
दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो. पण आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्याची गरज का भासली?
International Peace Day : दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो. पण आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्याची गरज का भासली? तर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांचे दुष्परिणाम जगाने पाहिले आहे. या दोन महायुद्धांनंतर जागतिक शांततेची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे 1981 मध्ये सर्व राष्ट्रांनी एकत्र येत 21 सप्टेंबर रोजी जागतिक शांतता दिन साजरा करण्याचं ठरवलं. सर्व राष्ट्रांनी एकमताने ठराव करून 21 सप्टेंबर 1981 रोजी शांतता दिवसाची स्थापना केली. मानवाने मतभेदांपेक्षा शांततेत वचनबद्ध होण्यासाठी आणि शांतीची संस्कृती वाढविण्यात हातभार लावण्यासाठी जागतिक स्तरावर 21 सप्टेंबर या एकाच तारखेला एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो.
जगाला भेडसावणारा आतंकवाद आजही जागतिक शांततेच्या मार्गात मोठा अडथळा ठरत आहे. त्याचप्रमाणे सामाजिक शांततेला बाधा आणणाऱ्या भाषिक, वांशिक व धार्मिक दंगलींमुळे अनेक देशांमध्ये आजही अशांतताच नांदत आहे. भारतातील गुन्हेगारी, महिलांवरील वाढते अत्याचार या गंभीर घटनांमुळे देश हादरतोय. या मानवी अशांततेची अनेक उदाहरणे आहेत; मात्र गेल्या वर्षीपासून संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोविड-19 या विषाणूने हाहाकार माजवला आहे. या विषाणूने मानवातील माणुसकी संपवली. रक्ताचे नातेही परके केले.
राष्ट्रसंघाची प्रस्थापित वेबसाईट आहे, त्यावर दरवर्षी 100 दिवसांपूर्वी शांतता दिनासाठी काउंटडाऊन सुरू होतो. प्रत्येक वर्षी शांतता दिवसासाठी एक वेगळी थीम असते. 2019 मध्ये "क्लायमेट ऍक्शन फॉर पीस' ही थीम होती. गेल्या वर्षी असे स्पष्ट झाले आहे, की आपण एकमेकांचे शत्रू नाही. त्याऐवजी आपला सामान्य शत्रू हा एक साधा विषाणू (व्हायरस) आहे, जो आपल्या आरोग्यास, सुरक्षिततेला आणि जीवनशैलीला धोका पोचवत आहे. कोविड -19 ने आपले जीवन विस्कळित करून टाकले आहे आणि यातूनसुद्धा व्यवस्थित बाहेर निघायचं असेल तर शांततेच्या मार्गाने बाहेर निघणंच अधिक सोयीस्कर ठरणार आहे.
मार्च 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सर्व युद्ध करणाऱ्या देशांना शस्त्रे फेकून देऊन जगाला भेडसावणाऱ्या या महाभयानक अशा कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ही आपल्या जीवनाची लढाई आहे आणि काळाच्या विरुद्ध शर्यत आहे. आपण जिंकू शकतो आणि याचं देखील निराकरण आपल्याच हातात आहे.
1954 मध्ये युनायटेड नेशन्स असोसिएशन ऑफ जपानने पीस बेल ही भेट दिली होती. 1951 मध्ये पॅरिसमधील महासभेच्या सहाव्या अधिवेशनात जपानच्या संयुक्त राष्ट्र संघटनेचे माजी सल्लागार आणि निरीक्षक चियोजी नाकागवा यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. पीस बेल (शांती बेल) ही शांतीच्या आशेचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र सर्व राष्ट्रांना आणि लोकांना शस्त्रे खाली ठेवण्याची व एकमेकांशी सुसंगत राहण्याचं आवाहन करते. 24 तास अहिंसा व संघर्षविराम पाळण्याच्या माध्यमातून शांततेचे आदर्श बळकट करण्यासाठी हा दिवस समर्पित केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.