Latest Marathi News Update: आज दिवसभरात काय घडलं, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर वाचा…

राज्यात भाजप सत्तेत असेपर्यंत ‘ओबीसीं’वर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateSakal

मुंबईत मेट्रोचा खोळंबा, प्रवाशांची कोंडी!

अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणा-या मुंबई मेट्रे मार्गावर आज सायंकाळी गर्दीच्यावेळी खोळंबा झाला. दोन्ही मार्गावर झालेल्या बिघाडामुळे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. या मार्गावरील सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रघुराम राजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासोबत संवाद साधला.

मोटारीची कामगारांना धडक बसून, दोंघाचा जागीच मृत्यू

वारजे, ता. 30 : मुंबई बंगलोर बाह्यवळण महामार्गावर डुक्कर खिंडच्या पुढे असणाऱ्या उड्डाणंपुल्यावर चांदणी चौकाच्या दिशेने जात असलेल्या भरधाव मोटारीने दुभाजकाला रंगरंगोटी करत असलेल्या दोन कामगारांना उडविले. हे दोन्ही कामगार उडून पुलाच्या खाली पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना वारजे येथे घडली. यात कार मध्ये असलेले चौघे देखील जखमी झाले आहेत.

BMC Khichdi COVID scam case : तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर संदीप राऊत ईडी कार्यालयाबाहेर

BMC Khichdi COVID scam case : सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यांची BMC खिचडी कोविड घोटाळा प्रकरणात चौकशी सुरू आहे. यासोबतच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी सुमारे 7 तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या.

Ranji Trophy : अचानक तब्येत बिघडल्याने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातून मयंक अग्रवाल बाहेर

क्रिकेटपटू मयंक अग्रवालला उलट्या झाल्यामुळे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तो निरीक्षणाखाली असून त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी रुग्णालयात आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये तो सौराष्ट्रविरुद्धचा पुढील सामना खेळणार नाही. उर्वरित संघ आज रात्री राजकोटला पोहोचणार आहे.

Chandigarh mayor's post : चंदीगड महापौरपदाची निवडणूक पुन्हा घ्या! आपची हायकोर्टात धाव

Chandigarh mayor's post : निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चंदीगडच्या महापौरपदासाठी नव्याने मतदान घेण्यात यावे अशी मागणी घेऊन AAP ने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अखेर 11 विरोधीपक्षांमधील खासदारांचे निलंबन मागे

राज्यसभेच्या अध्यक्षांनी 11 विरोधीपक्षांमधील खासदारांचे निलंबन मागे घेतले आहे. या खासदारांना हाऊस पॅनेलने विशेषाधिकार भंग केल्याबद्दल दोषी ठरवले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर

येत्या 19 फेब्रुवारी रोजी पुणे शहरात येण्याची शक्यता आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंती असल्याने शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होण्याची शक्यता आहे. सोबतच पुणे विमानतळावर नव्याने झालेल्या टर्मिनलचे उद्घाटनही करणार असल्याची चर्चा आहे.

अभिनेते अशोक सराफ यांना 'महाराष्ट्र भूषण'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदनही केलं आहे.

एक तास बाहेर बसलो, मविआने अपमान केला, वंचितचे डॉ. धैर्यवर्धन पुंडकरांचा आरोप

मविआच्या आपआपसांत काहीही ठरलेलं नाही. एक ते दीड तास आम्हाला बसवण्यात आलं. ही वागणूक अपमानास्पद वागणूक आहे असा आरोप वंचितचे प्रतिनिधी डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला.

Mayor Election : भाजपने चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकली, आपचा घणाणात

चंदिगढ महापौर निवडणुकीनंतर आपचे खासदार राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषद घेतली. पहिल्यांदाच या निवडणुकीत 36 पैकी आठ मतं बाद अवैध ठरवण्यात आली. काँग्रेस आणि आप युतीला 20 मतं मिळाली होती. त्यातील 12 मतं आमची होती, आणि आठ मतं अवैध ठरवण्यात आली. भाजपचंं एकही मत अवैध ठरवण्यात आलं नाही. साधी महापौर निवडणूक जिंंकण्यासाठी देखील भाजप कोणत्या थराला जाऊ शकतं हे यातून दिसत असल्याचं राघव म्हटलं आहेत.

