आहे. मात्र याच वेळेत पाऊस पडल्यास राजकीय पक्षांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

MLA H. D. Revanna : रेवण्णाच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब

बंगळूर : महिलेच्या अपहरणप्रकरणी तुरुंगात असलेले धजदचे आमदार एच. डी. रेवण्णा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने सोमवारपर्यंत तहकूब केली. जामिनासाठी एच. डी. रेवण्णा यांनी दाखल केलेल्या अर्जावर शहराच्या लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात सुनावणी झाली.

Dam News : राधानगरी, काळम्मावाडी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर : शिरोळ तालुक्याला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी राधानगरी धरणातून ८५०, तर काळम्मावाडी धरणातून (गैबी बोगदा) ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदी दुतर्फा ओसंडून वाहत आहे.

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, 8 जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात आज (शुक्रवार) पहाटे सव्वाचारच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुसाट वेगात जाणारी कार, पाईप वाहून नेणारा ट्रक आणि कोंबड्या वाहून नेणारा टेम्पो ही तीन वाहने एकमेकांवर आदळली. या भयानक घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

CM Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या जामिनास 'ईडी'कडून विरोध

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर आज (ता.१०) सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध करणारे शपथपत्र सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात सादर केले. कायदा सर्वांना समान असतो आणि निवडणुकीसाठी प्रचार करणे हा मूलभूत, घटनात्मक किंवा कायदेशीर देखील अधिकार नाही असे या शपथपत्रात नमूद करण्यात आले.

Narendra Dabholkar Murder Case : तब्बल 10 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज (ता. १०) जाहीर करण्यात येणार आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली असून हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली लागत आहे.

Rahul Gandhi Bus Travel : काँग्रेस नेते राहुल गांधींनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत बसमधून केला प्रवास

हैदराबाद, तेलंगणा : काँग्रेस नेते आणि वायनाड-रायबरेली मतदारसंघातील पक्षाचे लोकसभा उमेदवार राहुल गांधी आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सभेनंतर आरटीसी बसमधून प्रवास केला. तेलंगणातील लोकसभेच्या सर्व 17 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे.

12th Board Exam : कैद्यांनी तुरुंगातून गुजरात बोर्डाची परीक्षा केली उत्तीर्ण

सुरत, गुजरात : सुरतच्या लाजपोर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी तुरुंगातून गुजरात बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. लाजपोर तुरुंगाचे अधीक्षक जशू देसाई म्हणाले, 'सुरतच्या लाजपोर तुरुंगात एकूण 9 कैदी 12 वीच्या परीक्षेला बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत.'

Fireworks Factory Fire : तमिळनाडूत फटाक्यांच्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू

विरुधनगर : तमिळनाडूमधील शिवकाशी येथे फटाकानिर्मितीच्या कारखान्यात आग लागून पाच महिलांसह नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. कारखान्याला लागलेल्या आगीत फटाक्यांचा साठा असलेल्या सात खोल्या जळून बेचिराख झाल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

राज्यभर आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता; नागपूर, भंडारा, गोंदियात गारपिटीचा इशारा

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल आज (ता. १०) जाहीर करण्यात येणार आहे. या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली असून हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली लागत आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. तसेच पुण्यात राज ठाकरे यांची संध्याकाळी 6 वाजता जाहीर सभा पार पडणार आहे. उन्हाच्या चटक्यांनी अक्षरशः होरपळून निघालेल्या महाराष्ट्रात पुण्यासह १९ जिल्ह्यांमध्ये आज (शुक्रवार) पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला. तसेच, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही खात्याने दिला आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.