Latest Marathi News: दिवसभरातील देश व महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

माझ्यासोबत आलेल्या लोकांना मी फसवणार नाही, मी स्टॅंम्प पेपरवर लिहून देतो, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. तसेच, जनता पंतप्रधान मोदींनाच निवडणार असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.
Live Update
Live UpdateEsakal

राज्यसभा सभापती धनखड यांना खर्गेंचं पत्र

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. संसदेच्या सुरक्षेमध्ये झालेल्या चुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. आपण वेळ ठरवून त्यावर सविस्तर चर्चा करुन त्याचं निराकरण करण्यास प्रयत्न करु, असं त्यांनी पत्रामध्ये म्हटलंय.

खेलो इंडिया क्रीडा समारंभाला अनुराग ठाकूर उपस्थित

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन चेन्नईतील खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते.

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून तिसरं समन्स 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने तिसरे समन्स पाठवले आहे. त्यांना ३ जानेवारीला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलेय.

आठव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, पाच गंभीर जखमी

नोएडा सेक्टर १२५ मध्ये शुक्रवारी लिफ्ट कोसळली. आठव्या मजल्यावरुन ही लिफ्ट कोसळली असून लिफ्टमध्ये ७ जण होते. माहितीनुसार घटनेमध्ये ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

कारवर टिप्पर उलटल्याने चौघांचा मृत्यू

पंजाबमधील मोगा येथील बट्टर कला गावाजवळ एक टिप्पर कारवर उलटल्याने चार जण ठार झाले आहेत. अपघातात एक मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बीडमध्ये उद्या शाळा बंदचे आदेश

बीडमध्ये शनिवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. उद्या मनोज जरांगे यांची बीडमध्ये सभा होत आहे.

२२ जानेवारी हा दिवस १५ ऑगस्ट इतकाच महत्वाचा

रामजन्मभूमी मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबद्दल, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, "22 जानेवारी 2024 हा दिवस 15 ऑगस्ट 1947 इतकाच महत्त्वाचा आहे. तसेच युद्धात कारगिल आपण परत मिळवण्याइतकाच महत्त्वाचा आहे"

मसूर डाळीच्या आयात शुल्कावरील सूट वाढवली; केंद्राचा मोठा निर्णय

आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल - बच्चू कडू

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये सगे-सोयरे सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी लावून धरली आहे. पण याला आता आमदार बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला आहे. आत्तापर्यंत जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या कडू यांच्या या विधानावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा; 10 लाखांचा दंड!

काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच १० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

जनता पंतप्रधान मोदींनाच निवडणार - अजित पवार

माझ्यासोबत आलेल्या लोकांना मी फसवणार नाही, मी स्टॅंम्प पेपरवर लिहून देतो, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. तसेच, जनता पंतप्रधान मोदींनाच निवडणार असल्याचे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.

Delhi Liquor Policy Case: दिल्ली मद्य घोटाळा  प्रकरणात संजय सिंह यांना मोठा धक्का, जामीन नाही

Delhi Liquor Policy Case: दिल्लीच्या मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना मोठा धक्का बसला. राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने संजय  सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

NIA: भारत-बांगलादेश सीमेवरून घुसलेल्या मानवी तस्करी प्रकरणात NIA ने 11व्या आरोपीला केली अटक

NIA: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मानवी तस्करी प्रकरणी 11व्या आरोपीला अटक केली आहे. एजन्सीने गेल्या महिन्यात देशभरात छापे टाकल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

Pakistan: गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी इम्रान खान यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Pakistan: गोपनीय कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही नेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सरदार तारिक मसूद यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला.

राहुल गांधी शरद पवार यांच्या निवासस्थानावरून निघाले...

राहुल गांधी शरद पवार यांच्या निवासस्थानावरून निघाले आहेत. यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

परभणीतील  सेलू मनोज जरांगेंची जाहीर सभा पडली पार! 

