Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरु असणाऱ्या बिग बॉसचा फिनाले आज पार पडतो आहे. यामध्ये आता टॉप थ्री स्पर्धकांमध्ये अंकिता, अभिषेक अन् मुनव्वरमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. यंदाचा सीझनमध्ये कोण विजेता होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
live blog
live blogsakal

खरी फाईट अभिषेक अन् मुनव्वरमध्येच! कोण जिंकणार?

बिग बॉसच्या १७ व्या सीझनच्या अंतिम सोहळ्यामधील उत्कंठा आता शिगेला पोहचली आहे. शेवटचे दोन स्पर्धक राहिले असून त्यात अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारुखी यांच्यात जोरदार स्पर्धा असल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अंकिता आणि मनरा, अरुण हे बाहेर पडले आहेत.

श्रेयस पुराणिकला मिळाला मानाचा आरडी बर्मन पुरस्कार!

फिल्मफेयरमध्ये मानाचा समजला जाणारा आर डी बर्मन बेस्ट अपकमिंग म्युझिक टँलेंट पुरस्कार हा श्रेयस पुराणिकला मिळाला आहे. सतरंगासाठी पुरस्कार मिळाला आहे. यावेळी त्यानं त्याच्या भावना व्यक्त करताना ज्यांना आपण संगीतातील आदर्श मानतो त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद असल्याचे म्हटले आहे.

बेस्ट स्क्रिनप्ले साठी १२ वी फेलला पुरस्कार, अक्षय कुमारच्या ओमजी २ ला सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार

६९ व्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे. त्यामध्ये विधु विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेलची चर्चा आहे. त्याला बेस्ट स्क्रिन प्ले साठी गौरविण्यात आले आहे. तर सर्वोत्कृष्ट कथेसाठी अक्षय कुमारच्या ओएमजी २ ला पुरस्कार देण्यात आला आहे.

आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींनी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे निवेदन द्यावं- भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले की, राज्यामध्ये झुंडशाहीच्या जोरावर बॅकडोअर एण्ट्री केली जात आहे. त्यामुळे आता ओबीसींनी लाखोंच्या संख्येने घराबाहेर पडलं पाहिजे. सर्व ओबीसी बांधवांनी एक तारखेला आपल्या भागातले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, तहसीलदार यांना निवेदन देऊन आरक्षण वाचवण्याची चळवळ ज्वलंत केली पाहिजे.

''एकीकडे सांगायचं ओबीसींना धक्का लागणार नाही, दुसरीकडे प्रमाणपत्र द्यायचं''

छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बोलावलेली ओबीसी नेत्यांची बैठक संपली आहे. एकीकडे सांगायचं ओबीसींना धक्का लागणार नाही आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, अशी दुहेरी भूमिका सुरु असल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

LIVE Bigg Boss 17 Finale : आता लढत अंकिता, अभिषेक अन् मुनव्वरमध्ये

बिग बॉसच्या फिनालेमध्ये आता टॉप थ्री मध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुखी आणि अभिषेक कुमार हे स्पर्धक आहेत. यात मुनव्वर आणि अभिषेकमध्ये जोरदार फाईट असल्याचे बोलले जात आहे.

बिग बॉसच्या फिनालेतून 'मनेरा' अन् 'अरुण' बाहेर!

बिग बॉस १७ च्या फिनालेमधून प्रियंका चोप्राची बहिण मनेरा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांना बाहेर पडावे लागले आहे. त्यांचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो - नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट केले आहे की, "माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. बिहारमध्ये NDA आघाडीसोबत नवीन सरकार स्थापन झाले आहे... NDA आघाडीचे सरकार आहे. केंद्र आणि राज्यात विकासकामांना गती मिळेल...'

"आम्ही एकत्र राहू"; शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार काय म्हणाले?

"आम्ही एकत्र राहू, 8 नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आणि बाकीचे लवकरच सामील होतील. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे...", असे नितीश कुमार म्हणाले.

