Latest News Update : नागपूरच्या उप्पलवाडी MIDCमध्ये सिलेंडरचा स्फोट, तीन जखमी

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal

नागपूरच्या उप्पलवाडी एमआयडीसीत सिलेंडरचा स्फोट, तीन जखमी

२२ जानेवारीला उद्धव ठाकरे देणार नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट

पुण्यात सांगवी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

पुण्यातील सांगवी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्यानं यापूर्वी पावसाच्या इशारा दिला होता. पण अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची त्रेधातिरपट उडाली.

सोलापुरात मोर्चादरम्यान दोन दुकानावर दगडफेक

सोलापुरात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दोन दुकानांवर दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

अन्याय करणाऱ्यांविरुद्ध आता बोललं पाहिजे - छगन भुजबळ

सोलापुरात वक्फ बोर्ड कायद्याविरोधात सभा, नितेश राणेंची हजेरी

सोलापुरात वक्फ बोर्ड कायद्याविरोधात सभा. सभेआधी मोर्चा, राज्यात ९ सभांचं आयोजन करण्यात आलंय. नितेश राणे, टी. राजा सिंह यांची उपस्थिती

कोल्हापूरातील पवनगडावरील अनधिकृत मदरसे हटवले

कोल्हापूरातील पवनगडावरील अनधिकृत मदरसे हटवले. पोलिसांचा कडक बंदोबस्त

आमदार उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे अयोध्येत दाखल

रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आणि अयोध्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार उदय सामंत अयोध्येत दाखल झाले आहेत.

सहकार विकास महामंडळच्या सहकार्याने मेगा कॉन्क्लेव्हचे आयोजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 8 जानेवारी रोजी विज्ञान भवन येथे पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्र म्हणून 'प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS)' वर 'राष्ट्रीय PACS मेगा कॉन्क्लेव्ह'चे अध्यक्षस्थान करतील.

सहकार मंत्रालयाने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) च्या सहकार्याने मेगा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे.

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी, पंतप्रधानांनी केलं कौतुक

भारताचं आदित्य यान हे आता एल-1 पॉइंटवर पोहोचलं आहे. इस्रोच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

थोड्याच वेळात 'L1' पॉइंटवर पोहोचणार 'आदित्य'; इस्रोने दिली माहिती..

भारताची पहिली सौरमोहीम आदित्य एल-1 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आदित्य उपग्रहाला एल-1 पॉइंटवर प्रस्थापित करण्याची तयारी सुरू झाली आहे. इस्रोचे वैज्ञानिक सायंकाळी चार वाजता याची प्रक्रिया सुरू करतील.

मुख्यमंत्र्यांच्या माध्यम सल्लागाराला ई़डीचं समन्स

ED ने झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार अभिषेक प्रसाद उर्फ ​​पिंटू यांना समन्स बजावले आहे. तसेच साहिबगंजचे उपायुक्त रामनिवास यादव यांना 11 जानेवारीला आणि विनोद सिंग यांना 15 जानेवारीला समन्स बजावले आहे.

Eknath Shinde : मला पदाचा मोह नाही, पक्ष वाचवण्यासाठी भूमिका घेतली- मुख्यमंत्री

मला पदाचा मोह नव्हता, पक्ष वाचवण्यासाठी मी भूमिका घेतली आहे. आता यापुढे खोटं बोलून अपमान करणाऱ्यांना जागा दाखवून द्यावी लागणार आहे, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

तीन जणांनी शरद मोहोळवर गोळ्या झाडल्या- पुणे पोलिस

तीन लोकांकडे तीन पिस्तुल होते. ते आम्ही जप्त केले आहेत. आरोपी पोळेकरच्या नातेवाईकांचा आणि शरद मोहोळचा वाद होता, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

DY Chandrachud : डीवाय चंद्रचूड यांनी द्वारकेतील मंदिरात घेतलं दर्शन

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी आज गुजरातमधील द्वारका येथील श्री द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना केली.

Raj Thackeray: गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे -राज ठाकरे 

गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. महानंदा डेअरी भविष्यात अमूल गिळंकृत करते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची स्थिती पाहता, महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही. असे राज ठाकरे आजच्या कर्जतच्या सभेत म्हणाले.

अंबाती रायडूने सोडला वायएसआरसीपी पक्ष

युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला क्रिकेटर अंबाती रायडूने पक्षात प्रवेश केल्यानंतर एका आठवड्यात वाय.एस.आर.सी.पी पक्ष सोडला आहे.

