Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

लोकसभेच्या बीड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अंबाजोगाई येथे सभा होणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघात झाला असून भरधाव चारचाकीच्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघे ठार झाले असून यामध्ये ३ शाळकरी मुलांचा समावेश आहे.

हिंगोलीत पाच व्यापारी दुकानांना आग

हिंगोलीत पाच व्यापारी दुकानांना आग लागली आहे. ही आग कशामुळं लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल  

- पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- काल रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्याप्रकारणी 2024च्या आदेशानुसार आचारसंहिता भंग प्रकरणे गुन्हा दाखल.

- निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केलीय

- रात्री PDCC बँकेत 40 ते 50 लोक रात्री संशयतरीत्या फिरत असल्याचं CCTV मध्ये भरारी पथकाच्या निदर्शनास आल्याने बँक मॅनेजर यांच्यासह बँकेवर गुन्हा दाखल

- रोहित पवार यांनी ही वेल्हा PDCC बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

- त्यानुसार भरारी पथकाने खातरजमा करून आचारसंहिता भंग केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

नांदेड शहरातील अष्टविनायक नगर येथे गोळीबाराची घटना घडली असून रवींद्र रामराव जोशी यांच्या घरासमोरच 2 अज्ञात व्यक्तीने गोळीबार करत जोशी यांच्या जवळील मोबाइल आणि बँकेतून काढून आणलेले पैसे हल्लेखोर घेऊन पसार झालेत आहेत.

जोशी हे बँकेतून पैसे काढून घरी येत असताना घराच्या गेटजवळ हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळीबार केला. या हल्लेखोरांनी 3 राऊंड फायर केले. यात जोशी यांच्या हाताला जखम झाली असून जोशी यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार करताच हल्लेखोर पसार झालेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

PM Modi In Beed : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता -  पीएम मोदी

बीडमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रसच्या काळात मराठवाड्याचा विकास सखडला होता असा आरोप केला.

काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला, यावेळी काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील असे पीएम मोदी म्हणाले.

आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

आम आदमी पक्षाचे दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या मुलाने नोएडा सेक्टर 95 मधील पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

"आज देशाच्या कानाकोपऱ्यात तरुण बेरोजगारीला सामोरे जात आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना भयंकर भेदभावाचा सामना करावा लागत आहे. हे वातावरण पंतप्रधानांच्या हेतूमुळे आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर आहे. .काँग्रेस आणि भारत युती संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी समर्पित आहे आणि सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी काँग्रेसला मत द्या आणि आपण मिळून एक मजबूत आणि अखंड भारत घडवूया..." - सोनिया गांधी

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशाच्या हिताचे मुद्दे नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं - देवेंद्र फडणवीस

निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं आहे. आजच्या सभेने सर्व सभांचा रेकॉर्ड मोडला आहे, असे फडणवीस म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये सभा आहे.

अभिनेते शेखर सुमन यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर अभिनेते शेखर सुमन आणि काँग्रेसच्या माजी नेत्या राधिका खेरा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली.

पालघर लोकसभा निवडणुकीसाठी चिन्हवाटप

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके, निवडणूक निरीक्षक अजय सिंग तोमर, अपर जिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ६) चिन्हांचे वाटप करण्यात आले. या वेळी बहुजन विकास आघाडीला आपली पूर्वीची निशाणी ‘शिट्टी’ हे चिन्ह मिळाले. चिन्ह वाटप झाल्याने उमेदवारांच्या प्रचाराला आता जोर येणार आहे.

लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणात दहा उमेदवार उतरले आहे. त्यानंतर उर्वरित १० उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यतप्राप्त पक्षांचे चिन्ह निवडणूक आयोगाने ठरवून दिले आहेत. तर अपक्ष आणि उर्वरित पक्षांना विविध चिन्हे बहाल केली आहेत. यात तीन अपक्ष उमेदवारांना अनुक्रमे खाट, विहीर, बॅटरी अशी चिन्हे मिळाली आहेत. आता यानंतर प्रचाराला वेग येणार नाही. त्यादृष्टीने उमेदवार, कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. सध्या पालघर लोकसभा मतदारसंघात बविआ, महायुती आणि मविआच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे सांगण्यात येते.

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

व्लादिमीर पुतिन यांनी ग्रँड क्रेमलिन पॅलेसच्या सेंट अँड्र्यू हॉलमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली 

Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Shekhar Suman: मी स्वत:ला राजकारणी मानत नाही- अभिनेते शेखर सुमन

अभिनेते शेखर सुमन म्हणाले, "मी स्वत:ला राजकारणी मानत नाही. मी अभिनेता राहीन पण आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्या अंतर्गत आपण काय करू शकतो याचा विचार करून मी भाजपात आलो आहे. मला वाटते की आपण हे करू शकतो. आपण बसून खूप बोलतो आणि आपण भारतीय आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.