Narendra Modi: बिहारमधील एनडीए सरकार राज्याच्या विकासासाठी कोणतीही कसर सोडणार - नरेंद्र मोदी

बिहारमध्ये स्थापन झालेले एनडीए सरकार राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि सम्राट चौधरी जी आणि विजय सिन्हा जी यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की ही टीम माझ्या राज्यातील माझ्या कुटुंबियांची पूर्ण समर्पणाने सेवा करेल.

Maratha Reservation : छगन भुजबळांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून ओबीसी नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nitish Kumar Takes Oath : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत इतर 8 नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमध्ये एकूण 8 नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपकडून तीन - सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, प्रेम कुमार. JDU कडून तीन - विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रवण कुमार आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) अध्यक्ष संतोष कुमार सुमन आणि अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

Nitish Kumar Takes Oath : डॉ. संतोष कुमार सुमन यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (सेक्युलर) अध्यक्ष डॉ. संतोष सुमन यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबत अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

Nitish Kumar Takes Oath : जेडीयूचे नेते बिजेंद्र प्रसाद, विजय कुमार चौधरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

जेडीयूचे बिजेंद्र प्रसाद यादव, विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.

Nitish Kumar Takes Oath : भाजपचे सम्राट चौधरी यांनी घेतली बिहारच्या मंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचे सम्राट चौधरी विजय कुमार सिन्हा, प्रेम कुमार यांनी बिहारच्या मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Nitish Kumar Takes Oath  : नितीश कुमार यांनी घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार यांनी त्यांच्या पक्षासह भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील झाल्यानंतर 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Nitish Kumar : नितीश कुमार राजभवनात दाखल; 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

पाटणा : JD(U) चे अध्यक्ष आणि बिहारचे कार्यवाहक मुख्यमंत्री नितीश कुमार राजभवनात दाखल झाले आहेत. ते त्यांच्या पक्षासह भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीत सामील झाल्यानंतर ते 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत.

Arvind Kejarival : हरियाणात विधानसभेच्या ९० जागा आप स्वबळावर लढवणार - केजरीवाल

आप हरियाणात विधानसभेच्या सर्व ९० जागा स्वबळावर लढवणार आहे, परंतु लोकसभा निवडणुका इंडिया आघाडीचा भाग म्हणून लढल्या जातील अशी घोषणा पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

हेमंत सोरेन यांना पुन्हा समन्स; झारखंड मुक्ती मोर्चाकडून ईडीविरोधात निदर्शने

रांची: झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) कार्यकर्त्यांनी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री आणि जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना नवीन समन्स जारी केल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाविरुद्ध निदर्शने केली.

Nitish Kumar : 'नितीश सब के हैं'; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाटण्यात पोस्टरबाजी

नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि भाजपच्या नेतृत्वाखालील NDA मध्ये सामील झाल्यानंतर पटणा येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ "नितीश सब के हैं" असे लिहिलेले नितीश कुमार यांचे पोस्टर लावण्यात आले आहे.

येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषेच्या सक्तीचा नियम लागू होणार- दीपक केसरकर

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी भाषा हा सक्तीचा विषय असावा, असं मत मांडलं होतं. यावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर यांनी आश्वासन दिलं की येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषेच्या सक्तीचा नियम लागू करण्यात येईल.

अमरावतीतील गुरुदास बाबाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

अमरावतीच्या आश्रमातील गुरुदास बाबाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडीत इंजिनिअर महिलेचा खून करणाऱ्याला मुंबईतून अटक

हिंजवडीतील एक लॉजवर इंजिनिअर महिलचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर या आरोपीने पळ काढला होता. इंजिनिअर महिलेचा खून करणाऱ्या या आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

प्रत्येक मराठ्याला प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही- मनोज जरांगे

मराठा आऱक्षणाच्याबाबतीत अधिसूचना जारी केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवालीची वाट धरली होती. त्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "प्रत्येक मराठ्याला प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही."

