Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सध्या राज्यासह देशभरात पुण्यातील कल्याणीनगर मध्ये अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघाताची चर्चा आहे. याचबरोबर रेमाल चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

बीडचे अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत नकोत-बजरंग सोनवणे

बीडचे अधिकारी मतमोजणीच्या प्रक्रियेत राहिले तर निकाल उलटा-सुलटा करतील, त्यांच्यावर कुणाचाच वचक राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर राहिलं ठेवलं पाहिजे, अशी मागमी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला रेमल चक्रीवादळाचा आढावा

रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खरदारीचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा पंतप्रधान यांनी घेतला. पंतप्रधान यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत माहिती घेतली. या वादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF च्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ पुढच्या 6 तासांत वादळात रूपांतरित होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण, भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणातील भावेश भिंडे याला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

'हिट अँड रन' प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्तालयात चर्चा सुरू

'हिट अँड रन' प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्तालयात चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडीत

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झालं आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. रस्त्यावर झाडं पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

लातुरच्या चाकुरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी झाडे कोसळली

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला.  चाकुरमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

राजस्थानात उष्णतेचा कहर, फलोदी येथे ४९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

२६ मे रोजी, राजस्थानमधील सर्वोच्च तापमान फलोदी येथे ४९.८ अंश सेल्सिअस आणि बारमेरमध्ये ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

दिल्ली न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटल दुर्घटना प्रकरणात बेबी केअर सेंटरच्या मालकाला अटक

दिल्ली न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटल दुर्घटना प्रकरणात दिल्ली पोलिसांनी बेबी केअर सेंटरच्या मालकाला अटक केली आहे. विवेक विहार येथील नवजात शिशु देखभाल रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.

उत्तर प्रदेशात भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू  

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील खेरी पोलीस ठाण्याच्या नाकाहा शंकरपूर महामार्गावर वेगवान बस आणि मिनी वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.

West Bengal: रेमाल चक्रीवादळाचा परिणाम; कोलकाताकडे जाणारे फ्लाइट ऑपरेशन्स रद्द

West Bengal: रेमाल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोलकाता (CCU) येथील विमान उड्डाणे स्थगित करण्यात आले आहेत. 26 मे 2024 रोजी रात्री 1200 तासांपासून ते 27 मे 2024 रोजी 0900 तासांपर्यंत कोलकाता (CCU) कडे जाणारी सर्व फ्लाइट ऑपरेशन्स रद्द करण्यात आली आहेत.

West Bengal: 12 कोटी रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

West Bengal: भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफने 12 कोटी रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणाऱ्यांना अटक केली आहे.

Mumbai News: मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून महापालिकेने नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.या कामांचा आढावा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत.

remal cyclone: आज रात्री बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार रेमल चक्रीवादळ

रेमल चक्रीवादळ आज रात्री बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाची प्रणाली तीव्र चक्रीवादळ रेमलमध्ये तीव्र झाली आणि रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर पडण्याची शक्यता आहे.

Beed News: मांजरा धरणातील पाणीसाठा संपला

बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठा आता संपला आहे.यामुळे तीन जिल्ह्यातील अनेक भागांवर भीषण पाणीटंचाई ओढावण्याची शक्यता आहे.

डोंबिवली अमुदान कंपनी स्फोटात एनडीआरफने शोधकार्य थांबवलं

Eknath Shinde : नागरिकांनी नदी नाल्यांमध्ये कचरा फेकू नये - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी नागरिकांनी नदी नाल्यांमध्ये कचरा फेकू नये, असे आवाहन केले.

remal cyclone: 'रेमल' चक्रीवादळावर नजर ठेवण्यासाठी सुंदरबनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन

'रेमल' चक्रीवादळावर नजर ठेवण्यासाठी सुंदरबनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. IMD नुसार, चक्रीवादळ 'रेमाल' येत्या काही तासांत तीव्र चक्री वादळात रूपांतरित होणार आहे

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे प्रचंड वाहतूक कोंडी

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील नालेसफाईची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी अधिकारी देखील उपस्थित होते.

दिल्ली न्यू बॉर्न बेबी केअर सेंटर आगीत 12 मुलांना वाचवण्यात यश 

एकूण 12 मुलांना वाचवण्यात आले, त्यापैकी 6 मरण पावले आहेत, 1 व्हेंटिलेटरवर आहे आणि 5 इतर रुग्णालयात दाखल आहेत: दिल्ली अग्निशमन सेवा

विवेक विहार येथील न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटलमध्ये काल रात्री उशिरा भीषण आग लागली.

Sea Tourism: कोकणातील जलपर्यटन 31 ऑगस्टपर्यंत बंद

आजपासून 31 ऑगस्टपर्यंत कोकणातील जलपर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खवळलेल्या समुद्रामुळे ही प्रशासनाने ही पाऊले उचलली आहेत.

Mumbai Ahmedabad High Way: मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सकाळी सहापासून 15 ते 20 कि.मी लांबा रांगा लागल्या आहेत.

Bhavesh Bhinde: भावेश भिंडेला आज न्यायलयात हजर करणार 

घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला पोलीस आज न्यायलयात हजर करणार.

Brazil Floods: पूर आणि वादळामुळे ब्राझीलमध्ये 166 जणांचा मृत्यू

29 एप्रिलपासून दक्षिण ब्राझीलच्या रिओ ग्रांडे डो सुल राज्यात वादळ आणि पुरामुळे आतापर्यंत 166 जणांचा मृत्यू झाला आहे, असे नागरी संरक्षण संस्थेने म्हटले आहे.

Cyclone Remal: येत्या 6 तसांत पश्चिम बंगालमध्ये 'रेमाल' घालणार धुमाकूळ

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रेमाल चक्रीवादळामुळे येत्या सहा तासांत पश्चिम बंगालमध्ये वादळ निर्माण होणार आहे.

Cyclone Remal: भयंकर रेमाल चक्रवादळ करणार विध्वंस

Latest Marathi News Live Update : सध्या राज्यासह देशभरात पुण्यातील कल्याणीनगर मध्ये अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघाताची चर्चा आहे. याचबरोबर रेमाल चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार आहे. त्यामुळे शेजारच्या राज्यांमध्येही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल राजकोटमध्ये गेमिंग झोनला लागलेल्या आगीमुळे 28 मृत्यू झाले आहेत. तर दिल्लीतही एका बेबी केअर सेंटरला आग लागली आहे. ज्यामध्ये 6 मुलांचा मृत्यू झाला आहे.

यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com