हिंसा सोडा; मुख्य प्रवाहात या; दहशतवादी, नक्षलवाद्यांना मोदींचे आवाहन

पीटीआय
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

मोदी म्हणाले....

  • केंद्र सरकारचे पहिले प्राधान्य आसामच्या विकासाला 
  • बोडो करारामुळे अखेर शांततेचा विजय झाला
  • बोडोंच्या चौफेर विकासासाठी सरकार कटीबद्ध
  • स्थानिक नागरिकांच्या अधिकाराचे संरक्षण होणार
  • भाजपेतर सरकारांनी उत्तर शोधणे टाळत बोडोंचा प्रश्‍न चिघळू दिला.

शंकांचे निरसन
मोदींनी आजच्या भाषणात आसामी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. नागरिकत्व कायद्यामुळे परदेशातील लोक येथे येऊन वास्तव्य करतील, अशी अफवा पसरविली. पण, तसे होणार नाही, असे ते म्हणाले.

कोकराझार (आसाम) - कधीकाळी वेगळ्या बोडोलँडसाठीच्या सशस्त्र संघर्षामुळे देशभर चर्चेत आलेल्या आसाममधील कोकराझार येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शांततेचा उद्‌घोष केला. काश्‍मिरी दहशतवादी, ईशान्येकडील बंदी घालण्यात आलेल्या संघटना आणि नक्षलवाद्यांनी शस्त्रत्याग करीत मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये यावे आणि जीवनाचा आनंद लुटावा, असे आवाहन त्यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तत्पूर्वी, नागरिकत्व कायद्यामुळे आसाममध्ये आंदोलनाचा भडका उडाला होता, त्यामुळे मोदींना दोन वेळा आसाम दौरा रद्द करावा लागला होता. आसाममध्ये नवे शांतिपर्व आणणाऱ्या २७ जानेवारी रोजी झालेल्या त्रिपक्षीय कराराचा उत्सव साजरा करण्यासाठी आज येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘‘बोडो करारामुळे आसाममध्ये शांतता आणि विकासाची नवी पहाट अवतरली आहे. लोकांच्या पाठिंब्यामुळे चिरंतन विकासाचा मार्ग प्रशस्त झाला. आताही बंदुका आणि बाँबसोबत असलेल्या ईशान्येकडील फुटीरतावादी संघटना आणि नक्षलवाद्यांनी शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहामध्ये यावे.’’ केंद्र, आसाम सरकार आणि बोडो संघटना यांच्यात झालेला करार राज्यामध्ये चिरंतन शांतता निर्माण करेल, असा विश्‍वास व्यक्त करतानाच मोदी यांनी या संघटनांच्या मागण्या सरकारने पूर्ण केल्याचा दावा केला.

Coronavirus : कोरोनामुळे मिरची उत्पादक हैराण!

काही मंडळी मला बांबूने फटके मारले पाहिजेत, असे बोलतात. पण, ज्या मोदींना एवढ्या मोठ्या प्रमाणावर माता-भगिनींचे सुरक्षा कवच आहे, त्याला कितीही फटके मारले, तरी काही फरक पडत नाही.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leave Violence Modi appeals to mainstream terrorist Naxalites