Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

31 मार्च 2024 (रविवार) रोजी सरकारी पावत्या आणि देयकांवर व्यवहार करणाऱ्या बँका व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याची विनंती भारत सरकारने केली आहे.

नाना पटोले लढणार लोकसभेची निवडणूक?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती येत आहे. काँग्रेसच्या संभाव्य १२ उमेदवारांची यादी समोर आलेली आहे. यामध्ये पटोले हे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून उभे राहणार असल्याचं सांगितलं जातंय.

निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारांना कठोर पावलं उचलण्याचे आदेश

देशात अजूनही फलकांवर राजकीय जाहिराती आणि अनधिकृत जाहिराती झळकत आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. काँग्रेस आणि इतरांकडून अशा तक्रारी प्राप्त होत असल्याने आयोगाने यावर कठोर पावलं उचलण्याचे आदेश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने दिले आहेत.

31 मार्चला खुल्या राहणार देशभरातील बँका

31 मार्च 2024 (रविवार) रोजी सरकारी पावत्या आणि देयकांवर व्यवहार करणाऱ्या बँका व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याची विनंती भारत सरकारने केली आहे जेणेकरून आर्थिक वर्ष 2023 मधील पावत्या आणि देयकांशी संबंधित सर्व सरकारी व्यवहारांचा हिशेब ठेवता येईल.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रभू श्रीरामांच्या चरणी

अभिनेत्री प्रियांका चोप्राने, पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत आयोध्येतील राम मंदिराला भेट देत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.

तामिळनाडूमध्ये बेहिशेबी रोकड जप्त 

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तमिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये एक लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली.

ग्वादर बंदर प्राधिकरणावर दहशतवादी हल्ला

पाकिस्तानातील ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलावर नुकताच बलुच दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 8 दहशतवादी मारले गेले.

मानवतावादी मदत करत राहू

भारत आपल्या लोककेंद्रित दृष्टिकोनानुसार युद्धादरम्यान मानवतावादी मदत देत राहील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना दिले.

पंतप्रधान मोदींचा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा हाच मार्ग असल्याचा पुनरुच्चार केला.

बिहारमधील जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन

बिहारचे नेते पप्पू यादव यांनी बुधवारी त्यांचा जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि नवी दिल्लीत औपचारिकपणे पक्षात प्रवेश केला.

अमरोहा लोकसभा खासदार दानिश आली यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अमरोहा लोकसभा खासदार दानिश आली यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आज दिल्लीत त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

Mumbai Crime News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १.७६ लाख रुपयांचे सोने जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १.७६ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. महिलांच्या चपला, टुल बॉक्स, कपडे, हॅण्ड ब्लेंडर तसेच खेळण्यातून सोन्याची तस्करी सुरू होती. तसेच अनेक प्रवाशांनी सोने त्यांच्या शरीरात लपवल्याचे तपासत उघड झाले आहे.

एकूण ३ किलो सोन जप्त केलं असून वेगवेगळ्या एकूण ८ प्रकरणांमध्ये कस्टम्स विभागाने कारवाई केली होती. यामध्ये चार आयफोनसह १.१८ लाखांचे अमेरिकन डॉलर देखील जप्त करण्यात आलेत.

बजरंग सोनवणे यांचा शरद पवार गटात प्रवेश

बजरंग सोनवणे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

कैलास शिंदे नवी मुंबई मनपाच्या आयुक्तपदी

नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कैलास शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

भूषण गगरानी मुंबई मनपाचे नवे आयुक्त

मुंबई मनपाच्या आयुक्तपदी भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली आहे. ठाणे मनपाच्या आयुक्तपदाचा भार सौरभ राव यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली- हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील यांची महायुतीबाबत नाराजी असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

आता डिपॉझिट जप्त करणार- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहे. यावेळी ते म्हणाले की, बुलढाण्यात समोरच्याच डिपॉझिट जप्त करुन दाखवणार.

बजरंग सोनवणे जेजुरी गडावर दाखल

अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर बजरंग सोनवणे हे जेजुरी गडावर दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

Raj Thackrey: राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

राज ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाहांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ असल्याची माहिती मिळत आहे.

TMC : तृणमूल नेत्याच्या कार्यालयावर आयटी अधिकाऱ्यांची छापेमारी

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल नेते स्वरुप बिस्वास यांच्या कार्यालयावर आयटी छापेमारी सुरू आहे.

Harshavardhan Patil : फडणवीस-हर्षवर्धन पाटील यांच्यातील चर्चा सकारात्मक

देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये आज बैठक पार पडली होती. त्यांच्यातील चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता यांनी दिली.

Maharashtra Politics : महादेव जानकर-शरद पवार यांच्यात बैठक

शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे. यानंतर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू होणार आहे. मोदी बागेमध्ये सकाळी 11 वाजेपासून शरद पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकी सुरू आहेत.

सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या घटनेत बसमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात ४९ विद्यार्थी आणि शिक्षक बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

नागपुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल

नागपुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

अजित पवारांकडून आढळरावांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

शिवाजी आढळवार पाटील अजित पवार गटाचे उमेदवार असल्याची आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणत्याही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

पुण्यात भाजपला मोठा धक्का! गिरीश बापट यांचे जवळचे सहकारी सुनील माने जाणार शरद पवार गटात

पुण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. गिरीश बापट यांचे जवळचे सहकारी राहीलेले सुनील माने यांचा शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. आज मोदीबाग या ठिकाणी असलेल्या पवारांच्या कार्यालयात प्रवेश होणार आहे. शिवाजीनगर मतदारसंघात निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते.

Satara: उदयनराजे- देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा, सातारा लोकसभेचा तिढा सुटणार?

उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांच्यात दोन तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Zomato : झोमॅटोची 'प्युअर व्हेज फ्लिट' हिरवा नाही तर लाल रंगाचा घालणार टीशर्ट

झोमॅटोने प्युअर व्हेज लोकांसाठी वेबसाईटवर वेगळा पर्याय दिला आहे. या 'प्युअर व्हेज फ्लिट'चे कर्मचारी हिरव्या रंगाचा टीशर्ट घालतील असं सांगितलं जात होतं. पण, ते लाल रंगाचा टीशर्ट घालणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Accident News: परभणी-जिंतूरदरम्यान अकोलीत बस पुलावरुन कोसळली; १५ ते २० जण जखमी

परभणी-जिंतूरदरम्यान अलोकीत बस पुलावरुन कोसळली आहे. त्यामुळे १५ ते २० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. बस जिंतूरवरुन सोलापूरला जात होती.

Mahadev Jankar: महादेव जानकर आज शरद पवार यांना भेटणार

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. महायुतीमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याने जानकर नाराज आहेत. शिवाय लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट महत्त्वाची आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडूंना दिलासा, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा रद्द

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१८ मधील गोपाळ तिरमारे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणाचा गुन्हा नागपूर खंडपीठाने अवैध ठरवला आहे. (संपूर्ण बातमी येथे वाचा)

Cricketer KL Rahul : क्रिकेटपटू केएल राहुलने महाकालेश्वर मंदिरात केली पूजा

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलने आज मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात पूजा करत दर्शन घेतले.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ झरदारींच्या मुलीची राजकारणात एन्ट्री, पोटनिवडणुकीसाठी दाखल केला अर्ज

इस्लामाबाद : पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची धाकटी कन्या असिफा भुट्टो झरदारी यांनी तिच्या वडिलांनी सोडलेल्या नॅशनल असेंब्लीच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज सादर करून औपचारिकपणे राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. सिंध प्रांतातील NA-207 मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आसिफा यांनी रविवारी अर्ज दाखल केला.

Weather Update : येत्या दोन दिवसांत मध्य भारत आणि पूर्व भारतात पावसाची शक्यता

नवी दिल्ली : यूपी-बिहार ते दिल्ली एनसीआरपर्यंतच्या हवामानात आज कोणताही महत्त्वपूर्ण बदल दिसणार नाहीये. तथापि, छत्तीसगड आणि झारखंडसारख्या देशाच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये आज म्हणजेच 20 मार्च रोजी खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार वादळ, गारपीट आणि विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत मध्य भारत आणि पूर्व भारतात पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटलंय.

Pakistan Earthquake : पाकिस्तानात पहाटे 2:57 वाजता 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

आज पहाटे 2:57 वाजता पाकिस्तानात 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

PM Narendra Modi visit Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 22 मार्च दरम्यान भूतान दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 22 मार्च दरम्यान भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Farmers Agitation : दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, सिंघू-टिकरी सीमेवर लावलेले बॅरिकेड्स हटवले

दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा पाहता सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेड्स हटवण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ३७ व्या दिवशी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, सिंघू आणि टिकरी सीमेवर लावलेले बॅरिकेड्स हटवले. तंबू आणि भिंती हटवण्याचे कामही सुरू झाले आहे.

Loksabha Election : दिल्लीत आज काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक

Latest Marathi News Live Update : दिल्लीत आज काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक होणार असून त्यात लोकसभेसाठी उमेदवारांची निवड निश्चित होणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघांतील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. शिवाय, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत अद्याप निर्णय झालेला नाही; पण खासदार शरद पवार यांनी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांना पुण्यात भेटण्यासाठी बोलावून घेतलं. या वेळी सातारा लोकसभेबाबत विविध विषयांवर दोन्ही नेत्यांत तासभर बंद दाराआड चर्चा झाली. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com