Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारसभेसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सोलापुरात येणार आहेत.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक

जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा येथे पोलिसांनी दोन दहशतवादी साथीदारांना अरागम भागात अटक केली. त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळली, चेंगराचेंगरी

इचलकरंजी येथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रपती मुर्मू रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतले.

तेलंगणाचे माजी CM केसीआर यांना ४८ तासांसाठी निवडणूक प्रचाराला बंदी

शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनख्यानं अफझलखानाचा वध केला ते कथित ऐतिहासिक वाघनखं महाराष्ट्र सरकार राज्यातील जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध करुन देणारं आहे. पण हे वाघनखं महाराष्ट्रात येण्यास अद्याप मुहूर्त लागत नाहीए, आता पुन्हा एकदा याचं येणं लांबलं आहे. ​10 जूनपर्यंत वाघनखं महाराष्ट्राय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्यानं ती संपल्यानंतर पुढील प्रक्रिया होईल, असं मुनगटीवार यांनी सांगितलं. ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. यासाठी ब्रिटनच्या आधिकाऱ्यांनी होकार कळवला असून हा करार पूर्ण करण्यासाठी परवानगी दिली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ही प्रक्रिया सुरु आहे.

उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत - शिंदे

नाशिक, ठाणे आणि कल्याणच्या जागेवरील उमेदवार जाहीर झाल्यानंतर तसेच संजय निरुपण यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांची विकेट आधीच पडली आहे, ते क्लीनबोल्ड झाले आहेत असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

अभिनेता साहिल खानच्या पोलीस कोठडीत वाढ

महादेव अॅप घोटाळा प्रकरणी अभिनेता साहिल खान याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे, ७ मे पर्यंत त्यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संजय निरुपम एकनाथ शिंदेंच्या भेटीला

काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी बाळासाहेब भवनात दाखल झाले आहेत. या भेटीदरम्यान ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

उदय सामंत यांच्या कार्यालयावरील बॅनर हटवले

किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या कार्यालयावरील बॅनर हटवले. हे पोस्टर का काढले याची माहिती कळू शकलेली नाही. किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी नाकारुन भाजप नेते नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळं ते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Shivsena: शिवसेनेचे उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला

महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

 Aarti Drugs Case: अटारी ड्रग्ज जप्ती प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने अटारी ड्रग्ज जप्ती प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला अटक केली, अटक करण्यात आलेल्या लोकांची संख्या आता आठ झाली.

Maneka Gandhi : भाजपच्या मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

भाजपच्या मनेका गांधी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. यूपीमधील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवतील. याठिकाणी समाजवादी पक्षाने भीम निषद यांना उमेदवारी दिली आहे.

Salman Khan: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

सलमान खानच्या घराबाहेर केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

Latest Marathi News Live Update: दिल्लीतून विजयासाठी कन्हैया कुमारची फिल्डिंग, केजरीवालांच्या पत्नीची घेतली भेट

"आम्ही गेली अनेक वर्षे हुकूमशाहीविरुद्ध लढत आहोत. हुकूमशाहीविरुद्धच्या या लढ्यात आम्ही सर्वजण एकत्र आहोत, हे सांगण्यासाठी मी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली,आम्ही देशाच्या लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करू," असे काँग्रेस नेते आणि दिल्लीतील उमेदवार कन्हैया कुमार म्हणाला.

राज्य सहकारी बँकेकडून पंढरपुर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

राज्य सहकारी बँकेकडून पंढरपुर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस आजच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

⁠उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यामध्ये या विषयावर चर्चा झाल्यानंतरही नोटीस प्रसिद्ध झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या भेटीमध्ये लोकसभेला महायुतीच्या उमेदवारांना मदत करण्याचे आश्वासन अभिजीत पाटील यांनी दिला होता. ⁠त्या बदल्या त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत करण्यात येणार होती. ⁠मात्र त्यानंतरही साखर जप्तीची नोटीस राज्य सहकारी बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

"काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

भाजप अवघ्या 10 वर्षात जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला आहे, काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं केली, असं आसाममध्ये प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या.

 Ayodhya Ram Mandir Trust: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांची राहुल गांधींवर टीका

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, "राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्राणप्रतिष्ठेला बोलावण्यात आले नाही. कारण त्या आदिवासी आहेत. राहुल गांधींचे हे विधान असत्य, निराधार आणि दिशाभूल करणारे आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण देण्यात आले होते. मी राहुल गांधींना वस्तुस्थिती जाणून घेण्याची विनंती करतो. अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, सर्वांना निमंत्रण देण्यात आले होते.''