या सभेत मनोज जरांगेंनी सरकारकडे केवळ दोनच दिवस शिल्लक असल्याचा इशारा दिला आहे. तसेच इतर ठिकाणी समानता चालते मग आरक्षणताच का नाही? असा सवाल विचारत. मराठ्यांनी आता ८० टक्के लढाई जिंकली असून अशी संधी पुन्हा येणार नाही, असं आवाहन उपस्थित जनसमुदयाला केलं. 

परभणीच्या सेलूमध्ये जरांगेंची सभा

परभणीच्या सेलूमध्ये मनोज जरांगेंची सभा सुरू झाली आहे. काही वेळापूर्वीच भुजबळांनी मनोज जरांगेंवर उपरोधिक टीका केली होती. त्याला आता जरांगे प्रत्युत्तर देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इतिहासात कधीही असं घडलं नाही, देशात लोकशाही धोक्यात - शशी थरूर

जगाच्या लोकशाहीच्या इतिहासात कुठेही 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं नाही. लोकांना हे कळायला हवं की देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. यासाठीच इंडिया आघाडी आंदोलन करत असल्याचं काँग्रेस खासदार शशी थरुर म्हणाले.

जरांगेंच्या घराजवळ मंत्र्यांचे बंगले उभारा; भुजबळांचा उपरोधिक टोला

एखाद्या व्यक्तीच्या सोयऱ्यांना देखील आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी आज केली होती. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी मिश्किल शेरेबाजी केली. "केवळ सोयऱ्यांनाच कशाला? एखाद्या व्यक्तीच्या व्याहींना, त्यांच्या व्याहींना आणि त्यांच्याही व्याहींना आपण आरक्षण देऊ. एवढंच कशाला, तर जरांगेंच्या घराजवळ मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय कार्यालय उभारू, म्हणजे त्यांच्या मनात काही आलं की लगेच त्याबाबत निर्णय घेऊन जीआर काढता येईल." असं भुजबळ म्हणाले.

काँग्रेस नेते सुनिल केदार यांना कार्टाचा मोठा धक्का, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी

काँग्रसचे नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी केदार यांना दोषी ठरवलं आहे.तर इतर तिघांना निर्दोष जाहीर केले आहे

Latest Marathi News Live Update : काहीही झालं तरी आम्ही आरक्षण घेणारच- मनोज जरांगे पाटील

काहीही झालं तरी आम्ही आरक्षण घेणारच. आमचं आंदोलन शांततेत होणार आहे. आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवूनच चर्चा करणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

उत्तर प्रदेशमधील बहादुगड येथे घराला लागलेल्या आगीत दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू

उत्तर प्रदेशमधील बहादुगड येथे घराला लागलेल्या आगीत दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या घटनेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी एक 6 वर्षांची आणि दुसरी 6 महिन्यांची आहे.

बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. अशातच बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे काल (गुरुवारी) एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तिन्ही मृत तरूण धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हे तरुण गाडी खाली चिरडले गेले त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये आज पुन्हा २६५ कोरोना रुग्णांची नोंद

केरळमध्ये 21 डिसेंबर रोजी कोविड 19 चे 265 नवीन सक्रिय प्रकरणे आणि एकाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.

लोकल ट्रेनच्या प्रत्येक डब्यात असणार स्मोक डिटेक्शन यंत्रणा  

आगीच्या वाढत्या घटनांमुळे मध्य रेल्वे सतर्क झाली असून लोकल ट्रेनच्या प्रत्येक डब्यात आता स्मोक डिटेक्शन यंत्रणा लावली जाणार आहे. एक्सप्रेस ट्रेननंतर उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या सर्व लोकल गाड्यांच्या डब्यात स्मोक डिटेक्शन यंत्रणा लावण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

एखाद्या डब्यात आग लागल्याची घटना घडल्यास त्याचा तत्काळ अलर्ट मोटरमनसह कंट्रोल रूमला जाणार, यामुळे तत्काळ गाडी थांबवून मोठा अनर्थ टाळणे शक्य होणार आहे.

