Latest Marathi News Live Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Lok Sabha Election Latest update : दिवसभरातील देश-विदेश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

Delhi Police: बेकायदेशीर शस्त्रेही जप्त

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने शस्त्र पुरवठादार गोपा राम याला संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगरजवळ पकडले. तो दिल्लीतील गुंडांना अवैध शस्त्रे पुरवत होता. त्याच्याकडून चार बेकायदेशीर शस्त्रेही जप्त करण्यात आली: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने

संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

मॉन्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. पण आज महाराष्ट्रातील अनेक भागाला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर इथं देखील पावसानं जोरदार हजेरी लावली.

पुण्यातील वडाची वाडी येथे तुफान पाऊस; रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांची तारांबळ

पुण्यातील वडाची वाडी येथे आज तुफान पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहन चालकांची चांगलीच गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.

NCW: महिला आयोगाच्या अध्यक्षांनी संदेशखळीला भेट देण्यासाठी मागीतली परवानगी

NCW च्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून संदेशखळी आणि पश्चिम बंगालच्या इतर भागांना भेट देण्याची परवानगी मागितली आहे.

निकालाआधीच डोंबिवलीत झळकले खासदार श्रीकांत शिंदेंच्या विजयाचे बॅनर

लोकसभेचा निकाल उद्या मंगळवारी लागणार असून त्याअगोदरच डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून लावण्यात आले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रचंड बहुमताने विजयी झाल्याचे बॅनर डोंबिवली पश्चिमेत लावण्यात आले आहे.

पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील निहामा भागात आज, सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि कारवाई केली. या चकमकीत लष्करचा एक कमांडर आणि त्याचा एक साथीदार मारला गेला आहे. रियाज अहमद डार असे मृत कमांडरचे नाव आहे.

तुघलकाबाद-ओखला मार्गावर ताज एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

दिल्ली : तुघलकाबाद-ओखला मार्गावर ताज एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली असून अग्निशमन दलाकडून आग विझवली जात आहे. यातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समजते.

Kolhapur Lok Sabha : निकालाआधीच कोल्हापुरात झळकले शाहू महाराजांचे विजयाचे पोस्टर

कोल्हापूरच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलेय. दरम्यान, आता निकालाच्या आदल्या दिवशीच विजयाचे पोस्टर झळकले आहेत. शाहू महाराजांचे आदल्या दिवशी खासदार म्हणून पोस्टर झळकले आहेत. पोस्टरवर कोल्हापूरचा राजा, शाहू छत्रपती खासदार मजकूर आहे.

Rajkumar Anand : राजकुमार आनंद यांचा राजीनामा स्वीकारला

आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून पक्षाचा राजीनामा देणारे राजकुमार आनंद यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून राजीनामा स्वीकारण्यापूर्वीच आनंद यांनी बसपमध्ये प्रवेश केला होता.

कर्नाटकात एनडीएला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार : एचडी कुमारस्वामी

एक्झिट पोलबाबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले, 'सर्व मीडिया चॅनेल्स आणि खासगी एजन्सींनी आपला कल दिला असून एनडीए बहुमताने विजयी होणार आहे. कर्नाटकात भाजप आणि जेडीएस 25 हून अधिक जागा जिंकणार आहेत.'

Satara Dam जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर मिळणार नद्यांसह धरणांच्या पाणी पातळीची माहिती

सातारा : जलसंपदा विभागाने नव्याने निर्माण केलेल्या WWW.rtsfros.com/mahakrshina संकेतस्थळावर कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्यांची पाणी पातळी व नद्यांवर असणाऱ्या धरणांची पाणी पातळी समजणार आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नि.त. पोतदार यांनी दिली आहे.

Satara News : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत अल्प पाणीसाठा शिल्लक असून, पाणी टंचाईचे संकट गडद होत आहे. धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरणात गतवर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाणी शिल्लक आहे. मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही, तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

Ahmedabad Lok Sabha : अहमदाबादमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जोरदार तयारी

अहमदाबाद, गुजरात : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या मतमोजणीची जोरदार तयारी सुरू आहे. अहमदाबादमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईत लोअर परळ परिसरात भीषण आग

मुंबईत लोअर परिसरात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांची विनंती ECI ने फेटाळली

ECI ने काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया देण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागण्याची विनंती फेटाळली, ECI ने त्यांना आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले.

ISI साठी हेरगिरी केल्याबद्दल निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

महाराष्ट्र: नागपूर जिल्हा न्यायालयाने ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडचा माजी अभियंता निशांत अग्रवाल, ज्याला 2018 मध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, त्याला अधिकृत गुप्तता कायदा (OSA) च्या कलम 3 आणि 5 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि 3000 रुपये दंड ठोठावला.

ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीच्या कामामुळे बोरिवलीतील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 -2 बंद

मुंबई : ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीच्या कामामुळे बोरिवलीतील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 बंद करण्यात आला आहे. धीम्या गतीने चालणाऱ्या लोकल गाड्या सुमारे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर रेल्वे स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बनवली टास्क फोर्स

उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने टास्क फोर्स बनवला आहे. विभागनिहाय प्रत्येक नेत्याला जबाबदारी देण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र-पृथ्वीराज चव्हाण

उत्तर महाराष्ट्र-बाळासाहेब थोरात

विदर्भ-विजय वडेट्टीवार

अमरावती यशोमती ठाकूर

मराठवाडा अमित देशमुख

कोकण नसीम खान

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकाळपासून वॉर्डरुममध्ये बसून राहणार आणि निकालावर लक्ष ठेवणार

जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका- राजीव कुमार

जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका घेणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

अरुण गवळीच्या सुटकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला नकार देत सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे अरुण गवळी याची सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्स्फुर्त प्रतिसादामुळे निवडणूक आयोगाकडून मतदारांचं अभिनंदन

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. ६४ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने एक वेगळा विश्वविक्रम झाल्याचं सांगत महिला मतदारांचे त्यांनी विशेष आभार मानले.

आव्हाडांविरोधात बोरीवली येथे रिपब्लिकन पार्टीचं आंदोलन

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईतल्या बोरीवली येथे रिपब्लिकन पार्टीचं आंदोलन सुरु झालं आहे.

दिल्ली-मुंबई विमानात बॉम्बचा कॉल, अहमदाबादमध्ये केलं इमर्जन्सी लँडिग

दिल्ली मुंबई akasa विमानात बॉम्बच्या धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचं अहमदाबाद येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या विमानात 187 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.

एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया

एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला अपेक्षा आहे हा निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे.

दिल्लीतील वाढत्या पाणी समस्येवर दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी

दिल्लीतील वाढत्या पाणी समस्येवर दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशकडून महिनाभर अतिरिक्त पाणी देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. कडाक्याच्या उन्हात दिल्लीची पाण्याची गरज वाढली आहे. देशाच्या राजधानीच्या गरजा पूर्ण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. दिल्ली सरकारच्या याचिकेत या मागण्या करण्यात आल्या आहेत. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या सुट्ट्या कालीन बेंच समोर सुनावणी होणार आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक

एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. विधान परिषद निवडणुका आणि दुष्काळ याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी तातडीची बैठक बोलवली. बैठकीला शिवसेनेचे नेते ,आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील.

BJP Meeting: भाजपने आज प्रवक्त्यांची बैठक दिल्लीत बोलावली

भाजपने आज प्रवक्त्यांची बैठक दिल्लीमध्ये बोलावली आहे. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

Mumbai Local: विरार ते दहिसर मार्गावर प्रचंड गर्दी

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला आहे. विरार ते दहिसर मार्गावर प्रचंड गर्दी झाली आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर देखील वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

Lok Sabha Share Market: लोकसभा निकालाआधी शेअर बाजारात उत्साह

लोकसभा निकालाआधी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये २००० अंकाची उसळी पाहायला मिळाली. निफ्टीमध्ये देखील चांगली वाढ झालीये.

Lok Sabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाची आज साडेबारा वाजता पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज साडेबारा वाजता पत्रकार परिषद आहे. उद्या लोकसभा निवडणुकीचा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद असणार आहे.

Lok Sabha Voting Ended: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

लोकसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडताच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे.तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची यांचे दर वाढले आहेत.

Mumbai Local News: बोरिवली रेल्वे स्थानकात केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित

बोरिवली रेल्वे स्थानकात केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित झाली आहे. केबल तुटल्याने बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ वरील सेवा ठप्प झाली आहे. केबल दुरुस्तीचं काम सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला २४ तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर देशाच्या जनतेमध्ये धाकधुक असून उत्सुकता ताणली गेली आहे. जनतेचा कौल कोणाला असेल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. आज दिवसभरात राजकीय पक्षाचे नेते आपल्या विजयाचा दावा करतील. लोकसभा संपल्यानंतर आता महागाईची झळ सर्वसामान्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. दूध, तांदूळ,दाळ,कोथिंबिर, मिरच्या यांचे भाव वाढलेत. टोल दरामध्ये देखील वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.