Latest Marathi News: दिवसभरात देश-विदेशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

अजित पवार आणि शरद पवार एका लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र आले होते. वाई इथं एका लग्नसोहळ्यानिमित्त हे दोघे एकत्र आले होते. सध्या लोकसभा निवडणुकीनिमित्त हे दोघेही काका पुतणे एकमेकांविरोधात लढत आहेत. पण या लग्नसोहळ्यानं त्यांना एकत्र आणलं.

मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

मुसळधार पावसामुळे आसामच्या दिमा हासाओ जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक भागात भूस्खलन झाल्याने दळणवळण विस्कळीत झाले आहे.

T20 वर्ल्डकपसाठी शिवम दुबेला का निवडलं? रोहितने स्पष्टच सांगितलं

आम्ही शिवम दुबेला त्याने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या तसेच त्याआधीचे काही परफॉर्मन्स याच्या अधारे निवडले, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले.

रोहित शर्मा बीसीसीआयच्या मुख्यालयात पोहोचला

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात पोहोचला असून थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरूवात होणार आहे.

भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

भाजपने रायबरेली मतदारसंघातून दिनेश प्रताप सिंग आणि उत्तर प्रदेशातील कैसरगंजमधून करण भूषण सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

High Court: राजस्थानमध्ये बालविवाह झाल्यास पंच-सरपंच जबाबदार असतील, उच्च न्यायालयाने सरकारला दिला मोठा आदेश

राजस्थानमध्ये अक्षय्य तृतीयेच्या आधी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला राज्यात बालविवाह होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच बालविवाह झाल्यास सरपंच आणि पंच जबाबदार असतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. प्रामुख्याने अक्षय्य तृतीयेला बालविवाहाच्या अनेक घटना घडतात.

Lokshabha Elections 2024: 'तुम्ही देशात 370 परत आणू शकणार नाही, CAA हटवू शकणार नाही', पंतप्रधान मोदींचे विरोधी पक्षांना आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जुनागढ येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना खुले आव्हान दिले आणि म्हणाले - मी काँग्रेस आणि त्यांच्या सर्व पक्षांना आव्हान करतो. तुम्ही देशात 370 परत आणू शकणार नाही किंवा CAA काढू शकणार नाही.

Lokshabha Elections 2024: अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

अमेठी आणि रायबरेलीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीवर पक्षाचे नेते जयराम रमेश बोलले आहेत. ते म्हणाले की, काँग्रेस निवडणूक समितीने पक्षाध्यक्षांवर संपूर्ण जबाबदारी टाकली आहे. आज संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Rohit Sharma Ajit Agarkar Press Conference Live Updates : रोहित-आगरकर संघाबाबत माध्यमांशी बोलणार

T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी संघाची घोषणा करण्यात आली, मात्र त्याबाबत कोणतीही पत्रकार परिषद झाली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. दोघेही नुकत्याच जाहीर झालेल्या T20 विश्वचषकासाठी भारताच्या संघावर चर्चा करतील.

Bus Accident In Assam: खराब हवामानामुळे बसचा अपघात

दिमा हासाओ जिल्ह्यात मुसळधार पावसाने लोक हवालदिल झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले. दिमा हासाओ जिल्ह्यात खराब हवामानामुळे बसचा अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे. या अपघातात सुमारे 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.काल रात्री बस त्रिपुराहून गुवाहाटीला जात होती.

Lokshabha Elections 2024: “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

वोट जिहादबाबत देशात चर्चेला उधाण आले आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान म्हणाले की, विरोधी आघाडीचा हेतू धोकादायक आहे. ते म्हणाले की, इंडिया आघाडीच्या एका नेत्याने त्यांची रणनीती देशासमोर उघड केली आहे. इंडिया आघाडीने मुस्लिमांना वोट जिहादसाठी जाण्यास सांगितले आहे.

मोदी म्हणाले की, सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन मतदान करावे, असे इंडिया आघाडी म्हणत आहे. पंतप्रधान काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची भाची आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम खान यांच्या भाषणाचा संदर्भ देत होते, ज्यात त्या मुस्लिमांना 'व्होट जिहाद'साठी आवाहन करत होत्या.

Rajeev Chandrasekhar : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

केंद्रीय मंंत्री राजीव चंद्रशेखर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. "माझा प्रतिमा भौमिक यांच्यासोबतचा एका फोटो एडिट करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसने एका CPM नेत्याचा फोटो जोडला आहे. मुस्लिम व्होट बँकेसाठी हा अपप्रचार केला जात आहे." असं चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलं.

Rahul Gandhi Amethi : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या (शुक्रवार) दुपारी आपला उमेदवारी अर्ज भरतील. एबीपीच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. दुपारी 12 वाजता राहुल गांधी आपला अर्ज भरतील.

Naresh Mhaske : नरेश म्हस्केंच्या उमेदवारीमुळे भाजप नाराज? पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यामुळे भाजप नाराज असल्याचं समजत आहे. नवी मुंबईमधील कित्येक भाजप पदाधिकाऱ्यांनी यामुळे राजीनामे दिल्याचं आता समोर आलं आहे.

Amit Shah : अमित शाहांचं काँग्रेसवर टीकास्त्र

आपल्या व्होट बँकेच्या भीतीने राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली नाही; अशा शब्दांमध्ये अमित शाहांनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

Uttar Pradesh: वर्गातच स्विमिंग पूल...

उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील एका सरकारी शाळेने वाढत्या तापमानामुळे वर्गातच स्विमिंग पूल बनवला आहे.

Harishchandra Pawar Dindori: भाजपची डोकेदुखी वाढणार, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

भाजप नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरी मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरणार आहेत. चव्हाणांच्या या निर्णयामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे

Narayanpur, Chhattisgarh: शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलविरोधी कारवाईच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. यावेळी घटनास्थळावर 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

Sanjay Raut: 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे. ११ दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली, असा सवाल ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार- चित्रा वाघ

ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती.

