
सलमान खानला धमकावण्याचे प्रकरण असो, किंवा राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या असो यामध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे तुरुंगात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई.
लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. आता लॉरेन्सच्या चुलत भावाने खुलासा केला आहे की लॉरेन्सला तुरुंगात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून कुटुंब दरवर्षी 40 लाख रुपये खर्च करते.