Dighi : दिघी हिल्सवर दिसला पॅराट्रूपर्सचा थरार

पुण्याजवळ दिघी हिल्सवर पॅरा जम्पर्सचा थरार पहायला मिळाला. बॉम्बे सॅपर्स ग्रुपला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुमारे 100 पॅराट्रूपर्सने आकाशातून उडी मारली.

Manoj Jarange: मनोज जरांगे रायगडावर दाखल

मराठा आरक्षणाचा लढा जिंकल्यावर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मनोज जरांगे रायगडावर दाखल झाले आहेत. आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरवात होत आहे. याच दौऱ्यात मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.

Budget 2024: अर्थसंकल्पीय सर्वपक्षीय बैठकीत निलंबित खासदारांचा मुद्दा उपस्थित

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्व पक्षांच्या नेत्यांची आज सर्वपक्षीय बैठक झाली. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. संसदेच्या ग्रंथालयात ही बैठक झाली.

बैठकीनंतर टीएमसी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'आम्ही आमच्या मागण्या मांडण्यास तयार आहोत. दीडशे खासदारांच्या निलंबनाचा मुद्दाही आम्ही उपस्थित केला, पण सरकारची एकाही प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी नाही.

महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात, बड्या नेत्यांची हजेरी

ट्रायडेंट हॉटेल या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.

किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांची दोन तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरु

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार संदीप राऊत य़ांची दोन तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरु आहे. पेडणेकर यांच्यावर कथित ब़ॉडी बॅग घोटाळ्याचा आरोप आहे, तर संदीप राऊत यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे.

राज ठाकरेंना देण्यात आली बाबरी मशिदीची वीट, मनसेकडून फोटो शेअर

१९९३ मध्ये बाबरी मशीद पाडल्यावर मशिदीच्या वीटा शिवसैनिक महाराष्ट्रात घेऊन आले होते. मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांना ही वीट देण्यात आली आहे. मनसेकडून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

Imran Khan Sentenced Jail:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना १० वर्षांची शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि मेहमूद कुरेशी यांना न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

अनाधिकृत फेरीवाल्यांवर BMCचा बुलडोजर

मुंबई महापालिकेकडून अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

मनोज जरांगे रायगडावर दाखल, शिवरायांच्या समाधीचं घेणार दर्शन 

मनोज जरांगे रायगडावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतील.

Maratha Reservation: ओबीसींमध्ये यायचं, चॅलेंजही करायचं; हा विरोधाभास नाही का ?- लक्ष्मण हाके

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरुद्ध याचिका दाखल केल्यास मंडल आयोगाला चॅलेंज करु, असे विधान मनोज जरांगे यांनी केले होते. यावर लक्ष्मण हाके यांन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "ओबीसींमध्ये यायचं, चॅलेंजही करायचं; हा विरोधाभास नाही का ?"

संजय शिरसाटांची राऊतांवर टीका

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या संजय राऊतांवर टीका केली आहे . शिरसाट म्हणाले की, 'संजय राऊतांवर रडण्याची वेळ आलीये, विरोधक महिलांच्या जीवावर राजकारण करत आहेत'.

मनोज जरांगेंची रायगडावर पायी यात्रा

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे हे रायगडावर पायी यात्रेसाठी निघाले आहेत. अनवाणी पायानं ते आपल्या सहकाऱ्यांसह किल्ल्यावर निघाले आहेत. या ठिकाणी ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत.

मविआची थोड्याच वेळात बैठक; जागा वाटपाबाबत चर्चा होणार

महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र; मनसेत होणार दाखल 

भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा होणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहर प्रमुख महिला आघाडी, तालुका प्रमुख महिला आघाडी व शहापूरमधील इतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे.

बिहारच्या अरारियामधून 'भारत जोडो न्याय यात्रा' पूर्णियाच्या दिशेने रवाना 

खळबळजनक! इगतपुरीत बिबट्याच्या हल्ल्यात ३१ वर्षीय तरुणी ठार   

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एका गावत बिबट्यानं धुमाकूळ घातला असून त्यानं केलेल्या हल्ल्यात एक ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे.