Mumbai News: कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन करण्यात आलं आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी नर्सला मारहाण केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलं आहे.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

कल्याण लोकसभा मतदारसंघातून आज शिवसेनेचे श्रीकांत शिंदे अर्ज भरणार आहेत. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. महायुतीमधील बडे नेते यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Mumbai News: अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील पंप हाऊस परिसरात मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. पंप हाऊस परिसरात असलेल्या एका दारू दुकानाला ही आग लागली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बंद असलेल्या दारू दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणावर दुकानातील माल जळून खाक झाला आहे.

दारूत असलेल्या अल्कोहोलमुळे आग अधिक पसरू लागली मात्र गस्तीवर असलेल्या विवेक लोबे या पोलीस शिपायाच्या लक्षात येताच ताबडतोब अग्निशमन दलाला फोन करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. वाईन शॉप च्या आजूबाजूला झोपडपट्टी असल्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटी कडून त्वरित या ठिकाणी चा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही.

Uddhav Thackeray: ठाकरे पितापुत्र २ दिवस कोकणात

उद्धव ठाकरे यांची उद्या शुक्रवारी नारायण राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत जाहीर सभा आहे. तर शनिवारी आदित्य ठाकरे यांची सावंतवाडीत जाहीर सभा होणार 

Kokan Politcal News: नितीन गडकरी रविवारी सावंतवाडीत

भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता.५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सावंतवाडीमध्ये सभा होणार असल्याची माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Kalyan News: आधी शिंदेंच्या शिवसेनेत तर काही तासांमध्येच ठाकरे गटामध्ये प्रवेश

कल्याणच्या एका माजी नगरसेवकाने २४ तासांत दोन पक्ष बदलल्याचं समोर आलं आहे. माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी दिवसभरात दोनदा पक्षप्रवेश केला आहे. त्यांनी सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी काही तासांमध्येच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.

Thane News: १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

२०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर थकीत रकमेसह एकत्रितपणे महापालिकेकडे १५ जूनपर्यंत जमा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करावर १० टक्के सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासने दिली आहे.

Odisha Mayurbhanj : हेमंत सोरेन यांची बहीण अंजनी सोरेन यांना लोकसभेची उमेदवारी घोषित

रांची (झारखंड) : झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ने बुधवारी अधिकृतपणे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बहीण अंजनी सोरेन यांना ओडिशातील मयूरभंज लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले. ती JMM संस्थापक शिबू सोरेन यांची मुलगी आहे.

Government of India : गोल्डी ब्रार भारत सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित

गोल्डी ब्रारला भारत सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून विदेशात राहून भारतामध्ये गुन्हेगारी वाढवण्याचे काम गोल्डी ब्रारकडून केले जात होते. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारकडून स्वीकारण्यात आली.

Madha Lok Sabha : शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटलांचा भाजपला पाठिंबा जाहीर

सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांनी आता भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकरांची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. अभिजीत पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई केल्यानंतर त्यांनी आता भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मोहिते पाटलांसाठी हा धक्का मानला जात आहे.

Heat Wave : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागात उष्णतेची लाट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.

Bangalore Airport : बंगळूर विमानतळावर ५० लाखांचे सोने जप्त

बंगळूर : येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन महिलांकडून ५० लाखांचे ७१८ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. दुबईहून बंगळूरला आलेल्या इंडिगो विमानातून दोन भारतीय महिला विमानतळावर उतरल्या. महसूल विभागाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्या दोन महिलांना अडविले. शंका आल्यानंतर त्यांना कस्टम अधिकाऱ्यांकडे सोपविले. अधिकाऱ्यांनी त्यांची कसून तपासणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांना दोन्ही महिला अंतर्वस्त्रातून ७१८ ग्रॅम सोन्याची तस्करी करत असल्याचे आढळून आले. पावडरच्या स्वरूपात सोने दोन्ही महिला अंतर्वस्त्रातून तस्करी करत होत्या. दोन्ही महिलांनी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे.

Gujarat BJP office : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात भाजप मुख्यालयाला दिली भेट

गांधीनगर : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री ते गांधीनगर येथील गुजरात भाजप मुख्यालयात पोहोचले. मोदी साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर शहरात निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते, त्यानंतर त्यांनी गांधीनगर येथील गुजरात भाजप मुख्यालयाला भेट दिली.

Sangli Lok Sabha : भाजपच्या सांगण्यावरूनच विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवताहेत, चंद्रहार पाटलांचा आरोप

सांगली : विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील म्हणाले, त्यांच्या उमेदवारीचा एक टक्काही आम्हाला तोटा होणार नाही. ते भाजपची 'बी' टीम आहे. भाजपच्या सांगण्यावरूनच ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, असा आरोप त्यांनी केलाय.

Lok Sabha Elections : राहुल गांधी आज शिमोगा, रायचूर प्रचार दौऱ्यावर

बंगळूर : काँग्रेसच्‍या उमेदवार गीता शिवराजकुमार यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज (ता. २) शिमोगा येथे येणार आहेत, असे जिल्हापालक मंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह महत्त्वाचे नेते प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि राहुल गांधी दुपारी १२ वाजता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Obscene Video Case : रेवण्णा पिता-पुत्रांना एसआयटीची नोटीस

Latest Marathi News Live Update : नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आज गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसच्‍या उमेदवार गीता शिवराजकुमार यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज शिमोगा येथे येणार आहेत. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्रे पुरवणाऱ्या आरोपी अनुज थापरने तुरुंगात आत्महत्या केलीये. हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाने माजी मंत्री एच. डी. रेवण्णा आणि प्रज्वल यांना चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com