esakal | Coronavirus : कोरोनामुळे मिरची उत्पादक हैराण!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus-Chilles

साठवणुकीच्या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या मिरचीची खरेदी करावी आणि परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर शेतकऱ्यांना विम्याचे कवच द्यावे.

Coronavirus : कोरोनामुळे मिरची उत्पादक हैराण!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनमधील कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अर्थकारणावरदेखील विपरीत परिणाम होतो आहे. यामुळे भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना आखत पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. व्ही. पी. रामचंद्रराव यांनी शुक्रवारी (ता.7) शून्य प्रहारादरम्यान राज्यसभेत बोलताना केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ‘तेजा’ प्रजातीच्या मिरचीची अन्य देशांना निर्यात करतो. हा निर्यात व्यापार पाच हजार कोटी रुपयांचा आहे. यातील साठ टक्के मिरची ही केवळ चीनमध्ये जाते.

- राम मंदिर ट्रस्टमधील एकमेव दलित सदस्य आहेत तरी कोण?

तेलंगण आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांत या मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. ही मिरची जहाजांच्या माध्यमातूनच अन्य देशांना पाठविण्यात येते. कोरोना विषाणूमुळे व्यापारच ठप्प झाल्याने ही मिरची बंदरांमध्ये तशीच पडून असून, आंध्र आणि तेलंगणमधील शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला असल्याचे रामचंद्रराव यांनी स्पष्ट केले. 

- हिंगणघाट प्रकरण : आनंद महिंद्रा पीडिता आणि कुटुंबीयांच्या पाठीशी!

सरकारने मिरची खरेदी करावी 

सरकारने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मिरचीला किमान आधारभूत किंमत मिळेल, याची खात्री द्यावी. साठवणुकीच्या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच या मिरचीची खरेदी करावी आणि परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर शेतकऱ्यांना विम्याचे कवच द्यावे, अशा मागण्याही रामचंद्रराव यांनी राज्यसभेत बोलताना केल्या. 

- ...तर पाकिस्तानच्या नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू : भारत सरकार