फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार असून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा प्रमुखांमार्फत ऑनलाइन पद्धतीने भरले जाणार आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे, तुरळक विषय घेणारे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे श्रेयांक हस्तांतरण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज संकेतस्थळावरून भरता येणार आहेत.