IAS अधिकाऱ्यांची ‘नर्सरी’ असलेल्या LBSNAAमध्ये लॉ विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी, कुठे करायचा अर्ज ?

LBSNAA Offers Internship Opportunities for Law Students: LBSNAAमध्ये कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपची संधी; प्रशासन आणि कायद्याचा प्रत्यक्ष संबंध समजणार
lbsnaa law internship

lbsnaa law internship

esakal

Updated on: 

देशातील नागरी सेवांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA)मध्ये आता कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासन आणि कायद्याचा प्रत्यक्ष संबंध समजून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अकादमीअंतर्गत कार्यरत असलेल्या नॅशनल सेंटर फॉर लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन (NCLA)च्या माध्यमातून कायद्याच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी दिली जाते.

LBSNAAच्या अधिकृत माहितीनुसार, NCLAचा एक प्रमुख उद्देश कायद्याचे प्रशासनातील प्रत्यक्ष उपयोग आणि कार्यकारी तसेच कायदेशीर चौकटीची समज विकसित करणे हा आहे. इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रशासनातील कायदेशीर प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com