Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

Ganesh Visarjan Live Updates: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांचा गजर, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाला निरोप दिला जात आहे. विसर्जन मिरवणुकीतील क्षणोक्षणीचे अपडेट्स, वाहतूक व्यवस्था, महत्त्वाचे बदल आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

Pune Live मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ

पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला असून, बाप्पाच्या दर्शनासाठी आणि मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाची मिरवणूक पुढे सरकत असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com