Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सरकारने आता कुणबीकरण थांबवावे, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केलीये.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateSakal

...तर मोदी हुकूमशहा बनतील, खर्गेचा गंभीर आरोप

पंतप्रधान मोदींना तुम्ही पुन्हा सत्तेत आणले तर ते हुकूमशहा बनतील. सरकार परत आणण्यासाठी ते धुर्तपणा करीत आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे. ते कर्नाटकात कार्यकर्ता शिबिरात बोलत होते.

ईडीचा बनावट अधिकारी बनून १० कोटींची फसवणूक

ईडी आणि पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईत मदतीचे आश्‍वासन देऊन हिरेन रमेश भगत ऊर्फ रोमो या ईडीच्या बनावट अधिकाऱ्याने ताज हॉटेलच्या माजी महाव्यवस्थापकीय संचालकांकडून १० कोटींची खंडणी वसुली केली. तक्रारदारांच्या मुलाच्या कंपनीवर तपास यंत्रणांनी कारवाई केली होती.

 Bengaluru Open : टेनिसपटू सुमित नागलचा बेंगळुरू ओपनमध्ये दारुण पराभव

भारताचा अव्वल एकेरी टेनिसपटू सुमित नागल याला शनिवारी इटलीच्या स्टेफानो नेपोलितानोविरुद्ध 6-7 (2) 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर नागल बेंगळुरू ओपनमधून बाहेर पडला आहे.

Shivsena News : ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले मुरलीधर जाधव करणार शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी केलेले मुरलीधर जाधव हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. लोकसभेच्या तिकीटाची मागणी जाहीरपणे केल्याने त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती.

विद्यापीठ चौकातील काहीसा दिलासा; पोलिसांकडून वाहतुकीत बदल 

पुणे, ता. ः मेट्रोच्या बांधकामामुळे गणेशखिंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून, वाहतूक पोलिसांच्या वतीने काही नवे बदल करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा ऐवजी मिलेनियम गेटचा (चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन) वापर सुचविण्यात आला आहे.

PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आणखी एका AIIMS चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 फेब्रुवारीला राजकोट येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) उद्घाटन करणार आहेत.

ISRO : नियोजित कक्षेत पोहोचला उपग्रह

इस्रोचा इनसॅट-3DS हा उपग्रह आपल्या नियोजित कक्षेत पोहोचला आहे. यानंतर ही मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा इस्रोने केली आहे.

ISRO INSAT-3DS : इनसॅट रॉकेटपासून वेगळा

इनसॅट हा उपग्रह आता रॉकेटपासून वेगळा झाला आहे. इथून पुढच्या प्रवासासाठी क्रायो स्टेज वापरण्यात येणार आहे.

ISRO INSAT-3DS : पहिला टप्पा पूर्ण

इस्रोचं रॉकेट सध्या सुमारे 100 किलोमीटर उंचीवर पोहोचलं आहे. पहिल्या टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील परफॉर्मन्स नॉर्मल आहे.

ISRO : भारताचा सर्वात आधुनिक हवामान उपग्रह लाँच..

नियोजित वेळेप्रमाणे सायंकाळी 5.35 वाजता इस्रोच्या नॉटी बॉय रॉकेटने हवेत झेप घेतली आहे. थोड्याच वेळात हवामान उपग्रह आपल्या ठरलेल्या कक्षेत पोहोचेल.

ISRO INSAT-3DS : काउंटडाऊन सुरू, काही मिनिटांमध्ये लाँच होणार इस्रोचा नवा उपग्रह..

इस्रोच्या इनसॅट-3DS उपग्रहाचे काही मिनिटांमध्ये प्रक्षेपण होणार आहे. यासाठी मिशन डायरेक्टरनी आदेश दिल्यानंतर आता ऑटोमॅटिक लाँच सिक्वेन्स सुरू करण्यात आला आहे.

Election Commission : 'आम्ही निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज', मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा

"२०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि राज्य विधानसभा निवडणुका घेण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे." अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

BJP National Convention 2024 : आज भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष

भाजपचा राष्ट्रीय मेळा सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे. यावेळी बोलताना पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख जे.पी. नड्डा यांनी सांगितलं, की भाजप सध्या जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष झाला आहे. 2014 पूर्वी आपली केवळ 5 राज्यांमध्ये सत्ता होती. मात्र आता एनडीए सरकारची देशातील 17 राज्यांमध्ये सत्ता आहे, असंही ते म्हणाले.