Sambhaji Nagar : पाच लाख लाभार्थी धान्यापासून वंचित

रेशन दुकानदारांच्या संपामुळे जिल्ह्यात विविध योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी अन्न-धान्यापासून वंचित आहेत. विविध मागण्यांसाठी देशभरातील रेशन दुकानदारांनी १ डिसेंबरपासून संप सुरू केला. शासनाने १५ जानेवारीपर्यंत दखल न घेतल्याने आता दुसऱ्या टप्प्यात दिल्लीत मोर्चा काढून आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे राज्य अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Sharad Pawar: सध्याचे प्रेक्षक महाराजांना कुटुंब कलहातील का दाखवले असा प्रश्न विचारतील, आणि पुरावे ही मागतील.!

वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेंव्हा जाग येते तेंव्हा हे नाटक मी दिल्लीत पाहिले. सध्याचे प्रेक्षक महाराजांना कुटुंब कलहातील का दाखवले असा प्रश्न विचारतील आणि पुरावे ही मागतील अशी अप्रत्यक्ष टीका शरद पवार यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेत केली.

Congress: लोकसभेसाठी रमेश चेन्निथाला २० जानेवारी रोजी नागपुरात

विदर्भातील लोकसभा निवडणुकीची तयारी, इच्छुक उमेदवारांसोबत चर्चा तसेच प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला नागपूर आणि अमरावती विभागात बैठका घेणार आहेत. नागपूरची बैठक २० जानेवारीला आयोजित करण्यात आली आहे.

Ajit Pawar: अजित पवार गटाची विदर्भातील 10 पैकी 3 जागांवर नजर

 आगामी लोकसभा निवडणूकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांकडून सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान देशातील तसेच राज्यातील एनडीएतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भाजप यांच्यात जागावाटपाचा सुत्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाहीये. यादरम्यान विदर्भातील तीन जागांवर दावा करण्यात आला आहे.

Raj Thackeray: महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही 

आज ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे ते पाहता महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही. अशावेळी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.

खरी चळवळ ज्योतिराव फुलेंनी सुरु केली- राज ठाकरे

मनसेचे सहकार शिबिर कर्जमध्ये पार पडत आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकीय विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले तरी खरी चळवळ ज्योतिराव फुलेंनी सुरु केली होती.

Prashant Damale: प्रशांत दामलेंची नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन फटकेबाजी

आम्ही केवळ तीन तास अभिनय करतो. पण, राजकीय लोक ३६५ दिवस २४ तास अभिनय करत असतात. अध्यक्ष झाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, असं म्हणत प्रशांत दामले यांनी नाट्य संमलेनाच्या व्यासपीठावरुन फटकेबाजी केली.

Rohit Pawar: फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा - रोहित पवार 

राज्यात दिवसा ढवळ्या खून होत आहेत. अश्यावेळी गृह खात्याचं काम फडणवीसांना जमत नाही आहे. म्हणून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा असे आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले

Dhule News: जिल्ह्यात 7 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा; श्रीकांत धिवरेंची कारवाई

वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना जिल्ह्यातील गावागावांमध्ये दवाखाने थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या सात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे.

Akola: अकोला शहरातील मराठा बांधवांच्या सर्वेक्षणाची मनपाकडून तयारी

राज्य शासनाने मराठा-कुणबी नोंदी शोधण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका क्षेत्रातही या नोंदी शोधण्यात येत असून, शहरातील मराठा समाज बांधवांच्या सर्वेक्षणाची तयारी करण्यात आली आहे. ॲपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे.

Sharad Pawar: अखिल भारतीय नाट्य संमेलनाला शरद पवारांची उपस्थिती, अजित पवारांची दांडी

अखिल भारतीय नाट्य संमेलनाला पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवात झाली आहे. यावेळी संमेलनाला शरद पवारांची उपस्थिती आहे. मात्र, अजित पवारांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.

Deepak Kesarkar: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजप आक्रमक

शालेय शिक्षण विभागाने मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याचा निर्णयाला भाजप जैन सेलचा तीव्र विरोध आहे. भाजप जैन सेलकडून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कडधान्याची पाकीटं पाठवली आहेत. कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस मधून केसरकर यांना ही कडधान्याची पाकीट पाठवण्यात आलीये.

Uddhav Thackeray: मीनाताईंची आज जयंती; उद्धव ठाकरेंनी केलं अभिवादन

मीनाताई ठाकरेंची आज जयंती आहे. उद्धव ठाकरे त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले आहेत.

BJP Meeting in Pune: पुण्यात चंद्रशेखर बावळकुळे यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वाची बैठक

पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुण्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा घडून येणार आहे.

