Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Breaking Marathi News Live Update : Maharashtra News, Mumbai-Pune News, Politics, Weather, Crime, Sports आणि देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे दिवसभरातील ताजे अपडेट्स जाणून घ्या.
Latest Marathi Live Update News

Latest Marathi Live Update News

esakal

Jalgaon Live ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप, दिवाळीपूर्वी भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित केळी पीक विमा काढलेल्या सुमारे ९० हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ४५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीने कोणतीही पडताळणी न करता नामंजूर केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विवेक सोनवणे यांनी केला आहे. संकेतस्थळावर क्षेत्र अस्तित्वात नसल्याचा शेरा देत शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून चटणी भाकर खात काळी दिवाळी साजरी करण्याचा इशाराही दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com