Kamal Nath : 'भाजपमध्ये जाणार का?' विचारल्यानंतर कमलनाथ म्हणाले..

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. याबाबत त्यांना थेट विचारणा केली असता, "तसं काही असेल तर मी नक्कीच सांगेल" अशी प्रतिक्रिया कमलनाथ यांनी दिली.

ISRO : नव्या मोहिमेसाठी इस्रो सज्ज; थोड्याच वेळात होणार उपग्रहाचं प्रक्षेपण

भारताची अवकाश संशोधन संस्था 'इस्रो' थोड्याच वेळात INSAT-3DS या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. हा उपग्रह हवामान आणि तापमान बदल याची अचूक माहिती देईल. यासाठी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेंटरवर तयारी पूर्ण झाली आहे.

BJP: दिल्लीत मोदींनी फडकवला भाजपचा झेंडा

दिल्लीत भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाचा ध्वज फडकावला.

Navi Mumbai: नवी मुंबईतील एका केमिकल कंपनीला लागली भीषण आग

नवी मुंबईतील एका केमिकल कंपनीला आग लागला आहे. तुर्भे येथे ही घटना घडली आहे.

कमलनाथ पक्ष सोडणार नाहीत दिग्विजय सिंह यांची माहीती  

"कमलनाथ छिंदवाडा येथे आहेत. काल रात्री मी कमलनाथ यांच्याशी चर्चा केली.ते काॅंग्रस सोडणार नाहीत असे  दिग्विजय सिंह  म्हणाले.

CM Eknath Shinde: शिवसेना कुणाची हे सांगण्याची आता गरज नाही- एकनाथ शिंदे

कोल्हापुरात शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेना कुणाची हे आता सांगण्याची गरज नाही. पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे आहे. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत, त्यांनी सत्तेसाठी गद्दारी केली. एकदा नाही तर दोनदा फसवलं. दिल्लीला जाऊन युती करु असा शब्द त्यांनी दिला होता. पण तो मोडला.

Badminton Asia Championships:  भारतीय महिला संघाने जपानला हरवून अंतिम फेरी गाठली

भारतीय महिला बॅडमिंटन संघाने शनिवारी उपांत्य फेरीत जपानचा 3-2 असा पराभव करत स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते कमलनात भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्यासोबत १० ते १२ आमदार असल्याची चर्चा आहे.

शिवजयंतीला शिवनेरीवर असणार तगडा पोलीस बंदोबस्त

19 तारखेला शिवजयंती निमित्त शिवनेरीवर अकराशे पोलीस आणि होमगार्ड्सचा बंदोबस्त तैनात असणार आहे, पुण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साडेनऊ वाजता शिवनेरी गडावरील कार्यक्रमास सुरुवात होते. मात्र, यावेळेस हा कार्यक्रम लवकर सुरु करण्यासाठी आणि साडेनऊ वाजता संपविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हा कार्यक्रम संपला की लोकांना दहा वाजल्यापासून गडावर सोडण्यात येईल. लोकांना विनंती आहे की दहा वाजल्यानंतर शिवभक्तांनी गड चढायला सुरुवात करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. गडावरील शिवजयंतीचा पाळणा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होत असते. यावेळेस या सभेचे ठिकाण बदलण्यात आलं आहे. दरवर्षी या सेभेचं ठिकाण गडाच्या सुरुवातीलाच असायचं यावेळी ही सभा गडावरच पण शिवजन्माच्या ठिकाणाच्या पलिकडं होणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागानं परवानगी दिल्याचंही पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप? बड्या नेत्याच्या मुलानं बदललं ट्विटर प्रोफाईल

काँग्रेसचे बडे नेते आणि मध्य प्रदेशातील माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांनी आपलं ट्विटर प्रोफाईल बदललं आहे. त्यामुळं आता ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दिल्लीजवळ मालगाडीचे आठ डबे रुळावरुन घसरले

बारामतीत लोकशाही पद्धतीनं लढायचं असेल तर तगडा उमेदवार आणावा; सुप्रिया सुळेंचा टोला

Supriya Sule : लोकशाही पद्धतीनं लढायचं असेल तर त्यांनी तगडा उमेदवार आणावा. मी चर्चा करायला तयार आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या बारामतीच्या संभाव्य उमेदवारीबाबत लगावला. तसेच धनगर आरक्षणावर बोलताना त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारा असं त्यांनी म्हटलं. त्यांनी 10 वर्षांपूर्वी बारामतीत येऊन सांगितलं होत. फडणवीस यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. फक्त धनगर नाही तर सगळ्या समाजाला हे फसवू शकतात, अशा शब्दांत फडणवीसांवर त्यांनी निशाणा साधला.