Randeep Hooda: सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा; रणदीप हुडाने येरवडा तुरुंगातून सावरकरांची केली प्रतिकात्मक सुटका

विनायक दामोदर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेनिमित्त अभिनेता रणदीप हुडाने येरवडा तुरुंगातून सावरकरांची प्रतिकात्मक सुटका केली आहे.

वाघनखं मे महिन्यात महाराष्ट्रात येणार!

ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरू असल्याने वाघनख आता एप्रिल किंवा मे महिन्यात राज्यात येतील. याआधी जानेवारी ते आणण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र ब्रिटन सरकारची प्रक्रिया सुरू असल्याने वाघनखं ही एप्रिल किंवा मे महिन्यात राज्यात येतील.

mahadev betting app: महादेव अ‍ॅप प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचकडून पहिली अटक

महादेव अ‍ॅप प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचकडून पहिली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय दीक्षित कोठारी याला अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी केली. २१ जानेवारी रोजी या लिंक हार्बरचं पंतप्रधान मोदी हे उद्घाटन करणार आहेत.

पिंपरी चिंचवड येथे नाट्य दिंडीला सुरूवात

अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन आज पिंपरी चिंचवड येथे होणार आहे. यापूर्वी आज शहरातून नाट्य दिंडी काढण्यात आली. ज्यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री शिंदेंकडून अटल सेतूची पाहाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवडी-न्हवा शेवा अटल सेतूची पाहाणी केली. या सेतूचं उद्घाटन १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी साधला कुलाबा परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कुलाबा परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुंबईतील विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहिमेत ते सहभागी होणार आहेत.

पुढील 48 तासांत देशातील अनेक राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

पुढील 48 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या या हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुणे-जांभुळवाडी पुलाच्या दुरुस्तीमुळं एक मार्गिका आजपासून 20 जानेवारीपर्यंत बंद राहणार

पुणे-बंगळुर बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी पुलावरील साताऱ्याकडं जाणाऱ्या एका मार्गिकेवरील (लेन) वाहतुकीसाठी आजपासून २० जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जांभुळवाडी पुलाच्या दुुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे. २० जानेवारीपर्यंत या पुलाचं काम सुरू राहणार आहे. त्यामुळं पुलाच्या परिसरातील तीन मार्गिकांपैकी एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. उर्वरित दोन मार्गिकेवरुन साताऱ्याकडं जाणारी वाहतूक सुरू राहील. वाहनचालकांनी वाहतूक बदलाची नोंद घ्यावी, असं आवाहन वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी केले आहे.

भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल केलाय, त्यामुळे आमदार कांबळेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलला होता.

जोधपूर-भोपाळ पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले

राजस्थान : कोटा जंक्शनजवळ जोधपूर-भोपाळ पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. सध्या बचावकार्य सुरू आहे.

श्रीलंकेच्या नौदलानं अटक केलेले 48 मच्छिमार चेन्नईत पोहोचले

तामिळनाडू : श्रीलंकेतून सोडण्यात आलेले 48 मच्छिमार काल चेन्नई विमानतळावर पोहोचले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये श्रीलंकेच्या नौदलानं या मच्छिमारांना अटक केली होती.

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये पॅसेंजर ट्रेनला आग, चार जणांचा मृत्यू

बांगलादेशची राजधानी ढाका इथं काल (5 जानेवारी) एका पॅसेंजर ट्रेनला आग लागली. स्थानिक वृत्तपत्र ढाका ट्रिब्यूनच्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, इंटरसिटी ट्रेनमध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मांढरदेव-काळेश्वरी देवीचं मंदिर पाच दिवस राहणार दर्शनासाठी बंद

वाई : मांढरदेव (ता. वाई) येथील काळेश्वरी देवीच्या मंदिराकडं जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं कॉंक्रिटीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, यातून मार्ग काढताना भाविकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळं होणारी गैरसोय टाळण्यासाठी रविवार (ता. ७) ते गुरुवार दिनांक (ता. ११ जानेवारी ) पर्यंत देवीचं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टनं घेतला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढला

Latest Marathi News Live Update : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी कोथरूड येथील सुतारदरा परिसरात घडली. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आलीये. आजही या घटनेबाबत महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच अयोध्या खटल्यातील पक्षकार इक्बाल अन्सारींना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं आहे. त्याचबरोबर 'श्रीराम मांसाहारी होते' ह्या जितेंद्र आव्हाडांच्या विधानानंतर राज्यात गदारोळ सुरु आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.