Kerala Ship Sank : लायबेरियाचे मालवाहू जहाज केरळजवळ बुडाले; १३ कंटेनरमध्ये धोकादायक रसायने
Kochi Accident : कोचीजवळ लायबेरियन मालवाहू जहाज 'एमएससी एल्सा ३' बुडाले असून, ६४० कंटेनरपैकी १३ मध्ये धोकादायक रसायने आहेत. तटरक्षक दलाने जलप्रदूषण टाळण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.
कोची : सुमारे ६४० कंटेनर घेऊन जाणारे लायबेरियाचे मालवाहू जहाज केरळच्या किनाऱ्याजवळ बुडाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कंटेनरमध्ये धोकादायक रसायनांच्या १३ कंटेनरचा समावेश असल्याने सागरी पर्यावरणाला हानी पोचण्याची भीती वर्तविली जात आहे.