बारामतीच्या जनतेचे आभार मानते - सुप्रिया सुळे

Supriya Sule : मी बारामती आणि राज्यातील जनतेचे आभार मानते त्यांनी मला संधी दिली. 10 वर्षांच्या कामाचा हा पुरस्कार आहे, असं मला वाटतं, मी त्यांचे अभर मानते. शरद पवार लढवय्ये नेते आहेत, त्यांनी संघर्षातून सगळं निर्माण केलं. हा देश लोकशाहीनं चालला आहे. इथं संविधानाला खूप महत्त्व आहे. हे संसद भवन फक्त भवन नाही तर न्यायाचं मंदिर आहे, हे विधान मला बाळबोध वाटलं. हा संविधानाचा आपमान आहे, असं मला वाटतं.

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अधिवेशनात पुन्हा गाजणार

जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अधिवेशनात पुन्हा गाजणार आहे. जुन्या पेन्शनबाबत सरकारची भूमिका अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे.

नवी दिल्लीत नेहरु गेटजवळील मंडप कोसळला, अनेक लोक अडकल्याची माहिती 

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु गेटजवळील मंडप कोसळला असून यात अनेक लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.

आम्ही कधी इतकी चाटूगिरी केली नव्हती- संजय राऊत

"आम्ही कधी इतकी चाटूगिरी केली नव्हती", अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या शपथेवर केली.

पोलिसांनी आधी घटनाक्रम बघून गुन्हे दाखल करावे- भास्कर जाधव

नितेश राणे यांच्या गाडीवर गुहागर या ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्ये आमनेसामने होते. माध्यमांशी संवाद साधताना भास्कर जाधव म्हणाले की, पोलिसांनी आधी घटनाक्रम बघून गुन्हे दाखल करावे.

नाशिकमध्ये मराठा आंदोलकांचा रास्तारोको

नाशिकच्या जुना नाका परिसरात मराठा आंदोलकांकडून रास्तारोको करण्यात आला आहे. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांकडून काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलकांना थांबण्याचं आवाहन

मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना थांबण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, "१९ला शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करु आणि त्यानंतर २०,२१ ला आंदोलनाची दिशा ठरवू."

Manoj Jarange: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतील- मनोज जरांगे

.आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, "मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील."

Pune Crime:पुण्यातील तरवडेत ८ ते १० वाहनं अज्ञाताने पेटवली, पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुण्यातील तरवडे परिसरात ८ ते १० वाहनं अज्ञाताकडून पेटवून देण्यात आली. यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Myanmar Earthquake: म्यानमार हादरलं! 4.4 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे झटके

म्यानमारच्या काही भागात ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे झटके बसले आहेत. भूकंपाचे हादरे सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी जाणवले.

Sharad Pawar: पक्ष, चिन्ह गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये; गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी

पक्ष, चिन्ह गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी गोंविद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. लोकांमध्ये जाऊन प्रचार करा, असं शरद पवार कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत.

Bhaskar Jadhav: चिपळूणमधील राड्यानंतर भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त

चिपळूणमध्ये राणे-ठाकरे गटामध्ये राडा झाला होता. त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

BJP National Convention: भाजपचे दिल्लीत आजपासून राष्ट्रीय अधिवेशन

नवी दिल्ली- लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आजपासून दोन दिवस राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. यासाठी भारत मंडपम येथे जय्यत तयारी सुरु झाली आहे.

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंची आज लालबागमध्ये जाहीर सभा

उबाठा गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची आज लालबागमध्ये जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची ही सभा होत आहे.

Maratha Reservation: विशेष अधिवेशनात मराठ्यांना १० टक्के आरक्षण- सूत्र

मराठा आरक्षणासाठी २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावले जाणार आहे. या अधिवेशनात मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात, सोमवारी सुनावणीची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. आता या प्रकरणी सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Mumbai Marathon : मुंबई मॅरेथॉनसाठी अटल सेतू दहा तासांसाठी बंद

रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलीये. 