किशोरी पेडणेकर अन् संजय राऊतांच्या भावाची आज ईडी चौकशी

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅक्स रेकॉर्ड चोरणाऱ्या व्यक्तीला ५ वर्षांचा तुरुंगवास

डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅक्स रिकॉर्ड चोरणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीला पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या बिहारच्या अरारीया जिल्ह्यात आहे. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरची ती क्लिप इंडोनेशियातून झाली होती अपलोड

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची डिप फेक क्लिप काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यात सचिन एक जाहिरात करत असताना दिसत होता. ही क्लिप इंडोनेशिया मधून अपलोड झाल्याची माहिती समोर येत आहे.

INDIA Alliance: आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक; प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार?

आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडणार आहे. याबैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार नाहीत. पण, त्यांचे प्रतिनिधी उपस्थिती राहतील अशी माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे.

Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर यांची आज पुन्हा ईडी चौकशी

कोरोना काळातील बॉडी बॅग प्रकरणात ईडीने किशोरी पेडणेकर यांचा आज कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संजय राऊत यांचे लहान भाऊ संदीप राऊत यांची देखील ईडी चौकशी होणार आहे.

Budget Session : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून होणार सुरु

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या बुधवारपासून सुरु होत आहे. गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रपती दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील. 

Udayanraje Bhosale : बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी - उदयनराजे

सातारा : स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेऊन सत्ता भोगणाऱ्यांनी मराठा समाजाला सातत्याने आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे व्यथित होऊन अनेक गरीब मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या ही वस्तुस्थिती आहे. बिहारमध्ये (Bihar) शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण शोधण्यासाठी जातीनिहाय जनगणना केली. परिणामी, सर्व घटकांना समान न्याय मिळाला. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Latest Marathi News Live Update
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेऊन सत्ता भोगणाऱ्यांनी मराठ्यांना सातत्यानं आरक्षणापासून वंचित ठेवलं; उदयनराजेंचा आरोप

Land-Job Scam : लालू यादव यांच्यानंतर आज ED करणार तेजस्वी यादव यांची चौकशी

आज अंमलबजावणी संचालनालयाचे पथक माजी उपमुख्यमंत्री आणि RJD सुप्रीमो लालू यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांची जमीन-नोकरी घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणार आहे. यापूर्वी सोमवारी ईडीने लालू यादव यांची 10 तास चौकशी केली आहे. दिल्ली ईडी मुख्यालयातील सुमारे 12 अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक चौकशीसाठी पाटना येथे आले आहे.

Weather Update : उत्तरेकडील भागात पुढील 48 तासांत पावसाची दाट शक्यता

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या दरम्यान उत्तरेकडील भागात पुढील 48 तासांत पावसाची दाट शक्यता आहे. दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स आता भारताच्या दिशेने येत आहेत. एका वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम वायव्य हिमालयावर दिसून येत आहे आणि दुसरी वेस्टर्न डिस्टर्बन्स 31 जानेवारीच्या आसपास सक्रिय होण्याची शक्यता आहे, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

Lalu Prasad Yadav : लालूप्रसाद यादव यांची ED कडून तब्बल दहा तास चौकशी

पाटणा : नोकरीसाठी जमीन गैरव्यवहार-प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव हे सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे गेले. त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. यावेळी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आरजेडीचे कार्यकर्ते गोळा झाले होते.

Earthquake : लेह, लडाखमध्ये 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

आज पहाटे 5:39 वाजता लेह, लडाख येथे 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सोलापुरात मोर्चा

सोलापूरः दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने अनुसूचित मातीच्या आरक्षणासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ढोल ताशा या पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मोर्चात महिला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यासंबंधीचे निवेदन तहसीलदार किरण जमदाडे यांना देण्यात आले.

भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस

Latest Marathi News Live Update :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. तसेच राज्यात भाजप सत्तेत असेपर्यंत ‘ओबीसीं’वर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या शिवाय, राज्य मागासवर्ग आयोगाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.

त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अधिसूचनेला ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला असला, तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख नेते बबनराव तायवाडे यांनी भुजबळ यांच्या या भूमिकेशी महासंघ सहमत नसल्याचं स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या आज (ता. ३०) होणाऱ्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.