Jammu and Kashmir: दहशतवादविरोधी कारवाईत ठार झालेल्या 2 दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले

दहशतवादविरोधी कारवाईत ठार झालेल्या 2 दहशतवाद्यांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. ओळख तपासली जात आहे. पोलिसांची कारवाई चालू आहे.

Congress Leader Digvijay Singh: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले, "ही माझी शेवटची निवडणूक आहे कारण मी 77 वर्षांचा झालो आहे आणि आम्ही नवीन तरुणांना संधी देऊ. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी 100 टक्के आशावादी आहोत."

Delhi BJP: अरविंद केजरीवालांच्या विरोधात दिल्ली भाजप रस्त्यावर

दिल्लीतील भाजप कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधा आंदोलन केले. दिल्ली मद्य गैरव्यवहाराप्रकरणी केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

दिल्ली दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 3 मे रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा विचार केला जाऊ शकतो जेणेकरून ते निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकतील.

Jammu And Kashmir: चकमकीनंतर जम्मू आणि काश्मीर मध्ये सुरक्षेत वाढ

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी पायेन भागात सोमवारी रात्री उशिरा चकमक सुरू झाल्यानंतर सुरक्षा कडक करण्यात आली.

US On Pannu Case: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्येच्या कथित कटाच्या भारताच्या तपासाची आम्ही वाट पाहत आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Delhi Fire: दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

दिल्लीतील कोतवाली सेक्टर-113 परिसरातील सेक्टर-75 मध्ये असलेल्या गोल्फ सिटीजवळील फास्ट फूडच्या दुकानांना मंगळवारी सकाळी अचानकपणे आग लागली.

Chandra Babu Naidu: निवडणूक आयोगाकडून टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना ताकीद

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल निवडणूक आयोगाने सोमवारी तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना इशारा दिला.

Raj Thackeray: यामिनी जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

दक्षिण मुंबईच्या शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

Tactical nuclear weapons drills: युरोपसोबत तणाव असताना रशियाच्या अण्वस्त्रांच्या कवायती

युरोपकडून धमकी मिळाली असल्याने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशिया अण्वस्त्रांच्या कवायती घेणार आहे.

Salman Khan: अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखने पाचव्या आरोपीला अटक केली आहे. मोहम्मद चौधरी नावाच्या आरोपीला राजस्थानवरून अटक करण्यात आलीये. गोळीबार करणाऱ्यांना लॉजिस्टिक्स मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. काही वेळातच गुन्हे शाखेचे पथक आरोपीला घेऊन मुंबईत येणार आहेत.

Sanjay Raut: अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. अमित शहा यांनी बोरिवली येथे भाड्याने घर घेतल्याची माहिती मला मिळत आहे. लोकसभा निवडणुका होईपर्यंत ते इथेच राहणार आहेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

PM Modi: पंतप्रधान मोदींची मुंबईमध्ये १५ तारखेला सभा

मुंबईतील ६ जागा जिंकण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी शाह मैदानात उतरणार आहेत. पंतप्रधान मोदींचा मुंबईत १७ मे रोजी रोड शो होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे रोजी मुंबईत पहिली जाहीर सभा घेणार आहेत, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 12 तारेखला सभा होईल.

Israel-Hamas war: : गाझा पट्टीतील राफा भागात अनेक स्फोट

इस्राइल आणि हमासमधील संघर्ष सुरुच आहे. इस्राइलने गाझाच्या दक्षिण भागातील राफा भागात अनेक ठिकाणी हल्ले केल्याची माहिती आहे.

West Bengal Rain : 10 मे पर्यंत अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

आज पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या चार जागांसाठीही मतदान होत आहे. एक दिवस आधी, सोमवारी बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. पुढील काही दिवस राज्यात पाऊस सुरू राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. हवामान खात्याने सांगितले की, 10 मे पर्यंत पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. हवामान संस्थेने ईशान्येकडील राज्यांजवळ अनेक चक्री चक्रीवादळांचा अंदाज वर्तवला आहे.

Solapur Temperature : सोलापुरात सहा दिवसांत दोनदा ४३ अन्‌ ४४ अंश तापमान

सोलापू्र : शहर व परिसरात मे महिन्याच्या सुरवातीपासूनच कडक उन्हाळा राहिला आहे. मे महिन्यातील सहा दिवसांत सोलापूरचे तापमान दोन दिवस ४३ अंश सेल्सिअस पार तर दोन दिवस ४४ अंश सेल्सिअस पार राहिले आहे.

Nitesh Rane : संतोष परब हल्ल्याप्रकरणी नीतेश राणे यांना न्यायालयाचा दिलासा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नीतेश राणे यांचा जामीन रद्द करा, अशी मागणी करून राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.

