News Update: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Maratha Aarakshan Vishesh Adhiveshan Maharashtra Live | मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज (ता. २०) विशेष अधिवेशन होत आहे.
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal

फडणवीसांच्या काळातील मराठा आरक्षणाचाच मसुदा पुन्हा आणला - शरद पवार

मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी म्हटलं की, आमचं सरकार असताना आम्ही हे विधेयक आणलं नाही कारण फडणवीस सरकारच्या काळात दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आत्ता देखील हाच मसुदा पुन्हा विधानसभेत एकमतानं मंजूर झाला. पण आता यावर सुप्रीम कोर्टात काय होतंय हे पहावं लागेल. यावर आपण अत्ताच काहीही सांगू शकत नाही कारण यापूर्वीचा कोर्टाचा निर्णय याबाजूनं नव्हताय.

बाळा नांदगावकर भाजपच्या मंचावर; मनसेच्या महायुतीतील चर्चांना पुष्टी?

भाजपच्या कार्यक्रमात मनसेच्या नेत्यांनी हजेरी लावल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काल राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट झाली होती. त्यानंतर आज धन्यवाद दवेंद्रजी या भाजपच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली. त्यामुळं मनसे महायुतीत येणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.

पुण्यातील विश्रांतवाडी भागातून ११०० कोटींचं ड्रग्ज जप्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

सर्वांना माहितीए, मराठा आरक्षणाबाबत सरकारचा हेतू काय? - अस्लम शेख

शरद पवारांनी घेतली शाहू महाराज छत्रपतींची भेट!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोल्हापूरात शाहु महाराज छत्रपतींची भेट घेतल्याचे दिसून आले आहे. यावेळी पवार यांनी कालच्या कार्यक्रमात त्यांची भेट न झाल्यानं त्यांच्या भेटीला आलो असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

आरक्षणाविरोधात लवकरच कोर्टात जाणार- सदावर्ते

मराठा आरक्षणाच्या विरोधात आपण आता न्यायालयात जाणार असल्याची माहिती अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सदावर्ते चर्चेत आले आहे.

कुणबीकरणाला आमचा सक्त विरोध - भुजबळ

आमदार छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून आपला मराठा आरक्षणाला विरोध नसून कुणबीकरणाला आहे.तसेच राज्यात सध्या कुणबीकरणाची खोटी प्रमाणपत्रं दिली जात असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

"द इंद्राणी मुखर्जीया स्टोरी: बरीड ट्रुथ," च्या प्रदर्शना विरोधातील सीबीआयचा अर्ज कोर्टाने फेटाळला

सक्षम कोर्टात दाद मागण्याचा सीबीआयला सल्ला दिला आहे. सीबीआयने मालिकेच्या विरोधात विशेष सीबीआय कोर्टात अर्ज केला होता. मालिकेचं प्रदर्शन तसेच इंद्राणीसह खटल्याशी निगडित लोकांच्या मालिकेतील सहभागवर आक्षेप घेतला होता. तसेच शीना बोरा हत्या खटल्याचा निकाल येईपर्यंत मालिकेचं रिलिज थांबवण्याची मागणी केली होती. ही डॉक्युमेंट्री २३ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. डॉक्युमेंट्रीत इंद्राणीसह तिचा मुलगा मिखाईल बोरा आणि मुलगी विधी मुखर्जीया यांचा देखील सहभाग आहे

Sonia Gandhi’s Rajya Sabha: सोनिया गांधी पहिल्यांदाच राजस्थानमधून राज्यसभेच्या खासदार

राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीत सोनिया गांधींसह तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या तीन सदस्यांमध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि भाजपचे मदन राठोड आणि चुन्नीलाल गरसिया हे निवडून आले आहेत. सोनिया गांधी यांच्या निवडीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी पीसीसी प्रमुख गोविंद दोतासरा विधानसभेत पोहोचले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन पूर्ण केलं - शंभूराज देसाई

महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, "यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण मिळेल. प्रत्येकाला (मराठा) याचा फायदा होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन पूर्ण केलं. हे विधेयक विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंजूर झाले आहे."

