'एलजीं'नी घरपोच धान्य योजना नाकारली : केजरीवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यावर गंभीर आरोप केले. आम आदमी सरकारने सुरु केलेली घरपोच धान्य योजना बंद केली, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. याबाबतची माहिती केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यावर गंभीर आरोप केले. आम आदमी सरकारने सुरु केलेली घरपोच धान्य योजना नायब राज्यपालांनी बंद केली, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. याबाबतची माहिती केजरीवाल यांनी ट्विटरवरून दिली आहे. 

ANil baijal

आम आदमी पक्ष सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी घरपोच धान्य योजना आणली होती. मात्र, या योजनेसाठी नायब राज्यपाल बैजल यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे त्यांनी घरपोच धान्य योजना बंद केली. या निर्णयामुळे केजरीवालांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ''आम्ही सुरु केलेली घरपोच धान्य योजना माननीय नायब राज्यपालांनी बंद केली. मी त्यांना हा निर्णय घेण्यापूर्वी अनेकदा विनंती केलीही होती. मात्र, त्यांनी हा निर्णय घेताना मला कोणतीही विचारणा केली नाही'. बैजल यांच्या निर्णयामुळे मी अत्यंत दु:खी आहे. आमचा हा प्रस्ताव त्यांच्या राजकारणाचा भाग बनला'', असे केजरीवाल यांनी ट्विट केले. 

मात्र, नायब राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LG has rejected doorstep ration delivery scheme says Delhi CM Arvind Kejriwal