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; आता राज्यात उच्चशिक्षण मराठीत घेता येणार

आता राज्यात उच्चशिक्षण मराठीत घेता येणार आहे. अशी घोषणा दीपक केसरकर यांनी केली आहे. याच बरोबर शाळांना १ली ते १०वी मराठी अनिवार्य केले आहे. असेही ते म्हणाले

Bihar Politcs:बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार येणार एकत्र!

बिहारचे कार्यवाहक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली JD(U), भाजप, HAM आणि एका अपक्ष आमदाराने राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली असून बिहारमध्ये राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला

Sanjay Raut: अहमदनगरमध्ये गुंडांचं राज्य सुरु; संजय राऊत यांची संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता टीका

अहमदनगरमध्ये सध्या गुंडांचं राज्य सुरु आहे. अशी टीका संजय राऊत यांची आ. संग्राम जगताप यांच्यावर केली.

Vinayak Raut: मराठा समाजाला आणि जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी फसवलं

मराठा समाजाला आणि जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी फसवलं असा दावा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. यावेळी त्यांनी

Ahmednagar: शेततळ्याच्या मंजुरीसाठी घेतली ५ हजारांची लाच, मंडळ कृषी अधिकारी निलंबित

मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर सातपुते यांनी शेततळ्याच्या तांत्रिक मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच स्वीकारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. याची दखल थेट राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतली असून, याप्रकरणी मंडल कृषी अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.

Maratha Andolan: लवकरच सुरु होणार आंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची बैठक

आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची आपल्या प्रमुख आंदोलकांसोबत बैठक लवकरच सुरु होणार आहे.

Raj Thackeray: समोरच्या व्यक्तीशी मराठीतच बोला - राज ठाकरे 

विश्व मराठी संमलेनात मनसे प्रमुख राज ठाकरे बोलत होते. यावेळी समोरच्या व्यक्तीशी मराठीतच बोला असे आवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले.

Raj Thackeray: सर्व शाळात पहिली ते दहावी मराठी भाषा अनिवार्य करा; राज ठाकरेंची मागणी

विश्व मराठी संमलेनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं की, सर्व शाळात पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी. पंतप्रधानांना आपल्या राज्याबाबत प्रेम लपवता येत नाही, तर आपण का लपवावी.

Mallikarjun Kharge on Nitish Kumar's exit : असं घडेल हे माहिती होतं; नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया

असं काही घडेल याची कल्पना होती अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर दिली आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Nitish Kumar: नितीश कुमार यांचा राजीनामा; भाजपसोबत सत्ता स्थापन करणार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहेत.

Bihar Raj Bhavan in Patna: बिहारच्या राजभवनाबाहेर सुरक्षा वाढवली; जेडीयूची बैठक सुरु

बिहार राजभवनाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नितीश कुमार यांच्या निवासस्थानी जेडीयूची बैठक पार पडत आहेत. नितीश कुमार थोड्याच वेळात राजभवनाकडे निघण्याची शक्यता आहे.

Chhagan bhujbal : सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरुय- छगन भुजबळ

सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरु आहे. पण, ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो हे सरकार विसरलंय, असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

chhagan bhujbal : आज छगन भुजबळ यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक

सरकारने मराठा आरक्षण अध्यादेशाचा मसुदा काढल्यानंतर आज छगन भुजबळ यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली आहे. आजच्या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. मराठा आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्यावर ओबीसीसह इतर समाजातील बांधवांनी १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवा असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे.

Kalkaji Temple Stampede: कालकाजी मंदिरात जागरणा दरम्यान कोसळला स्टेज

दिल्लीच्या कालकाजी मंदिरात जागरण सुरू असतानाच अचानक स्टेज कोसळून सुमारे १७ जण जखमी झाले आणि एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

Maratha Reservation: आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक

मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे गोदापट्ट्यातील 123 गावातील मराठ्यांची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मोठा संघर्ष केला. यावेळी मराठा समाज त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहिला. त्यानंतर काल राज्य सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

NCP Political Crisis: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात उद्या सुनावणी

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात उद्या सुनावणी होणार आहे.