मंत्रालयात सर्व वाहनांना बसविले जाणार रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग

संसगेत झालेल्या घुसखोरी प्रकरणानंतर आता मंत्रालयात सर्व वाहनांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅग बसविले जाणार आहेत. दिल्लीतील संसद भवनाच्या घटनेनंतर राज्यातील मंत्रालय व विधान भवन येथील सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली आहे.

मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या कमी कशी होईल, याची चाचपणी सुरू आहे.

केवळ निवेदन व अर्ज देण्यास आलेल्या अर्जदारांसाठी ध्वनिक्षेपकाद्वारे मार्गदर्शन करण्याची सूचना देण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये गृह विभागाकडून मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली होती, त्यानुसार तीस नियम जाहीर केले असून दोन टप्प्यांत सुरक्षा यंत्रणा उभारली जात आहे.

पहिल्या टप्प्यात मंत्रालयात चारशे सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार आहेत. तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ टायर बस्टर आणि बूम बॅरिअर्स लावण्यात आले आहेत.

मुख्य प्रवेशद्वारातून केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री प्रवेश करू शकणार, तर उद्यान प्रवेशद्वाराजवळून आमदार, खासदार आणि प्रवेशिका असलेली वाहने प्रवेश करून ती वाहने आरसा गेटमधून बाहेर जाऊ शकणार आहेत.

झारखंडमध्ये काल रात्री रेल्वे ट्रॅक नक्षलवाद्यांनी उडवला; दुरुस्तीचं काम सुरू

झारखंड | गोयलकेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनोहरपूर ते गोयलकेरा दरम्यानचा रेल्वे ट्रॅक काल रात्री नक्षलवाद्यांनी उडवला, त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसंबधी सुनावनीसाठी वेळ द्यावा; हायकोर्टात याचिका दाखल

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती संबधी सुनावनीसाठी वेळ द्यावा याचिकाकर्त्यांची उच्च न्यायालयाकडे विनंती केली आहे. या प्रकरणात उबाठा गटाचे कोल्हापूरचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी न्यायालयाकडे ही विनंती केली आहे.

विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्या तीन वर्षापासून रखडल्या आहेत. तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी निर्णय न घेतल्यामुळे विलंब झाला आहे.

या प्रकरणी उबाठा गटाचे कोल्हापूरचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. या प्रकरणी सलग तिसरी सुनावनी वेळे अभावी होऊ न शकल्याने मोदी यांनी न्यायालयाकडे अर्ज सादर करत १२ आमदाराच्या नियुक्तीसंबधी सुनावनीसाठी निश्चित वेळ देण्याची विनंती केली आहे.

आज आणि उद्या भाजपची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली - आज आणि उद्या भाजपची दिल्लीत बैठक होणार असून यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीती बाबत चर्चा होणार आहे. तसेच मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कामांचा आढावा देखील घेतला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या योजना ग्राउंड लेव्हलला पोहोचल्या पाहिजेत असं यापूर्वी सांगितल गेलं आहे त्याचाही आढावा आज आणि उद्या घेतला जाईल. बैठकीत सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह प्रदेशअध्यक्ष, प्रदेश संघटन मंत्री, प्रदेश प्रभारी, सह प्रदेश प्रभारी आणि सर्व मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत दुपारी ३ वाजल्यापासून भाजप मुख्यालयात बैठकीला सुरुवात होणार आहे.

लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांचे नगरमध्ये निधन

नगर : लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर भानुदास मांडे (वय ९०) यांचे काल (गुरुवार) सायंकाळी घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. आज (ता.२२) सकाळी अकरा वाजता मांडे यांच्या पार्थिवावर ‘अमरधाम’ येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

राज्यात जेएन. १ कोरोनाचा शिरकाव; कोल्हापुरातही आढळला कोरोनाबाधित रुग्‍ण

कोल्हापूर : ‘‘राज्यात जेएन. १ कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यापाठोपाठ कोल्हापुरातही एक तरुण कोरोनाबाधित सापडला आहे. त्याला घरात क्वारंटाईन केले आहे. तो कोरोनाबाधित आहे; जेएन. १ ची लागण नाही. लोकांनी घाबरून न जाता मास्कचा वापर करावा,’’ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी दिली.

Live Update
Covid JN.1 Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा तब्बल ११ राज्यांमध्ये शिरकाव; आरोग्य मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा

‘टी-२०’ विश्‍वकरंडक स्पर्धेत स्टोक्स, आर्चर खेळण्याची शक्यता

लंडन : अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स व वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हे सध्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत; मात्र या दोन्ही प्रमुख खेळाडूंना इंग्लंडच्या टी-२० संघात स्थान देण्यात येईल. या दोघांसाठी संघाचे दरवाजे नेहमीच उघडे असतील, असे स्पष्ट मत इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी गुरुवारी व्यक्त केले. मॅथ्यू मॉट हे इंग्लंडच्या टी-२० व एकदिवसीय संघाचे प्रशिक्षक आहेत.

मांढरदेव येथून परतताना उंब्रजचे दांपत्य ठार

भुईंज : वाई-सातारा रस्त्यावर पाचवडजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पती, पत्नी जागीच ठार झाले. सोमनाथ नानासो चव्हाण (वय ४६, रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) व रेखा सोमनाथ चव्हाण (वय ४०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. हे दांपत्य आज मांढरदेवहून देवदर्शन घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला.

Live Update
मांढरदेव येथून काळूबाईचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; दुचाकी-ट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

'इंडिया' आघाडीची संसद परिसरात निदर्शने

नवी दिल्ली : खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संसद परिसर ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. यावेळी ‘मोदी सरकारच्याविरोधात घोषणा’ देण्यात आल्या. तसेच सर्व खासदारांच्या हातात निषेध फलके होती. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ‘राजद’चे मनोजकुमार झा, द्रमुकचे ए. राजा यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील लोकसभा आणि राज्यसभेतील गटनेते उपस्थित होते.

निवडणूक आयुक्तांचे विधेयक संसदेत मंजूर

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त तसेच अन्य आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भातील विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केंद्र सरकारने हे विधेयक आणले असल्याचे कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.

रेठरे खुर्दचे जवान कळसे यांना वीरमरण

रेठरे बुद्रुक : रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना काल मणिपूर येथे सेवेत असताना अपघातात वीरमरण आले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेचे वृत्त गावात धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव गावात आणले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या; मागणीवर मनोज जरांगे ठाम

वडीगोद्री (जि. जालना) : ‘मराठा समाजाला शासनाने सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे,’ या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे जाऊन पुन्हा त्यांची भेट घेत चर्चा केली तसेच दोन महिन्यांचा अवधीही मागितला. कुणबी प्रमाणपत्र देताना रक्ताचे नातेवाईक, सगेसोयरे याबद्दलची भूमिका स्पष्ट होत नसल्याने शासनास आरक्षणाचा निर्णय घेता येत नसल्याचे स्पष्ट झाले.

जम्मू-काश्मीर - दहशतवाद्यांच्या भीषण हल्ल्यात तीन जवान हुतात्मा

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरच्या पूँच जिल्ह्यात काल दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये तीन जवान हुतात्मा झाले तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे आज भारतीय लष्कर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. तसेच मराठा समाजाला शासनाने सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे,’ या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे जाऊन पुन्हा त्यांची भेट घेत चर्चा केली, तसेच दोन महिन्यांचा अवधीही मागितला.

या शिवाय, मुख्य निवडणूक आयुक्त तसेच अन्य आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भातील विधेयक गुरुवारी लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पहायला मिळत आहे. देश व राज्यातील हिवाळी अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com