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथील कार्यालयात घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

  • नरेंद्र मोदी नाशिकला येत आहेत त्याबाबत आज भुजबळ यांनी माहिती दिली

  • या भागात भुजबळ साहेबांना जाण आहे त्यामुळे नियोजना बाबत चर्चा झाली

  • नाशिकच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील

  • मुख्यमंत्री जो उमेदवार देतील ते महायुती म्हणून आम्ही निवडून आणणार

  • अजून 18 दिवस बाकी आहेत त्यामुळे प्रचाराला वेळ आहे

  • भुजबळ साहेबांनी उमेदवारी माघे घेतल्यावर ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली हे स्वाभाविक आहे

Maharashtra Day: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे. वेगळ्या विदर्भासाठी लढा देणाऱ्या विदर्भ राज्य पार्टीकडून नागपुरातील व्हेरायटी स्क्वेअर येथे महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ काळेवस्त्र परिधान करून तसेच डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवत निदर्शने करत आहे. लक्ष वेधून घेण्यासाठी अंगाला काळे फलक लावून सुद्धा काही पदाधिकारी दिसून येत आहे.

PDP Protest : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

जम्मू आणि काश्मीरमध्ये PDP पक्षाने आंदोलन सुरू केलं आहे. निवडणूक आयोगाविरोधात हे आंदोलन सुरू आहे.

Delhi School Bomb Threat : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

दिल्लीतील काही शाळांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी आज सकाळी देण्यात आली होती. मात्र, ही धमकी खोटी असण्याची शक्यता आहे, असं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा योग्य ती पावले उचलत असून, घाबरून जाण्याची गरज नाही असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.

China Highway : चीनमध्ये भूस्खलनात वाहून गेला हायवे; भीषण अपघातात सुमारे 19 ठार

चीनमध्ये भूस्खलन झाल्यामुळे चक्क हायवेच वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे कित्येक गाड्यांचा अपघात झाला. यात सुमारे 19 लोकांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचा 'बुलडोझर पॅटर्न' सांगलीत.. योगी आदित्यनाथ यांच्या स्वागताला आणले जेसीबी

खा. संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज सांगलीत सभा घेणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी चक्क जेसीबी आणि बुलडोझर मागवण्यात आले आहेत. जेसीबींमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. विश्रामबाग चौकात श्री राम प्रतिष्ठानच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं आहे.

Delhi Bomb Threat : दिल्ली अग्निशमन विभागाला 60 हून अधिक फोन; शाळांमध्ये बॉम्ब तपासणी सुरू

दिल्लीमधील शाळांना आज सकाळीच बॉम्बची धमकी आली होती. यासोबतच शहरातील अग्निशमन दलाला देखील 60 पेक्षा अधिक फोन कॉल आले असल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळांची तपासणी केली जात असून, अद्याप कुठेही बॉम्ब आढळला नसल्याचं सांगण्यात येतंय.

Bhushan Patil : भूषण पाटील यांना काँग्रेस पक्षाकडून AB फॉर्म देण्यात आला

भूषण पाटील हे काँग्रेसचे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यांना आज पक्षाकडून AB फॉर्म देण्यात आला.

Traffic Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने होत आहे. गेल्या चार-पाच तासांपासून इथे ट्रॅफिक जॅम झालं असून; दोन्ही बाजूंनी सुमारे 15 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचं सांगण्यात येतंय.

Delhi School Bomb Threat : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

दिल्लीतील 100 हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी पाठवण्यात आली होती. यानंतर प्रशासन अलर्ट झालं असून, विद्यार्थ्यांना शाळांमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. दिल्ली पोलीस सर्व शाळांची तपासणी करत असून, अद्याप कुठेही बॉम्ब आढळून आलेला नाही; अशी माहिती अतिशी यांनी दिली आहे.

Shiv Sena : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

महायुतीने ठाणे आणि कल्याण लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. ठाण्याची जागा ही शिवसेनेलाच गेली असून, याठिकाणी नरेश म्हस्केंना उमेदवारी दिली आहे. तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Ajit Pawar : गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडे बोलण्यासाठी एकही ठोस मुद्दा नाही. म्हणूनच ते छोटे-छोटे मुद्दे वर काढत आहेत; असं ते म्हणाले.

