Sohan Halwa : पाकिस्तानला देखील भुरळ घालणारा सोहन हलवा! बच्चनसाठी विमानातून पाठवले जाते पार्सल, जाणून घ्या १०० वर्षांची सिक्रेट रेसिपी

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड (Bundelkhand) भाग हा केवळ त्याच्या ऐतिहासिक शौर्यासाठीच नाही, तर तिथल्या पारंपरिक आणि चवदार देशी खाद्यसंस्कृतीसाठीही खूप प्रसिद्ध आहे.
banda sohan halwa amitabh bachchan

banda sohan halwa amitabh bachchan

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड (Bundelkhand) भाग हा केवळ त्याच्या ऐतिहासिक शौर्यासाठीच नाही, तर तिथल्या पारंपरिक आणि चवदार देशी खाद्यसंस्कृतीसाठीही खूप प्रसिद्ध आहे. येथील बांदा (Banda) जिल्ह्यात खवय्यांसाठी एकापेक्षा एक लजीज पदार्थ मिळतात, ज्यांची चव एकदा जिभेवर रेंगाळली की लोक पुन्हा पुन्हा तिथे खेचले जातात.

अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे बांदा येथील कटरा मोहल्ल्यात मिळणारा 'बोडे राम स्वीट्स'चा मशहूर सोहन हलवा (Sohan Halwa)! या हलव्याचा सुवास आणि चव इतकी अद्भूत आहे की, केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार परदेशातही या मिठाईचे लाखो चाहते आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com