
कन्नड Live टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे
कन्नड तालुक्यातील पाणपोई येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडे वर्षभरापासून सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. थकीत रक्कम मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. शेतकऱ्यांची थकीत रक्कम तातडीने मिळवून देण्यासाठी बाजार समितीने ठोस कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.