Naresh Mhaske : ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी मिळण्याची शक्यता

ठाण्यातून लोकसभेसाठीशिवसेनेकडून नरेश म्हस्केंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. एबीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थोड्याच वेळात याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

MNS Raj Thackeray: राज ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन

महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज हुतात्मा स्मारकास अभिवादन केले. यावेळी मनसेचे अनेक नेते उपस्थित आहेत.

Sanjay Raut: काहींकडून महाराष्ट्राला कमजोर करण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांची मोदींवर टीका

काहींकडून महाराष्ट्राला कमजोर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काहींचे भटकते आत्मे राज्यात फिरत आहेत. महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकणार नाही. शिवसेना असेपर्यंत महाराष्ट्र झुकणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Ambadas Danve: आपलं दैवत कोणी बदलत नाही- अंबादास दानवे

राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजप घराघरांमध्ये वाद लावत आहे. देव पावला नाही म्हणून कोणी नमस्कार करणं सोडत नाही. आपलं दैवत कोणी बदलत नाही, असं विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Delhi News: दिल्लीत द्वारकामधील पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेल द्वारे देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून शोध सुरु आहे. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.

Ajit Pawar: मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही. दिली असेल तर त्याचं एक उदाहरण द्या. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते असे आरोप करत आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. ते पुणे येथे बोलत होते.

Devendra Fadanvis: दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही. त्यांना उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता ठाकरे गटाच्या नेत्यावर टीका केली. ते नागपूरमध्ये बोलत होते.

LPG Gas Cylinder : व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 19 रुपयांनी कपात

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. आजपासून 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 19 रुपयांनी कपात करण्यात आलीये, तर दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून 1,745.50 रुपये आहे.

Latest Marathi News Live Update
LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Delhi Public School : दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब? पोलीस घटनास्थळी दाखल

द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या शोध मोहीम सुरू आहे.

Maharashtra Day : संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ६४ व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी बलिदान दिलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

UP Crime : बारीपूर सिद्धपीठाच्या पुजाऱ्याची बेदम मारहाण करुन हत्या

देवरिया : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा प्रसिद्ध बारीपूर सिद्धपीठाचे सहायक पुजारी अशोक चौबे यांना बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. हत्येचे वृत्त समजताच जिल्ह्यात संतापाची लाट पसरली. मृत सहाय्यक पुजारी अशोक चौबे हे तेनुआ चौबे गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Solapur Temperature : सोलापूर शहराचा पारा वाढला, तापमान ४४ अंशावर

सोलापूर : शहरात तापमानाचा पारा वाढतच चालला असून मंगळवारी ४४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारचा दिवस यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचा सर्वांत उष्ण दिवस ठरला आहे. सोलापूरकरांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ दिवसांत राज्यातील तापमान कमालीचे वाढले आहे.

Nashik Lok Sabha : नाशिकच्या उमेदवाराची आज घोषणा करणार : मंत्री गिरीश महाजन

नाशिक : लोकसभेच्या नाशिकच्या जागेसंदर्भात सस्पेन्स कायम असून जागेसंदर्भात महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे सांगताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीच्या उमेदवाराची बुधवारी (ता. १) घोषणा केली जाणार आहे. गुरुवारी (ता. २) नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज शक्तीप्रदर्शनातून दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.

Delhi Congress Committee : देवेंद्र यादव यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद

नवी दिल्ली : दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या हंगामी अध्यक्षपद काँग्रेसचे सरचिटणीस देवेंद्र यादव यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अरविंदसिंग लव्हली यांनी राजीनामा दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाच्या नियुक्तीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मान्यता दिली. ‘आप’सोबत झालेल्या आघाडीने नाराज झालेल्या अरविंदरसिंग लव्हली यांनी ऐन निवडणुकीच्या काळात राजीनामा दिला आहे.

Yogi Adityanath : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारसभेसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज (बुधवारी) सोलापुरात येणार आहेत. दुपारी दीड वाजता वालचंद महाविद्यालयाजवळील वल्याळ मैदानावर सभा होणार आहे. कोल्हापूर विमानतळावर उतरून ते हेलिकॉप्टरने सोलापुरात येणार आहेत.

Nashik Lok Sabha : महायुतीकडून नाशिकची उमेदवारी आज जाहीर होण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारसभेसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सोलापुरात येणार आहेत. राज्यभरात आज महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. लोकसभेच्या नाशिकच्या जागेसंदर्भात सस्पेन्स कायम असून जागेसंदर्भात महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे सांगताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीच्या उमेदवाराची आज घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले. दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या हंगामी अध्यक्षपद काँग्रेसचे सरचिटणीस देवेंद्र यादव यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com