Punjab Accident : वैष्णोदेवीचे दर्शन करून परतताना महाराष्ट्रातील चौघांचा पंजाबात अपघाती मृत्यू

चिखलदरा/जामली : वैष्णोदेवीचे दर्शन करून परत येत असताना जालंधर येथे झालेल्या भीषण अपघातात सोलामहू गावात राहणाऱ्या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला झाला. दोघे गंभीर जखमी आहेत. गानू बेलसरे, लोकेश गानू बेलसरे,अनिषा लोकेश बेलसरे, नेहारिका लोकेश बेलसरे यांचा मृत्यू झाला.

Sunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या ७ मे रोजी तिसऱ्यांदा अवकाशामध्ये झेप घेणार होत्या. पण, तांत्रिक कारणामुळे त्यांची ही अवकाश भरारी पुढे ढकलण्यात आलीये. पुढील तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अत्याचार करणाऱ्यांना सोडता कामा नये, त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे - PM मोदी

नवी दिल्ली : प्रज्वल रेवन्ना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, प्रज्वलसारख्या लोकांसाठी झिरो टॉलरेंस धोरण आहे. कर्नाटक सरकारने प्रज्वलला देश सोडण्याची परवानगी दिली. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. गुजरातमध्ये ही घटना घडली असती, तर त्याला गुजरात सरकार जबाबदार असतं. या प्रकरणी अशीच पावले उचलण्याची जबाबदारी कर्नाटक सरकारची आहे. अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्यांना सोडता कामा नये, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.

Lok Sabha Elections : झारखंडमध्ये घरगड्याच्या घरी नोटांचा डोंगर, ‘ईडी’च्या छाप्यात ३० कोटींची रोकड जप्त

रांची : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या घरगड्याच्या घरात सुमारे तीस कोटींची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली.

बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ

बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस पडतोय. यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी ट्विटव्दारे पोलखोल केली आहे. यामध्ये भोर तालुक्यातील 'अजितदादा मित्रमंडळा'चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत. यासाठीच पाहिजे होती का 'Y' दर्जाची सुरक्षा? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थिक केला आहे.

महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड, नगरमध्ये

बीड : लोकसभेच्या बीड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. ७) अंबाजोगाई येथे सभा होणार आहे. अंबाजोगाईतील केज मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. नगर दक्षिण व शिर्डी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठीही नगरला मंगळवारी (ता. ७) मोदी यांची जाहीर सभा होत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे-पाटील व शिर्डीमधून सदाशिव लोखंडे रिंगणात आहेत. नगर शहरातील निरंकारी भवनासमोरील मैदानावर दुपारी सभा आहे.

Police Station : नड्डा, मालवीय, विजयेंद्र यांच्याविरोधात एफआयआर दाखल

बंगळूर : भाजपच्या राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान युनिटचे प्रमुख अमित मालवीय, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्रच्या विरोधात हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Micro Finance : बेळगावात २१ लाखांची रोकड पळविली

बेळगाव : येथील संगमेश्‍वनगर येथील मायक्रो फायनान्स कार्यालयातील लॉकरमधून तब्बल २१ लाखांची रोकड चोरट्यांनी पळविल्याचे सोमवारी (ता. ६) सकाळी उघडकीस आले आहे.

Kolhapur Hatkanangale Lok Sabha : महाविद्यालयांना आज सुटी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आज, मंगळवारी मतदान होणार आहे. त्यानिमित्त विद्यापीठाने कॅम्पसमधील विविध अधिविभाग, कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली असल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी दिली.

Lok Sabha Elections : राज्यातील तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात आज निवडणुका होत आहेत. राज्यातील निवडणुकीतील हायव्होल्टेज लढती असणारा हा टप्पा आहे. बारामती, माढा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, धाराशिव, लातूर, हातकणंगले याठिकाणी आज मतदान होणार आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार असा नणंद-भावजय यांच्यात सामना होत आहे.

Beed Lok Sabha : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

Latest Marathi News Live Update : लोकसभेच्या बीड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अंबाजोगाई येथे सभा होणार आहे. तर, लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. भाजपच्या राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान युनिटचे प्रमुख अमित मालवीय, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्रच्या विरोधात हाय ग्राउंड्स पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुजरातमधील सर्व जागांवर आज मतदान होणार असतानाच अहमदाबादमधील सहा शाळांमध्ये बाँब ठेवल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडालीये. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या मंगळवारी तिसऱ्यांदा अवकाशामध्ये झेप घेणार असून त्या भगवद्‍गीता आणि गणपतीची छोटी मूर्ती सोबत नेणार आहेत. इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (आयसीएसई) ‘आयसीएस’ई दहावी आणि ‘आयएससी’च्या बारावीच्या मुख्य परीक्षेचा निकाल सोमवारी मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये दहावीचा निकाल ९९.९६ आणि बारावीचा ९९.७१ टक्के लागला आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.