LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. LPGच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
LPG price cut Prices of commercial LPG cylinders slashed by 19rs
LPG price cut Prices of commercial LPG cylinders slashed by 19rs Sakal

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 1 मे पासून तत्काळ प्रभावीपणे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 19 रूपयांनी कमी केल्या आहेत. यासह, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत ₹ 1,745.50 इतकी झाली आहे.

या सिलिंडरच्या किमती झाल्या कमी

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 19 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र, या कपातीचा लाभ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. यावेळीही घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मागील महिन्यातही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच १ एप्रिलपासून १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ३५ रुपयांनी कमी करण्यात आली होती. त्याआधी सलग तीन महिने व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ होताना दिसत होती.

LPG price cut Prices of commercial LPG cylinders slashed by 19rs
Share Market Closing: प्रॉफिट बुकिंगमुळे बाजार घायाळ; सेन्सेक्स 188 अंकांनी खाली, कोणते शेअर्स घसरले?

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 'जैसे थे'

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च महिन्यात कमी झाली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त (8 मार्च 2024) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

LPG price cut Prices of commercial LPG cylinders slashed by 19rs
Paytm Payments Bank: पेटीएम वॉलेटला मोठा झटका! ग्राहकांची संख्या झाली कमी; कोणाला झाला फायदा?

तेल विपणन कंपनी इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, 1 मे पासून राजधानी दिल्लीत 9 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी (दिल्ली एलपीजी किंमत) कमी झाली आहे आणि त्याची किंमत 1764.50 रुपयांवरून 1745.50 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1717.50 रुपयांवरून 1698.50 रुपयांवर आली आहे. चेन्नईमध्येही हा सिलेंडर १९ रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत १९३० रुपयांवरून १९११ रुपयांवर आली आहे.

LPG price cut Prices of commercial LPG cylinders slashed by 19rs
Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com