
सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या लग्नाची चर्चा आहे. दोन मैत्रिणींनी एकमेंकींशी लग्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंदिरात दोघींनी एकमेकांना हार घातला आणि एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. दोघांनीही सांगितले की आता आम्ही ठरवले आहे की आम्ही आयुष्यभर पती-पत्नीप्रमाणे एकमेकांना साथ देऊ. हे अनोखे लग्न उत्तर प्रदेशातील बदायू शहरात न्यालयाच्या आवारातील शिवमंदिरात पार पडले.