Eknath Shinde Group : मुरलीधर जाधव यांचा आज शिंदे गटात प्रवेश

हुपरी : शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात आज, शनिवारी (ता. १७) पाच हजार शिवसैनिकांसह जाहीर प्रवेश करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. जिल्हाप्रमुख पदावरून काढण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे व माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी कटकारस्थान रचल्याचा आरोप करत माजी खासदार राजू शेट्टी यांना विरोध करण्यामागची आपली भूमिका समजून घेतली नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

मुंबईतील गोवंडी भागात २५ ते ३० झोपड्या जळून खाक

मुंबईतील गोवंडी भागात २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्याचे समजते. मात्र, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Latest Marathi News Live Update
Mumbai News: गोवंडीत झोपडपट्टीला भीषण आग; 25 ते 30 घरे जळून खाक

Cyber Police : ससून रुग्णालयातून पसार झालेल्या आरोपीला अटक

पुणे : ससून रुग्णालयातून पसार झालेला आरोपी मार्शल लुईस लीलाकर याला पोलिसांनी पहाटे पावणे दोनच्या सुमारास अटक केली. लीलाकर ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता.

चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट-भाजपच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

चिपळूणमध्ये माजी खासदार निलेश राणेंच्या गाडीवर आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर काल दगडफेक करण्यात आली. त्यामुळे राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना काल भिडले होते. चिपळूणमधील दगडफेक प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजूचे मिळून जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा चिपळूण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Farmers Protest : शंभू सीमेवर प्रचंड तणाव; शेतकरी आंदोलनात दिसले खलिस्तान समर्थक पोस्टर्स

शंभू सीमेवर तणाव वाढत आहे. याठिकाणी तळ ठोकलेल्या काही तरुणांच्या हातात खलिस्तान समर्थक बॅनर दिसत होते. तरुण आंदोलक आपल्या नेत्यांचंही ऐकताना दिसत नाहीयेत आणि सतत उपद्रव निर्माण करत आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यांनी अनेक वेळा बॅरिकेडिंगच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला, परंतु हरियाणाच्या बाजूने तैनात असलेल्या पोलिस आणि सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना तिथून हटवलं.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आज विविध विकासकामांचे लोकार्पण

कोल्हापूर : शासन अनुदानातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आज शनिवारी (ता. १७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी एक वाजता एकत्रित कार्यक्रम होणार आहे. एकाच ठिकाणाहून होणाऱ्या कार्यक्रमात काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना, १०० कोटींचा रस्ते प्रकल्प, स्वच्छ भारत अंतर्गत मशिनरी, घरफाळा संगणकीय प्रणाली, रंकाळा तलाव जतन व संवर्धन, रंकाळा येथे बॉटलनिकल गार्डन, अंबाबाई मंदिराभोवतीचे ध्वनीयुक्त विद्युत खांब, पंचगंगा घाट येथील विकासकामे, पंचगंगा स्मशानभूमी विकास, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन, केशवराव भोसले नाट्यगृह व शाहू खासबाग मैदान जतन व संवर्धन, राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळ विकास, अंबाबाई मंदिराशेजारील सांडपाणी निर्गतीकरिता भुयारी गटारीचे काम, महात्मा गांधी मैदान येथील जलवाहिनी आदी कामांचे उद्‍घाटन तसेच लोकार्पण होणार आहे.

Mumbai Sessions Court : माजी आमदार कदम यांची निर्दोष सुटका

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाकडून माजी आमदार रमेश कदम यांना दिलासा मिळाला आहे. आर्थर रोड तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. सबळ पुराव्यांअभावी विशेष न्यायालयाचे न्या. राहुल रोकडे यांनी शुक्रवारी रमेश कदम यांची निर्दोष सुटका केली.

Central Railway : नागपूर, कोल्हापूरसाठी विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूरदरम्यान दोन एकेरी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Maratha Reservation : सरकारने आता कुणबीकरण थांबवावे, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची तब्येत खालावलीये, सरकारकडून अद्याप मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा नाही. सरकारने आता कुणबीकरण थांबवावे, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केलीये. शंभू-जिंद सीमेवर प्रचंड तणाव असून शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरुच आहे. कोल्हापुरात कालपासून शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु झालं आहे. या शिवाय, राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com