आंतरवालीत आंदोलकांची डोकी फोडण्याची गरज नव्हती

मराठा समाजातील अनेकांना आरक्षणासाठी बळी द्यावा लागला आहे. मी मनोज जरांगे यांना जाऊन भेटलो होतो. ज्या निर्घृणपणे निर्दयीपणाने आंदोलकांची डोकी फोडली ती आवश्यकता नव्हती, शांतपणे हा विषय सोडवता आला असता, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

मराठ्यांचं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकावं- उद्धव ठाकरे

राज्य सरकारने मराठ्यांना दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकावं, अशी आशा आहे. आरक्षणाबाबत दोन मतं नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

खात्री झाल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणं कठीण- ठाकरे

सरकारने जरी मराठ्यांना आरक्षण दिलेलं असलं तरी खात्री झाल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही. सरकारने कधी नोकऱ्या मिळणार हे स्पष्ट करावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

मराठा आरक्षण विधेयक विधान परिषदेत मंजूर

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर आता विधान परिषदेतही मंजूर झालेले आहे.

CM Eknath Shinde Live on Maratha Reservation: मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण

मराठा आरक्षण विधेयक एकमतानं संमत करण्यात आलं आहे.

CM Eknath Shinde Live on Maratha Reservation: मनोज जरांगे यांच्या लढाईचा हा विजय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde in Assembly: मराठा आरक्षणाच्या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी दिलेला शब्द पाळतो. मी शब्द फिरवत नाही

दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतात. मी बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे. हा मनोज जरांगे यांच्या लढाईचा विजय आहे."

CM Eknath Shinde Live on Maratha Reservation: मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde in Assembly: मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत सादर करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येत नाही. मराठा असेल किंवा इतर समाज असेल त्यांच्याबद्दल तीच भावना व्यक्त केली असती. समस्त राज्याला आणि ओबीसींना सांगतो की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण द्यायचा निर्णय घेतलाय."

CM Eknath Shinde Live on Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधानसभेत संमत

CM Eknath Shinde in Assembly: विधानसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

Maratha Reservation Live Update : मराठा आरक्षण विधेयक बिनविरोध पारित केलं जाणार, विशेष अधिवेशनाला सुरुवात

मराठा आरक्षण विधेयक बिनविरोध पारित केलं जाणार आहे. या विधेयकरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतील. विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात समीर वानखेडे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना १ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.

सीएसएमटी परिसरात कुणबी एकीकरण समितीचं आंदोलन

कुणबी एकीकरण समितीने मराठा आरक्षणाला विरोध दर्शवत सीएसएमटी परिसरात आंदोलन केलं आहे. मनोज जरांगे यांची मागणी पुर्णपणे चुकीची आहे, असं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्याकडून कऱण्यात आली आहे.

Pune Fire Accident: पुण्यात फुले वाड्यानजिकच्या घराला लागली आग

पुण्यातील गंज पेठ, महात्मा फुले वाड्या जवळ असलेल्या एका घरामध्ये आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाची ३ वाहने दाखल झाले असून आग विझवण्यात आली आहे. या घटनेत कोणी ही जखमी नसून आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे

Maratha Reservation Live: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात कोण बोलणार हे बैठकीत ठरवलं जाणार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात कोण बोलणार हे विधिमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत ठरवलं जाणार आहे. त्यानंतर विशेध अधिवेशनाला सुरुवात होईल.

Maratha Reservation Live Update : विशेष अधिवेशनाआधी राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आज सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यावेळी अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्याआधी राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषण केले.

राज्यपाल काय म्हणाले-

सरकार सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांसाठी विविध योजना देत आहे. भारताच्या आर्थिक नियोजनात महाराष्ट्रात वाटा मोठा आहे. डाओसमध्ये ३ लाख ५३ कोटीचे उद्योग राज्यात येत आहेत. बल्कट्रक पार्कसाठी रायगडमध्ये जागा देण्यात आली आहे. राज्यात भविष्यात ५ लाख नोकऱ्या विविध उदयोगांमुळे उपलब्ध होतील.

महाराष्ट्राने ड्रोन व्हिजनला मान्यता दिली आहे. आर्थिक विमा योजना १ लाखाहून ५ लाख केली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून १५ लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. स्वच्छ भारत योजना टप्पा २ अंतर्गत २८,३०० गावांमध्ये शौचालयं बांधण्यात आल्याने ही गावं उघड्यावरील शौच बंद झाले.