सिस्तान-बलुचिस्तानमध्ये नऊ पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या

इराणचा आग्नेय प्रांत सिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये नऊ पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झाहरा बलोच यांनी एका निवेदनात म्हटलंय की, "ही एक भयानक आणि घृणास्पद घटना आहे. आम्ही त्याचा निषेध करतो."

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी (ता. २९) पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २९) श्री. पवार हे शासकीय विश्रामगृहावर सकाळी ८.३० ते दहा यावेळेत नागरिकांची गाऱ्हाणी ऐकणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या उपस्‍थितीत जिल्ह्यातील विकासकामांबाबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर ते दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

Kolhapur-Ayodhya Railway : 13 फेब्रुवारीला कोल्हापूर-अयोध्या विशेष रेल्वे धावणार

कोल्हापूर : अयोध्येतील राम मंदिर पाहण्यासाठी कोल्हापुरातून १३ फेब्रुवारी रोजी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. कोल्हापुरातून रात्री ११.१५ वाजता अयोध्येसाठी ही रेल्वे सुटेल व १५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता अयोध्येत पोहोचेल. अयोध्येतून परतीच्या प्रवासाला ही रेल्वे १६ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता सुटेल व कोल्हापुरात १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल. यामुळे अयोध्येत दर्शनासाठी दोन दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

आरक्षण मिळालं, आता पुढील दिशा काय? अंतरवाली सराटीत आज जरांगे घेणार बैठक

आता पुढील दिशा काय असेल, हे ठरवण्यासाठी आज (ता. २८) दुपारी १२ वाजता बैठक घेणार आहे. पुढे काय करायचे याचा निर्णय बैठकीत घेतला जाणार आहे. राज्यातील मराठा बांधवांचा (Maratha Community) हा विजय आहे. सांडलेल्या रक्ताचा बदला आरक्षण घेऊन पूर्ण केला. लोकांनी मोठा त्रास सहन केला’’, असे मनोज जरांगे अंतरवाली सराटीत म्हणाले.

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जाहीर सभेला पश्चिम बंगाल प्रशासनाने परवानगी नाकारली

सध्या काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील तणाव आता वाढत चालला आहे. राहुल गांधींच्या जाहीर सभेला पश्चिम बंगाल प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. रविवारी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा एक भाग म्हणून सिलीगुडी येथे जाहीर सभा होणार होती. मात्र, पोलिसांची परवानगी न मिळाल्याने ती रद्द करण्यात आली.

CM Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज राज्यपालांकडे मागितली वेळ

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (रविवार) राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली असल्याची माहिती आहे.

नितीशकुमारांचे बिहारमध्ये पुन्हा 'कमल'राज, पाटण्यात खलबतांना वेग

पाटणा : बिहारमध्ये सत्तानाट्याचा दुसरा अंक सुरू झाला असून संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीशकुमार हे भाजपसोबत हातमिळवणी करून पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रीय जनता दलानेही (आरजेडी) सत्ता सोडण्याची पूर्ण तयारी केली आहे.

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळांनी शासकीय निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बोलावली बैठक

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेले वादळ मुंबईच्या वेशीवरच थोपविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी प्रमाणपत्र असलेल्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील तसेच प्रमाणपत्र देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलीये. तसेच मनोज जरांगे काल रात्री उशिरा अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत, तर आज मंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे.

या शिवाय, बिहारमध्ये सत्तानाट्याचा दुसरा अंक सुरू झाला असून संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सर्वेसर्वा नितीशकुमार हे भाजपसोबत हातमिळवणी करून पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रीय जनता दलानेही (आरजेडी) सत्ता सोडण्याची पूर्ण तयारी केली आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.