अटल सेतू राज्याने उभारले असून जनतेसाठी ते खुले करण्यात आले असून स्व बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गही तयार आहे. नाबार्ड रिंग साहिता योजना अतंर्गत ७० हजार करोडचे रस्ते उभारले जात आहे. जालना जळगावसाठी स्वतंत्र रेल्वे लाईन सुरू होतं आहे. जलयुक्त शिवार टप्पा २ सरकारने सुरू केलं आहे. अटल भूजल योजना आम्ही सुरू केली आहे, असं ते म्हणाले.

Maharashtra assembly special session: विशेष अधिवेशनाआधी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची राहुल नार्वेकरांशी चर्चा

मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टा मागास असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानंतर आज एक वाजता हा अहवाल विधिमंडळात मांडण्यात येईल. त्याआधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांशी चर्चा केली आहे.

Manoj Jarange Patil Live: मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अन्यथा...; मनोज जरांगेंचा इशारा

मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अन्यथा काहींनाच लाभ होईल. सगेसोयरे या मुद्द्यावर आरक्षण हवं आहे, अन्यथा उद्या आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. वेगळ्या आरक्षणाला जरांगे पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. जे अधिसूचनेमध्ये होतं त्याचं सरकारनं पालन करावं, असंही ते म्हणाले.

मराठा समाजाला दहा ते तेरा टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावले आहे. आज मराठा समाजाला दहा ते तेरा टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता राज्य मागास आयोगाचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. मागासवर्ग आयोगाने राज्यभरामध्ये मराठा समाजाच सर्वेक्षण केलं. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांना अहवाल सुपूर्त केला आहे.

विशेष अधिवेशनाआधी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीला सुरूवात

विशेष अधिवेशनाआधी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीला सुरूवात झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले आहेत. आज राज्य सरकारचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे.

राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनासाठी विधानमंडळ परिसरात कडकोट बंदोबस्त तैनात

राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनासाठी विधानमंडळ परिसरात कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुणबी एकीकरण समिती आक्रमक झाल्याने पोलिस त्यांच्यावरही लक्ष ठेवून आहेत. मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांकडून काही गडबड होऊ नये या उद्देशाने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. सहा उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शेकडोहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

लोकसभेसाठी महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू

लोकसभेसाठी महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 32-12-4 च्या फॉर्म्युल्यावर महायुतीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू आहे .भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 जागावर प्राथमिक चर्चा सुरू आहे, मात्र अंतिम निर्णय दिल्लीतून होणार असल्याची माहिती आहे.

सगे सोयरे अंमलबजावणी आधी करावी; पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंची मागणी

सगे सोयरे अंमलबजावणी आधी करावी. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण दुसऱ्या सत्रात घ्यावं. तसेच ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांच्या आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली होती. त्याचीही अंमलबजावणी करावी, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Maratha Community Reservation Special Session : विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक

विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची बैठक होत आहे. ९ .३० वाजता विधानभवनात ही बैठक होणार आहे. काँग्रेस आमदारांना काही सूचना दिल्या जाणार आहेत. आज मराठा आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार आहे.

PM मोदी जम्मूमध्ये करणार अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण

PM मोदी आज जम्मूमध्ये 32,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत.

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (ता. २०) महाविकास आघाडीची खलबते होण्याची शक्यता आहे. यात जागा कोणत्या पक्षाला घ्यायची इथपासून ते संभाव्य उमेदवार कोण असतील यावर चर्चा शक्य आहे.

Govind Pansare : कॉ. गोविंद पानसरे स्मारकाचा आज लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते, शहीद कॉ. गोविंद पानसरे यांच्या नवव्या शहीद दिनानिमित्त आज (मंगळवारी) महापालिकेने उभारलेल्या पानसरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेच्या प्रांगणात सायंकाळी पाचला हा सोहळा होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी जाहीर सभा होणार आहे.

Priyanka Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका गांधी सहभागी होणार

काॅंग्रसे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत प्रियंका गांधी 24 फेब्रुवारीला यूपीच्या मुरादाबाद येथून सहभागी होतील, अशी माहिती आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन; विधानसभेत मुख्यमंत्री मांडणार सर्वेक्षणाचा अहवाल

Latest Marathi News Live Update : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज (ता. २०) विशेष अधिवेशन होत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केवळ दहा दिवसांच्या अवधीमध्ये राज्यात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडणार आहेत. तसेच शरद पवार गटाला देण्यात आलेले ‘राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी स्पष्ट करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com